Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

जीवन कौशल्य शिक्षण

Life Skills Education

Rs.175.00

जीवनकौशल्ये ही प्रत्येक मानवाची गरज आहे. त्यातून आपल्या क्षमतांची जाणीव होते. तसेच आपल्या जीवनातील अपयशासाठी इतरांना दोषी ठरविले जात नाही. कारण प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याची क्षमता यातून विकसित होते. सर्जनशील विचारांची शृंखला निर्माण होते. वैयक्तीक जीवनात समायोजन क्षमता वाढून बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जीवन कौशल्यांमधून विविध मानसिक क्षमतांचा विकास नकळतपणे होतो. सकारात्मकता वाढीस लागते. आधुनिकीकरणाने भारावलेल्या समाजाला जीवनकौशल्ये शिक्षणाची आवश्यकता आहे. शालेय स्तरावर जीवनकौशल्य शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रस्तुत पुस्तकात जीवन कौशल्ये शिक्षणाचे स्वरूप संकल्पना सोबतच थकज ने पुरस्कृत केलेल्या दहा गाभाभूत जीवनकौशल्यांचे विवेचन केलेले आहे. आंतरवैयक्तीक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबाची भूमिका नेहमीच महत्वाची आहे. परंतु आज कुटुंबातील सदस्यदेखील एकमेकांपासून दुरावत आहे. विद्यार्थीदशेतच ही बाब समजणे व त्यात सुधारणा आवश्यक आहे. तणाव आणि भावना यावरील नियंत्रण राखणे आज गरजेचे आहे. जीवन कौशल्यांचे शिक्षण यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच विद्यार्थीदशेत जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला काय करता येईल यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Jeevan Kaushaly Shikshan

  1. जीवन कौशल्यांचे शिक्षण : 1.1 जीवन कौशल्ये शिक्षण : अर्थ, व्याख्या, स्वरुप आणि संकल्पना, 1.2 जीवन कौशल्ये शिक्षणाचे घटक, 1.3 विद्यार्थ्यांकरीता जीवन कौशल्ये शिक्षणाचे महत्व व गरज, 1.4 जीवन कौशल्ये शिक्षणाची व्याप्ती
  2. जीवन कौशल्यांचे आकलन : 2.1 जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेले दहा गाभाभूत जीवन कौशल्ये, 2.2 जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी पद्धती, 2.3 जीवन कौशल्ये शिक्षणाचे मूल्यनिर्धारण, 2.4 जीवन कौशल्य शिक्षणात कुटुंब आणि शाळेची भूमिका
  3. आंतरवैयक्तिक नातेसंबंध : 3.1 समवयस्क आणि कुटुंबासोबत नातेसंबंध, 3.2 स्वत:साठी ध्येय रचना – एक शोध, 3.3 आंतरवैयक्तिक संबंधाचे महत्व, 3.4 आंतरवैयक्तिक संबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबाची भूमिका
  4. तणाव आणि भावना यावर नियंत्रण : 4.1 तणाव आणि भावनांचे निराकरण, 4.2 संपे्रषण आणि आंतरवैयक्तिक कौशल्ये, 4.3 स्वजाणीव आणि समानाभूती, 4.4 तणाव व्यवस्थापनातील आव्हाने

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जीवन कौशल्य शिक्षण”
Shopping cart