Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)

Physical Geography

, , ,

Rs.295.00

सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.
प्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Prakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)

  1. काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती : 1.1 पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, 1.1.1 बिग बँग सिद्धांत, 1.1.2 कांटची तेजोमेघ परिकल्पना, 1.1.3 लाप्लासचा तेजोमेघ सिद्धान्त, 1.2 काल्पनिक रेषा, 1.2.1 अक्षवृत्ते व अक्षांश, 1.2.2 रेखावृत्ते व रेखांश, 1.2.3 बृहदवृत्त किंवा महावर्तुळ, 1.3 पृथ्वीची गती, 1.3.1 पृथ्वीचे परिवलन आणि परिवलनाचे परिणाम, 1.3.2 पृथ्वीचे परिभ्रमण आणि परिभ्रमणाचे परिणाम.
  2. आपली पृथ्वी/वसुंधरा : 2.1 पृथ्वीचे अंतरंग, 2.1.1 शिलावरण किंवा मृदावरण, 2.1.2 प्रावरण किंवा मध्यावरण, 2.1.3 गाभा किंवा केंद्रावरण, 2.2 खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, 2.2.1 वेगनरचा खंडवहन सिध्दांत, 2.2.2 तबकडी, भूकवच खंड विवर्तनी सिद्धांत, 2.2.3 भूकंप, 2.2.4 ज्वालामुखी.
  3. खडक आणि विदारण : 3.1 खडक, 3.1.1 अग्निजन्य/प्राथमिक खडक, 3.1.2 स्तरित/जलजन्य/गाळाचे खडक, 3.1.3 रूपांतरीत/विकृत खडक, 3.2 विदारण, 3.2.1 कायिक विदारण, 3.2.2 जैविक विदारण/घटक, 3.2.3 रासायनिक विदारण.
  4. भूगोलशास्त्रातील बाह्याकारकांची कार्ये : 4.1 नदीचे कार्य, 4.1.1 नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूरुपे, 4.1.2 नदीच्या वहन कार्यामुळे निर्माण होणारे भूरुपे, 4.1.3 नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भूरुपे, 4.2 वाऱ्याचे कार्य, 4.2.1 वाऱ्याच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे, 4.2.2 वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे.
  5. वातावरण आणि सौरशक्ती : 5.1 वातावरण, 5.1.1 वातावरणाचा अर्थ आणि महत्त्व, 5.1.2 वातावरणाचे घटक, 5.1.3 वातावरणाची संरचना, 5.2 सौरशक्ती, 5.2.1 सौरशक्ती वितरणावर परिणाम करणारे घटक, 5.2.2 तापमान.
  6. वायुभार आणि वारे : 6.1 वायुभार, 6.1.1 मापन आणि समभाररेषा, 6.1.2 वायुभार पट्टयांची निर्मिती, 6.1.3 वायुभार पट्टयांचे आंदोलन आणि त्या आंदोलनाचे परिणाम, 6.2 वारे, 6.2.1 वाऱ्यांचे प्रकार, 6.2.2 आवर्त आणि प्रत्यावर्त.
  7. आर्द्रता आणि वृष्टी : 7.1 आर्द्रता, 7.1.1 आर्द्रतेचा अर्थ आणि प्रकार, 7.1.2 बाष्पीभवन, 7.2 वृष्टीची निर्मीती, 7.2.1 वृष्टीचे प्रकार, 7.2.2 पावसाचे वितरण.
  8. जलावरण : 8.1 सागरतळ, 8.1.1 सागरतळाची सामान्य रचना, 8.1.2 अटलांटिक महासागराची तळरचना, 8.1.3 हिंदी महासागराची तळरचना, 8.2 समुद्रप्रवाह, 8.2.1 समुद्रप्रवाहाचा अर्थ, 8.2.2 समुद्रप्रवाहाच्या निर्मितीची कारणे, 8.2.3 अटलांटिक महासागरातील समुद्रप्रवाह, 8.2.4 हिंदी महासागरातील प्रवाह.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)”
Shopping cart