Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

राजर्षी शाहू महाराजांची निवडक 16 भाषणे

Rs.160.00

‌‘राजर्षी शाहू महाराजांची निवडक 16 भाषणे’ या पुस्तकाचे संपादक डॉ. अनंता सूर यांचे सधन्यवाद अभिनंदन करतो. नवे अभ्यासक अध्यापक फुले- शाहू-आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची आणि क्रांतिकार्याची आपल्या बौद्धिक जीवनाच्या केंद्रस्थानी आदरपूर्वक प्रस्थापना करीत आहेत याचा मला विशेष आनंद वाटतो. कारण या त्रिसरणाचा प्रकाशदंड सकलांच्या समान ऐहिक हितसंबंधांचाच मूल्यदंड आहे. या प्रक्रियेचे क्षितिज विस्तारले तर महाराष्ट्रात आज आवश्यक त्या क्रांतिकारी ज्ञानसंस्कृतीचा प्रकर्ष होऊ शकतो.
राजर्षी शाहू महाराजांनी समान मानवी सन्मानासाठी अन्यायी ब्राह्मणी व्यवस्थेशी निकराचा संघर्ष केला. ही शाहू महाराजांची भूमिका पूर्णतः व्यवस्थाबदलाचीच आहे. परंपरादासांना मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी मानवाधिकारांची पायाभूत लढाई सुरू केली. शिक्षण, आरक्षण ही त्यांची कार्ये सर्वमानवसमभावी आहेतच पण ‌‘जातिभेद मोडून आपण सर्व एक होऊ’ ही त्यांची भूमिका आमूलाग्र क्रांतीची प्रकाशवाट निर्माण करणारीच आहे. सर्वांच्या समान मानवी प्रतिष्ठेची महत्ता त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायानेच पटवून दिली.
शाहू महाराजांच्या भाषणांनी वंचित लोकांना समान मानवाधिकारांसाठी लढायला शिकविले. त्यांच्या चळवळीमधून उगवलेली लोकशाही भेदातीत माणसांचा सिद्धान्त झाली. डॉ. अनंता सूर यांचे हे संपादन वाचकांच्या मनात शाहू महाराजांची भेदातीत लोकशाही प्रखर करील ही खात्री मला आहे.

Rajarshri Shahu Maharajanchi Nivadak 16 Bhashane

 1. पूर्वजांची कीर्ती निष्कलंक राखावी!
 2. शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे!
 3. आपल्या हक्कासाठी झगडा!
 4. इंग्लंडप्रमाणे मजुराचे संघ झाले पाहिजेत!
 5. आर्यधर्म समता व राष्ट्रैक्य वाढवील!
 6. हा विद्येचा समय आहे!
 7. आर्यधर्म विश्वव्यापी धर्म बनेल!
 8. आपल्या जातीचा पुढारी करा!
 9. जातिभेद मोडून आपण सर्व एक होऊया!
 10. विद्यामृतासाठी तुम्हीच कंबर कसा!
 11. जनी जनार्दन शोधणे हाच खरा धर्म!
 12. पृथ्वीवर ‌‘ब्राह्मण’ मुळीच नाहीत!
 13. सामाजिक नीतिमत्तेची वाढ हे समाजसुधारणेचे महत्त्वाचे अंग
 14. बौद्धिक गुलामगिरीतून सुटून जा!
 15. जातीचा अभिमान मर्यादित असावा!
 16. आपले हक्क बजावले पाहिजेत!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजर्षी शाहू महाराजांची निवडक 16 भाषणे”
Shopping cart