Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख

Field Techniques and Introduction to Project Report

,

Rs.95.00

‘क्षेत्राभ्यास’ हे भूगोल विषयातील संशोधनातील एक महत्वाचे अंग आहे. योग्य शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञान वापरुन क्षेत्राचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. क्षेत्रकार्य करतांना संशोधकाला किंवा अभ्यासकाला भौगोलिक व वैज्ञानिक दृष्टीकोन वापरता आला पाहिजे. क्षेत्रकार्यामुळे चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. क्षेत्रकार्य करतांना काही नितीमूल्यांचे पालन करणे आवश्यक असते. अभ्यासक्षेत्र हे कोणत्या स्वरूपाचे आहे हे क्षेत्रकार्य करण्यापूर्वी जाणून घेणे महत्वाचे असते. क्षेत्राभ्यास हा निरिक्षण पद्धतीने, प्रश्नावलीच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून पार पडतो.
‘नमुना संकलन’ हे क्षेत्रकार्या दरम्यानचे एक महत्वाचे कार्य आहे. नमुना निवडीच्या अनेक पद्धती आहेत. समग्रातून निवडलेल्या नमुन्याच्या विश्लेषणावरुन संपूर्ण सामग्रीबद्दल निष्कर्ष मांडता येतो. लघु संशोधन सादरीकरण हे प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून करतात. प्रकल्पाचे सादरीकरण अनेक मुद्द्यांमधून मुद्देसूदपणे करतात. ध्येय, उद्दीष्ट्ये, गृहीततत्वे, अभ्यासपद्धती, विवेचन, निष्कर्ष, अनुमान इत्यादी मुद्द्यांच्या आधारे प्रकल्पाचे सादरीकरण केले जाते.

  1. क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाचा परिचय : 1.1 क्षेत्रतंत्र परिचय, 1.2 क्षेत्रकार्याची संशोधनकार्यातील भूमिका किंवा महत्त्व, 1.3 क्षेत्रकार्याचे मूल्य आणि क्षेत्रकार्यातील नितीमूल्ये, 1.3.1 क्षेत्रकार्याचे मूल्य किंवा महत्त्व, 1.3.2 क्षेत्रकार्यातील नितीमुल्ये, 1.4 क्षेत्रकार्यादरम्यान वापरली जाणारी उपकरणे व इतर साहित्य, 1.5 अभ्यासक्षेत्राची ओळख
  2. क्षेत्रकार्यातील संकल्पना : 2.1 प्रश्नावली व प्रश्न-व्याख्या, 2.2 प्रश्नांचे प्रकार, 2.2.1 बहुपर्यायी प्रश्न, 2.2.2 बंदिस्त प्रश्न, 2.2.3 प्रतानुक्रम पद्धतीचे प्रश्न, 2.2.4 लोकसंख्या संबंधित प्रश्न, 2.2.5 मुक्त प्रश्न किंवा खुले प्रश्न, 2.3 क्षेत्रतंत्राचे गुण आणि दोष, 2.4 क्षेत्रतंत्राची योग्य निवड, 2.4.1 निरीक्षण पद्धती, 2.4.2 प्रश्नावली, 2.4.3 मुलाखत तंत्र
  3. नमुना आणि नमुना तंत्र : 3.1 नमुना : व्याख्या व नमुना निवडीमागील हेतू, 3.1.1 नमुना : व्याख्या, 3.1.2 नमुना निवडीमागील हेतू किंवा उद्दिष्ट्ये, 3.2 नमुना निवडीचे तंत्र/नमुना निवडीचे प्रकार, 3.2.1 यादृच्छिक नमुना, 3.2.2 स्तरित यादृच्छिक नमुना, 3.2.3 एकक पुंज नमुना, 3.2.4 क्रमबद्ध नमुना
  4. सामुग्री / आकडेवारीचे विश्लेषण आणि सादरीकरण : 4.1 आकडेवारी किंवा सामुग्री विश्लेषणाच्या पद्धती आणि सादरीकरण, 4.1.1 आकडेवारी किंवा सामुग्री विश्लेषणाच्या पद्धती, 4.1.2 सादरीकरण, 4.2 प्रकल्प आराखडा, 4.2.1 प्रकल्पाचे शिर्षक, 4.2.2 गोषवारा, 4.2.3 प्रकल्पाची प्रस्तावना किंवा प्रास्ताविक, 4.2.4 साहित्याचा आढावा, 4.2.5 अभ्यास क्षेत्राची निवड आणि परिचय, 4.2.6 ध्येय आणि उद्दिष्टे, 4.2.7 अभ्यासपद्धती, 4.2.8 विश्लेषण आणि विषय विवेचन, 4.2.9 निष्कर्ष आणि सूचना, 4.2.10 संदर्भसूची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख”
Shopping cart