Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

आर्थिक भूगोल

Economic Geography

,

Rs.160.00

‘आर्थिक भूगोल’ ही मानवी भूगोलाची एक महत्वाची शाखा असून भूगोलशास्त्राच्या अभ्यासात या ज्ञानशाखेच्या अध्ययन-अध्यापनास अनन्य साधारण महत्व आहे. बदलत्या परिस्थितीत विविध उपक्रमांचे आर्थिक नियोजन करणे हा आर्थिक भूगोलाचा महत्त्वाचा उद्देश आहे. एखाद्या भूभागाची प्रगती व विकास नेहमीच सुबध्द नियोजनाव्दारेच घडून येतो. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर, आपण आपल्या उपलब्ध साधनसामग्रीचा आढावा घेणे गरजेचे असते. आपण कोणत्या उत्पादनांमध्ये सक्षम आहोत व कोठे कमी पडतो? यावर विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार विकासाची दिशा ठरविण्यास मदत होते. साधनसंपत्तीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी आर्थिक भूगोलाचा उपयोग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे विविध मार्गाद्वारे उपाय योजून, मानव स्वत:च्या आर्थिक, सामाजिक व बौद्धिक गरजा भागवितो त्यास आर्थिक क्रिया असे म्हणतात.
उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर विविध प्रकारच्या प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होतो. या घटकांचे प्रमाण व स्वरूप सर्वदूर सारखे आढळत नाही. परिणामी उद्योगधंद्यांचा विकास सर्वदूर सारखा झालेला दिसून येत नाही. उद्योगधंद्यांच्या स्थानावर परिणाम करणार्‍या या विविध घटकांचा पद्धतशीर अभ्यास करून जर्मन अर्थशास्त्रज्ञ ऑल्फ्रेड वेबर यांनी 1909 मध्ये उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला. त्यास ‘ऑल्फ्रेड वेबरचा सिद्धांत’ असे म्हणतात. कोणताही उद्योग उभारतांना किमान उत्पादन खर्च लागेल असे स्थान शोधण्यासाठी हा सिद्धांत अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे या सिद्धांतास ’ङशरीीं उेीीं चेवशश्र’ म्हणूनही संबोधले जाते. देशाचा आर्थिक विकास त्या देशातील उपलब्ध खनिजसपंत्तीवर आणि उद्योगधंद्यांच्या विकासावर अवलंबून असतो.

Arthik Bhugol

  1. आर्थिक भूगोल-परिचय : 1.1 आर्थिक भूगोल : अर्थ व व्याख्या, 1.2 आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचा उद्देश, 1.3 आर्थिक भूगोलाचे स्वरुप, 1.4 आर्थिक भूगोलाची व्याप्ती, 1.5 आर्थिक भूगोलाच्या अभ्यासपद्धती, 1.6 आर्थिक भूगोल : एक गतिमान शास्त्र
  2. आर्थिक क्रिया व कृषी प्रकार : 2.1 आर्थिक क्रियांचा अर्थ, 2.2 आर्थिक क्रियांचे प्रकार, 2.3 कृषी प्रकार, अ) सखोल उदरनिर्वाहक शेती, ब) व्यापारी दुग्धोत्पादन शेती, क) मळ्याची शेती
  3. सिद्धांत व प्रतिमाने : 3.1 ऑल्फ्रेड वेबरचा उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणाचा सिद्धांत, 3.2 रोस्टोचे आर्थिक विकासासंबंधी प्रतिमान
  4. खनिज संपत्ती, उद्योगधंदे आणि व्यापार : 4.1 खनिजसंपत्ती, 4.2 ऊर्जा साधने (शक्तिसाधने), 4.3 उद्योगधंदे व त्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, 4.4 सूती वस्त्रोउद्योग, 4.5 साखर उद्योग, 4.6 व्यापार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आर्थिक भूगोल”
Shopping cart