Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

विचार आणि विचारवंत

पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

Western Political Thinkers

Rs.235.00

राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अ‍ॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.

Pashchimatya Rajkiya Vicharwant

  1. अ‍ॅरिस्टॉटल : प्रास्ताविक, अ‍ॅरिस्टॉटलची ग्रंथरचना, दी पॉलिटिक्स, वास्तववादी दृष्टीकोन, अ) अ‍ॅरिस्टॉटलचे राज्यविषयक विचार ब-1) राज्याचे वर्गीकरण – राज्यांचे वा राज्यघटनेचे वर्गीकरण, राज्याचे परिवर्तन चक्र, अ‍ॅरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणावरील टीका ब-2) अ‍ॅरिस्टॉटलचे आदर्शराज्य – अ‍ॅरिस्टॉटलच्या आदर्शराज्याची वैशिष्ट्ये, मूल्यमापन क) अ‍ॅरिस्टॉटलचे नागरीकत्वासंबंधी विचार – नागरिकत्वाच्या कल्पनेबाबत प्लेटो व अ‍ॅरिस्टॉटलच्या विचारांची तुलना, अ‍ॅरिस्टॉटलच्या नागरिकत्वाबाबतच्या विचारांवर करण्यात येणारी टीका ड) अ‍ॅरिस्टॉटलचे दासप्रथा वा गुलामगिरी संबंधीचे विचार – गुलामगिरी वा दासप्रथेचे समर्थन, अ‍ॅरिस्टॉटलच्या दास वा गुलामगिरीच्या प्रथेवरील टीका इ) अ‍ॅरिस्टॉटलचे क्रांतीसंबंधी विचार – क्रांतीचा अर्थ, क्रांतीचे प्रकार, क्रांतीची कारणे; अ‍ॅरिस्टॉटलच्या विचारांचे मूल्यमापन
  2. मॅकॅव्हली : प्रास्ताविक, मॅकॅव्हलीची ग्रंथरचना, द प्रिन्स; अ) मॅकॅव्हलीचे मनुष्य स्वभावा संबंधी विचार – मॅकॅव्हलीने वर्णन केलेली मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये, मॅकॅव्हलीच्या मनुष्य स्वभावावरील आक्षेप ब) मॅकॅव्हलीचे राजनयन वा मुत्सद्दीपणा बाबतचा विचार – आधुनिक राजकीय विचारांचा जनक क) धर्म आणि नैतिकताविषयीचे विचार – मॅकॅव्हलीचे धर्म व नीतिच्या विरोधी विचार राज्यासाठी ड) मॅकॅव्हलीचे राज्यसंस्थेबाबतचे विचार – मॅकॅव्हलीने राजाला केलेला उपदेश, मॅकॅव्हलीची साध्य आणि साधनांबाबतची मते; मॅकॅव्हलीच्या विचारांचे मूल्यमापन
  3. रुसो : प्रास्ताविक, रूसोची ग्रंथरचना; अ-1) रूसोचे मनुष्य स्वभावा संबंधीचे विचार अ-2) नैसर्गिक अवस्थेबद्दल रूसोचे विचार ब-1) रूसोचा सामाजिक करार सिद्धांत – रूसोच्या सामाजिक कराराची वैशिष्ट्ये, सामाजिक करारावरील आक्षेप ब-2) सामाजिक कराराचे महत्त्व क) रूसोची सामाजिक ईहा वा सामान्य इच्छेसंबंधीचे विचार – सामान्य इच्छेची वैशिष्ट्ये, सामान्य इच्छा व कायदानिर्मिती, सामान्य इच्छेवरील आक्षेप ड-1) जबाबदार शासन किंवा शासनसंस्थेविषयी रूसोचे विचार – शासन संस्थेचा उदय, शासन संस्थेचे प्रकार, जबाबदार शासन वा शासनसंस्थेविषयीचे विचार ड-2) सार्वभौमत्वाविषयी रूसोचे विचार – रूसोच्या सार्वभौमत्वाची लक्षणे ड-3) व्यक्ति स्वातंत्र्या विषयी रूसोचे विचार; रूसोच्या विचारांचे मूल्यमापन
  4. जॉन स्टुअर्ट मिल : प्रस्तावना, मिलची ग्रंथरचना अ) मिलचे स्वातंत्र्यासंबंधी विचार – व्यक्तिगत स्वातंत्र्य, मिलच्या स्वातंत्र्याची मुलभूत तत्त्वे, मिलच्या स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांवरील टीका ब) मिलचे स्त्री स्वातंत्र्याविषयीचे विचार क) मिलचे राज्यासंबंधीचे विचार – राज्याची कार्ये, राज्याची आवश्यक कार्य; व्यक्तिवाद आणि समाजवाद ड) प्रातिनिधिक शासन – मिलच्या सर्वोत्कृष्ट शासन प्रणालीचे गुण, मिलचे प्रातिनिधिक शासन, मिलच्या प्रातिनिधिक शासन वा सरकार संबंधीच्या विचारावरील आक्षेप इ-1) मिलचे उपयोगितावादासंबंधी विचार इ-2) उपयोगितावादातील मिलने केलेले बदल – उदारमतवादी, मिलच्या उपयोगितावादी सिद्धांताचे मूल्यमापन; जे. एस. मिलच्या विचारांचे मूल्यमापन
  5. कार्ल मार्क्स : प्रास्ताविक, मार्क्सची ग्रंथरचना, द कम्युनिष्ट मॅनिफेस्टोचे महत्त्व अ-1) कार्ल मार्क्स व त्याचा शास्त्रीय समाजवाद – मार्क्सचे तत्वज्ञान वा तात्विक भूमिका – विरोध विकासवाद सिद्धांत; मार्क्सचा द्वंद्वांत्मक भौतिकवाद – द्वंद्वांत्मक भौतिकवाद सिद्धांताची वैशिष्ट्ये अ-2) इतिहासाचे भौतिकवादी विश्लेषण – इतिहासाच्या भौतिकवादी मिमांसेवरील टीका ब-1) वर्गसंघर्षाचा सिद्धांत – वर्गसंघर्षावरील आक्षेप ब-2) अतिरिक्त मूल्य सिद्धांत – अतिरिक्त मूल्य सिद्धांतावरील आक्षेप क) मार्क्सचे राज्यासंबधिचे विचार किंवा मार्क्सची वर्गविहीन आणि राज्यविहीन समाजाची संकल्पना – मार्क्सच्या राज्याच्या सिद्धांतावरील आक्षेप; मार्क्सच्या विचारांचे मूल्यमापन
  6. हॅराल्ड जे लास्की : प्रास्ताविक, लास्कीची ग्रंथसंपदा अ) लास्कीचे अनेक सत्तावाद व सार्वभौमत्वाविषयी विचार ब) अधिकारासंबंधी विचार – लास्कीची हक्कांच्या संरक्षणाविषयी भूमिका, विशेष हक्क क) लास्कीचे स्वातंत्र्य विषयक विचार – स्वातंत्र्याचे संरक्षण ड-1) स्वातंत्र्य व समतेबाबत लास्कीचे विचार ड-2) लास्कीचे कायद्याबाबत विचार – कायदापालन इ) लास्कीचे भांडवलशाहीसंबंधी विचार; लास्कीच्या विचारांचे मूल्यमापन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाश्चिमात्य राजकीय विचारवंत”
Shopping cart