Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

पर्यावरण भूगोल

Environmental Geography

,

Rs.175.00

मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याची स्वयंचलित व स्वनियंत्रित यंत्रणा निसर्गाजवळ आहे. परंतु अलीकडच्या काळात निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे असंतुलन निर्माण झाले. त्यातून अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्यात. ह्या पर्यावरणीय समस्या विश्वव्यापी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या जागतिक परिषदेत पर्यावरणीय समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली व तेव्हापासूनच जगातील सर्व देशांचे लक्ष ह्या जागतिक समस्येकडे वेधले गेले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असल्याची जाण प्रत्येक राष्ट्र, शासन व समाजाला होऊ लागली. यातूनच पर्यावरण अभ्यासास महत्त्व प्राप्त झाले. पर्यावरणविषयक जागृती व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला पर्यावरणाचे महत्त्व कळावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करू शकतो? पर्यावरण संतुलन ढासळल्यामुळे किती भयानक समस्या निर्माण झाल्यात? या संबंधीची माहिती प्रत्येकास व्हावी, या दृष्टिकोनातूनच प्रस्तुत पुस्तकाची मांडणी केली आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून जैवविविधतेचे महत्व, राष्ट्रीय पर्यावरण धोरण, धोरणावर आधारित अंमलबजावणी, वने व वन्यजीवांचे संवर्धन, विकसित व विकसनशील देशातील पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न अशा महत्वपूर्ण मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व स्वच्छ पर्यावरणासाठी या सर्व बाबींचे आकलन समाजाला होणे आवश्यक आहे. ही माहिती समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू या.

Paryavran Bhugol

  1. पर्यावरण भूगोल – परिचय : 1.1 पर्यावरण – अर्थ व संकल्पना, 1.2 पर्यावरणाचे प्रकार, 1.3 मानव व पर्यावरण सहसंबंध, 1.4 पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप व व्याप्ती, 1.5 पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासपध्दती (दृष्टीकोन)
  2. परिसंस्था : 2.1 परिसंस्थेच्या व्याख्या व संकल्पना, 2.2 परिसंस्था रचना, 2.3 परिसंस्थेचे कार्य, अ. पोषकद्रव्यांचे चक्रीकरण, ब. ऊर्जा संक्रमण – i. अन्नसाखळी, ii. अन्नजाळी, 2.4 मानव-पर्यावरण सहसंबंध, i. विषुववृत्तीय प्रदेशातील मानवी जीवन, ii. पर्वतीय प्रदेशातील मानवी जीवन, iii. किनारवर्ती प्रदेशातील मानवी जीवन
  3. जैवविविधता आणि पर्यावरणीय समस्या : 3.1 जैवविविधता : व्याख्या आणि जैवविविधतेचे प्रकार, अ) अनुवांशिक विविधता ब) जातींची विविधता क) परिसंस्था विविधता, 3.2 जैवविविधता संवर्धनाच्या पद्धती : मूलस्थानी आणि परस्थानी संरक्षण, 3.3 मुख्य पर्यावरणीय समस्या : कारणे आणि प्रतिकूल परिणाम, 1) अवकाळी पाऊस 2) वादळ 3) जैवविविधतेचा र्‍हास 4) घनकचरा, 5) द्रव कचरा 6) हवा प्रदूषण, 3.4 प्रदूषण नियंत्रणाचे पर्यावरणीय व्यवस्थापन, अ) हवा प्रदूषण ब) जल प्रदूषण
  4. पर्यावरणीय धोरण : 4.1 राष्ट्रीय पर्यावरण धोरण : प्रस्तावना आणि उद्दिष्टे, 4.2 धोरणांवर आधारित अंमलबजावणी, 4.2.1 जमिनीची धूप, 4.2.2 वने आणि वन्यजीव संवर्धन, 4.3 विकसित व विकसनशील देशातील पर्यावरण रक्षणाचे उत्पन्न

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यावरण भूगोल”
Shopping cart