Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

FYBSc Semester I

पर्यावरणशास्त्र परिचय

Introduction to Environmental Science

Rs.375.00

21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरणशास्त्र परिचय या संदर्भग्रंथात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, एड्स बाबतीतील जनजागृती व सद्य परिस्थिती, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.

Paryavaranshastra Parichay

1. पर्यावरण अभ्यासाची ओळख :
ओळख, व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व, पर्यावरणाचे घटक, पर्यावरणाचे प्रकार, जनजागृतीची गरज

2. नैसर्गिक संसाधने :
नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण – अ) वन संसाधन – फायदे, कार्य, निर्वनीकरण, वृक्ष संवर्धन, लाकूड कटाई, खाणकाम, जंगले-आदिवासी जीवनावरील परिणाम ब) जलसंसाधन – भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा उपयोग आणि अतिवापर, पूर, अवर्षण, जलविवाद, अवर्षणाची कारणे, परिणाम, उपाय, धरणांचे फायदे-तोटे क) खनिज संपत्ती – उपयोग, परिणाम ड) अन्नधान्य संपदा – समस्या, कारणे, आधुनिक शेती परिणाम इ) ऊर्जासाधने – गरज, पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय ऊर्जासाधने ऊ) भूमी संसाधन – संसाधन, अवमूल्यन, भूमिपात, मृदा धूप, वाळवंटीकरण

3. परिसंस्था :
व्याख्या, संकल्पना व परिसंस्था रचना, परिसंस्थेची रचना आणि कार्ये, परिसंस्थेतील ऊर्जास्त्रोत, अन्नसाखळी, अन्नजाळी, परिस्थितिकी मनोरा, परिस्थितिकीय अनुक्रम, पोषक द्रव्यांचे चक्रीकरण, विविध परिसंस्थांचा अभ्यास – अ) गवताळ परिसंस्था ब) जलीय परिसंस्था क) वाळवंटीय परिसंस्था ड) जंगल परिसंस्था इ) प्राणी संवर्धन
ई) जैवविविधतेचे संरक्षण

4. जैवविविधता व तिचे संवर्धन :
व्याख्या, प्रकार, भारतातील जैव भौगोलिक वितरण, महत्त्व, वैश्विक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील जैवविविधता, जागतिक जैवविविधता, भारतातील जैवविविधता, जैविक विविधतेचे संरक्षण, नामशेष होऊ पाहणाऱ्या सजीवांसाठी महत्त्वाचे प्रकल्प, जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्रे किंवा जैवविविधतेच्या संवेदनशील जागा, जैवविविधतेवरील संकटे – अधिवासाचा ऱ्हास, वन्यजीवांची शिकार, मानव व वन्य जीवन संघर्ष, भारतातील वनस्पती व प्राण्यांच्या संकटग्रस्त प्रजाती, ठरावित भागातच असणाऱ्या जाती-प्रजाती, जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती

5. पर्यावरण प्रदूषण :
व्याख्या, दूषितके, प्रदूषणाचे प्रकार, कारणे, परिणाम व उपाय – हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, सागरी प्रदृषण, ध्वनि प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, आण्विक आपत्ती, घन कचरा प्रदूषण; प्रदूषण नियंत्रणातील वैयक्तिक सहभाग

6. पर्यावरणीय आपत्ती :
पर्यावरणीय आपत्तीचे प्रकार – भूकंप, चक्रीवादळ किंवा आवर्त, पूर, अवर्षण, जैविक आपत्ती, भूमिपात

7. सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण :
अशाश्वत विकासाकडून शाश्वत विकासाकडे, खेडी व शहरवासियांच्या ऊर्जासंबंधी समस्या, जलसंवर्धन – पावसाचे पाणी साठविणे, जमिनीत मुरविणे, लोकांचे पुनर्अधिवास व पुनर्वसन समस्या, पर्यावरण नीती, समस्या व निराकरण, वातावरणीय बदल – पृथ्वीच्या तापमानातील वाढ, ओझोन क्षय, आम्ल पर्जन्य, हरितगृह परिणाम, आण्विक अपघात व विनाश, पडीक जमिनीचा विकास, टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त उत्पादनांची निर्मिती, पर्यावरण संरक्षण अधिनियम, पर्यावरण कायदे लागू करण्यात येणाऱ्या अडचणी, जनजागृती

8. मानवी लोकसंख्या आणि पर्यावरण :
लोकसंख्येची वाढ – राष्ट्राराष्ट्रातील फरक, लोकसंख्या विस्फोट, कुटुंबकल्याण कार्यक्रम, पर्यावरण व मानवी आरोग्य, मानवी हक्क – मानवी अधिकार, मूल्य शिक्षण, एचआयव्ही/एड्स, महिला व बालकल्याण, पर्यावरण व मानवी आरोग्यात माहिती तंत्रज्ञानाची भूमिका

9. पर्यावरण व्यवस्थापन आणि नियोजन :
पर्यावरणीय व्यवस्थापन व त्याची वैशिष्ट्ये, पर्यावरण नियोजन – व्याख्या, पर्यावरण नियोजनाचे प्रकार, पर्यावरण व्यवस्थापन व नियोजनाची गरज

10. शाश्वतता आणि शाश्वततेचे घटक :
चिरंतनतेची (शाश्वततेची) व्याख्या, विकासाची व्याख्या, शाश्वततेचे घटक – (अ) पर्यावरणीय शाश्वसता (ब) आर्थिक शाश्वसता (क) सामाजिक शाश्वसता

11. शाश्वत विकास :
शाश्वत विकासाची व्याख्या व स्वरूप, शाश्वत विकासाची गरज, शाश्वत विकासाची उद्दीष्टे, विविध परिसंस्थामधील शाश्वत विकास – कृषी व वने परिसंस्था, शाश्वत विकासात व्यक्ती समाजाची भूमिका, स्वच्छ विकास यंत्रणा (तंत्र)

12. क्षेत्रकार्य :
क्षेत्रकार्य म्हणजे काय?, अहवाल लेखन, क्षेत्रकार्याच्या भेटीची ठिकाणे व परिसंस्था, नदी परिसंस्था, तळे परिसंस्था, जंगल अथवा वन क्षेत्र अभ्यास परिसंस्था, कुरण क्षेत्र परिसंस्था, पर्वतीय क्षेत्र परिसंस्था, स्थानिक प्रदूषित भागांना भेट, शहरी भाग, ग्रामीण भाग, औद्योगिक भाग, वृक्ष, कीटक व पक्षी यांचा अभ्यास

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यावरणशास्त्र परिचय”
Shopping cart