Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

आंतरराष्ट्रीय व्यापार : सिद्धांत आणि व्यवहार

International Trade (Theory and Practice)

Rs.395.00

आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाहिले जाते. व्यापार माध्यमातून जगातील सर्वच देशांचा कमी-जास्त वेगाने आर्थिक विकास होऊ लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार माध्यमातून प्रत्येक देश आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांवरील अवलंबित्वातूनच जगातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो. व्यापार मुळात लाभ मिळविण्याच्या हेतुने केला जातो. एखादा देश आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न असला तरी संपुर्णत: स्वयंपूर्ण असू शकत नाही. कारण देशात सर्वच वस्तू व सेवांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होतेच असे नाही. वस्तू व सेवांची देशांतर्गत टंचाई दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते, तसेच देशातील वस्तू व सेवांचे अतिरिक्त उत्पादन खपविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारातून देशा-देशांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध निर्माण होतात, सहकार्याची आणि एकात्मकतेची भावना निर्माण होते, विकसित देश विकसनशील देशांना विकासासाठी मदत करतात.
प्रस्तुत पुस्तकात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ-हानी, विविध सिद्धांत व धोरणे, व्यापारतोल, विदेशी विनिमय दर, विदेशी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपन्या, विदेश चलन गंगाजळी, विविध आंतरराष्ट्रीय संस्था व परिषदा, जागतिक वित्तीय संकट 2008, रुपयाचे अवमूल्यन आणि परिवर्तनियता इ. मुद्द्यांचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे.

– प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण

Antarrashtriy Vyapar And Vyavahar

  1. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यापार : 1.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाचे महत्त्व, 1.2 आंतरराष्ट्रीय व्यापार : (1) अंतर्गत व्यापार (2) आंतरराष्ट्रीय व्यापार, 1.3 अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य/भेद :
    अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद/फरक, 1.4 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास : आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आर्थिक विकासावरील परिणाम – अ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रत्यक्ष फायदे आ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अप्रत्यक्ष फायदे; आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आर्थिक विकासावरील विपरीत परिणाम – अ) अर्थशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन ब) सर्वसामान्य युक्तिवाद, 1.5 आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ : लाभाबाबत अर्थशास्त्रज्ञांचे विचार, सनातन पंथीय अर्थशास्त्रज्ञांचे विचार, आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचे विचार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख लाभ, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ ठरविणारे घटक, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होणार्‍या लाभांचे मापन, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होणारे तोटे
  2. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आणि विदेश व्यापार धोरण : 2.1 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आर्थिक आधार, 2.2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातन सिद्धांत, 1) अ‍ॅडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च-लाभ सिद्धांत 2) डेव्हिड रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्च सिद्धांत; तुलनात्मक खर्च सिद्धांताची गृहिते, तुलनात्मक खर्च सिद्धांताचे स्पष्टीकरण – 1) निरपेक्ष खर्च-फरक 2) समान खर्च फरक 3) सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्च-फरक; सिद्धांताचा सारांश, तुलनात्मक खर्च सिद्धांताचे मूल्यमापन, 2.3 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत : हेक्श्चर-ओहलीन यांचा सिद्धांत, हेक्श्चर-ओहलीन यांच्या सिद्धांताची गृहिते, सारांश, हेक्श्चर-ओहलीन सिद्धांताचे टीकात्मक मूल्यमापन, सनातन सिद्धांत आणि हेक्श्चर-ओहलीन सिद्धांत यांच्यातील फरक, ओहलीनच्या सिद्धांताचे श्रेष्ठत्व, 2.4 लिऑन्टिफचा विरोधाभास : लिऑन्टिफकडून विरोधाभासाचे स्पष्टीकरण, लिऑन्टिफच्या विरोधाभासावरील आक्षेप, 2.5 मुक्त व्यापार धोरण : मुक्त व्यापाराच्या समर्थनार्थ युक्तिवाद, मुक्त व्यापाराच्या विरुद्ध युक्तिवाद, 2.6 संरक्षणाचे धोरण : संरक्षण धोरणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद – अ) आर्थिक युक्तिवाद आ) आर्थिकेत्तर युक्तिवाद; संरक्षण धोरणाच्या विरुद्ध युक्तिवाद, संरक्षणाच्या पद्धती, 2.7 व्यापार धोरण आणि विकसनशील अर्थव्यवस्था
  3. व्यापारशर्ती आणि व्यवहारतोल : 3.1 व्यापार शर्तीचा अर्थ : व्यापार शर्ती कशा ठरतात?, व्यापार शर्तीचे मोजमाप, आयात व निर्यात किंमत निर्देशांक आणि व्यापार शर्ती, व्यापार शर्ती मापनातील अडचणी/दोष, व्यापार शर्तीवर प्रभाव टाकणारे घटक , विकसनशील देशांच्या व्यापार शर्ती प्रतिकूल होण्याची कारणे, विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना, 3.2 व्यापारतोल : व्यापारतोलाचा परिणाम, व्यवहारतोल, व्यापारतोल आणि व्यवहारतोल यांच्यातील फरक; व्यवहारतोलाची रचना – क) व्यवहारतोलाचे चालू खाते ख) व्यवहारतोलाचे भांडवली खाते; व्यवहारतोल नेहमी संतुलित असतो, भारताचा संपूर्ण व्यवहारतोल (2018-19), व्यवहारतोलाचे महत्त्व, व्यवहारतोलातील असमतोल, व्यवहारतोलात असमतोलाची कारणे; व्यवहारतोलातील असमतोल दूर करण्याचे उपाय – 1) चलनविषयक उपाययोजना 2) चलनेतर उपाययोजना 3) व्यापारविषयक उपाययोजना 4) विनिमय नियंत्रण, 3.3 विदेशी विनिमय दर : विनिमय दराचा अर्थ, विदेशी विनिमय दराचे महत्त्व; विदेशी विनिमय दराचे प्रकार – 1) हजर विनिमय दर 2) वायदा किंवा अग्रीम विनिमय दर 3) मुदतीचे विनिमय दर; विदेशी चलन विनिमय दराची निश्चिती, विदेशी चलनाची मागणी, विदेशी चलनाचा पुरवठा; विनिमय दराचे सिद्धांत – 1) टांकसाळ समता सिद्धांत 2) खरेदी शक्ती समता सिद्धांत 3) व्यवहारतोल सिद्धांत; विनिमय दरात चढ-उतार निर्माण होण्याची कारणे, स्थिर आणि बदलते विनिमय दर – क) स्थिर किंवा निश्चित विनिमय दर ख) बदलते किंवा लवचिक विनिमय दर; स्थिर आणि बदलत्या विनिमय दराचे गुण-दोष; विनिमय नियंत्रण – अर्थ, विनिमय नियंत्रणाची वैशिष्ट्ये, विनिमय-नियंत्रणाचा उगम, विनिमय नियंत्रणाची उद्दिष्टे; विनिमय नियंत्रणाच्या पद्धती – 1) प्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धती 2) अप्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धती
  4. भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचाली, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विदेशी चलन गंगाजळी : 4.1 भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचालीचा अर्थ : क) भांडवली हालचालीचे वर्गीकरण – 1) स्वदेशी आणि विदेशी भांडवली हालचाली 2) खासगी आणि सरकारी भांडवली हालचाली 3) अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली हालचाली 4) विदेशी भांडवल गुंतवणूक; ख) भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचाली करणारे घटक, 4.2 विदेशी गुंतवणूक : क) रोखारुपी/पोर्टफोलिओ गुंतवणूक – अर्थ, उद्देश, वैशिष्ट्ये, निर्धारक घटक, पोर्टफोलिओ गुंतवणूकीचे लाभ आणि हानी ख) थेट विदेशी गुंतवणूक – थेट विदेशी गुंतवणुकीचे उद्देश, थेट विदेशी गुंतवणूकीचे निर्धारक घटक, थेट विदेशी गुंतवणुकीचे महत्त्व/लाभ व दोष, भारतातील विदेशी गुंतवणूक, 4.3 बहुराष्ट्रीय कंपन्या : बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये, बहुराष्ट्रीय कंपनीचा विस्तार, बहुराष्ट्रीय कंपनीच्या विकासाची कारणे, बहुराष्ट्रीय कंपनीची विकसनशील देशांतील भूमिका, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उणिवा, 4.4 विदेश चलन गंगाजळी : अर्थ, व्याख्या, विदेश चलन गंगाजळीवर प्रभाव टाकणारे घटक, विदेश चलन साठ्याचे उद्देश, भारतातील विदेश चलन साठ्याची वस्तूस्थिती
  5. आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्था आणि संस्था : 5.1 युरो चलन बाजाराचा अर्थ उद्गम आणि विकास : अर्थ, युरो चलन बाजाराचा उद्गम, युरो चलन/युरो डॉलर चलन बाजाराचा विकास, युरो चलन बाजाराचा आकार, युरो चलन बाजाराचे कार्य व कार्यपद्धती, युरो चलन बाजाराची वैशिष्ट्ये, युरो-चलन बाजार आणि विकसनशील देश, युरो-चलन बाजाराच्या कार्यपद्धतीची साध्यता, युरो-चलन बाजाराचेे दोष, 5.2 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी : आंतरराष्ट्रीय नाणे निधीची पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे उद्देश, नाणे निधीचे कार्य, नाणे निधीचे सदस्यत्व, नाणे निधीचे प्रशासन आणि संघटन, नाणे निधीचा कोटा व भांडवल, नाणे निधीची कार्यपद्धती, नाणे निधीच्या कार्याचे यश, नाणे निधीच्या कार्यातील उणिवा; विशेष आहरण/उचल अधिकार, विशेष आहरण अधिकार, विशेष आहरण आधिकार योजनेची वैशिष्ट्ये, विशेष आहरण अधिकाराचा उपयोग, विशेष आहरण अधिकाराची निर्मिती, विशेष आहरण अधिकाराचे मूल्यमापन, 5.3 आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक/जागतिक बँक : जागतिक बँकेचे उद्देश, जागतिक बँकेचे सदस्यत्व, जागतिक बँकेचे संघटन, जागतिक बँकेचे भांडवल, जागतिक बँकेची कार्ये, जागतिक बँकेच्या कार्याची प्रगती, 5.4 एशियन विकास बँक : एशियन विकास बँकेचे उद्देश आणि कार्ये, एशियन विकास बँकेचे सदस्यत्व, बँकेच्या निधीचे स्रोत, बँकेचे संघटन, कर्ज आणि तांत्रिक सहाय्यता, एशियन विकास बँकेची प्रगती, बँकेच्या कार्याचे टीकात्मक मूल्यमापन, 5.5 नवीन विकास बँक/ब्रिक्स बँक : ब्रिक्स बँकेची मुख्य वैशिष्ट्ये, ब्रिक्स बँकेची प्रगती, 5.6 जागतिक वित्तीय संकट – 2008 : वित्तीय संकट म्हणजे काय?, सबप्राईम क्राइसिस, वित्तीय आणि आर्थिक संकटाची मुळ कारणे, वित्तीय संकटाला सुरुवात, वित्तीय संकटाचा प्रभाव, अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील प्रभाव, जागतिक अर्थव्यवस्थेवरील प्रभाव
  6. प्रादेशिक आर्थिक सहकार्य : 6.1 प्रादेशिक आर्थिक सहकार्याचा अर्थ आणि प्रकार : प्रादेशिक आर्थिक सहकार्याचे लाभ, प्रादेशिक आर्थिक सहकार्याच्या पूर्व अटी, प्रमुख प्रादेशिक आर्थिक सहकार्य संघटना, 6.2 युरोपियन आर्थिक समुदाय/युरोपियन सामाईक बाजार : समुदायाचे सदस्य, समुदायाचे प्रमुख कार्यालय, समुदायाचे उद्देश, समुदायाचे संघटन, युरोपियन आर्थिक समुदायाचा प्रभाव, युरोपियन आर्थिक समुदायाची प्रगती, भारत आणि युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपियन सामाईक बाजार व भारताच्या आर्थिक संबंधामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती, 6.3 दक्षिण-पूर्व एशियन देशांचा संघ : सदस्य, उद्देश, संघटन, प्रगती, इतर महत्त्वपूर्ण निर्णय, 6.4 दक्षिण एशियन प्रादेशिक सहकार्य संघटन : सार्कचे उद्देश, सार्कचे संघटन, सार्कची संमेलने, सार्क आणि भारत, सार्क सदस्य देशांशी भारताचा व्यापार, सार्क विकासाच्या समस्या, निष्कर्ष, 6.5 ब्रिक्स : उगम व पार्श्वभूमी, उद्देश, वैशिष्ट्ये; उपलब्धी, आव्हाने, शिखर सम्मेलन आणि त्याचे विषय, भारत आणि ब्रिक्स, 6.6 गट-20 : जी-20 काय आहे?, उगम, सदस्य देश, उद्देश, जी-20 कसे काम करते?, शिखर सम्मेलने, उपलब्धी
  7. रुपयाचे अवमूल्यन आणि परिवर्तनियता : 7.1 अवमूल्यन : अवमूल्यनाचा उद्देश, अवमूल्यनाच्या यशासाठी आवश्यक अटी, भारतीय रुपयाचे अवमूल्यन, कारणे, अवमूल्यनाचे परिणाम, 7.2 रुपयाची परिवर्तनीयता : रुपयाची अंशत: परिवर्तनीयता, रुपयाची व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीयता, रुपयाची चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयता, रुपयाची भांडवली खात्यावरील परिवर्तनीयता, रुपयाचे मूल्यघट, रुपयाची मूल्य घट/घसरण थोपविण्यासाठी उपाययोजना

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आंतरराष्ट्रीय व्यापार : सिद्धांत आणि व्यवहार”
Shopping cart