Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

बँकींगची तत्त्वे आणि व्यवहार

Principles & Practices of Banking

Rs.450.00

बँकींग हा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचा आत्मा आहे. व्यावसायिक / उद्योजक कितीही हुशार, कार्यक्षम आणि त्याच्या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसेल तर तो यशस्वी ठरु शकत नाही. बँकींग हा व्यवसायाचा असा एक भाग आहे जो जनतेकडून ठेवी स्विकारुन उद्योग-व्यवसायाला भांडवल उपलब्ध करुन देण्याचे मध्यस्थ म्हणून कार्य करतो. ज्या देशातील बँकींग आणि वित्तीय प्रणाली विकसित आहे त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो. बँकींग प्रणाली ही अर्थव्यवस्था रुपी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य करते.

Bankingchi Tatve ani Vyavhar

  1. पैसा : 1.1 पैशांची उत्क्रांती, 1.2 पैसा : व्याख्या आणि अर्थ, 1.3 पैशाची कार्ये, 1.4 आधुनिक अर्थव्यवस्थेतील पैशाची भूमिका आणि महत्त्व, 1.5 पैशाचे प्रकार, 1.6 पैशाचा चक्राकार प्रवाह.
  2. बँकींग : अर्थ आणि कार्ये : 2.1 बँकांची उत्क्रांती, 2.2 बँक : अर्थ अणि व्याख्या, 2.3 बँकाची कार्ये आणि सेवा, 2.4 आर्थिक विकासातील व्यापारी बँकांची भूमिका, 2.5 भारतीय बँकींग प्रणालीची संरचना.
  3. बँकांचे वर्गीकरण आणि प्रकार : 3.1 बँकांचे रचनात्मक वर्गीकरण, 3.2 बँकांचे कार्यात्मक वर्गीकरण, 3.3 बँकांचे मालकीनुसार वर्गीकरण, 3.4 आधुनिक बँका.
  4. भारतातील पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम : 4.1 बँक उत्पादने/सेवांमधील तंत्रज्ञान, 4.2 भारतातील देणी देण्याच्या (भुगतान) आणि हिशेब पूर्ती, (निपटारा) करण्याच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीची उत्क्रांती.
  5. बँका, ग्राहक आणि बँकांचे व्यवहार – 1 : 5.1 बँक खात्याचे प्रकार, 5.2 बँकेत खाते उघडणे आणि खाते बंद करणे पद्धती, 5.3 के.वाय.सी. तुमच्या ग्राहकाची ओळख, 5.4 ग्राहकांचे/खातेदारांचे प्रकार.
  6. बँका, ग्राहक आणि बँकांचे व्यवहार – 2 : 6.1 कर्ज सुविधांचे प्रकार, 6.2 चलनक्षम दस्तऐवज, 6.3 धनादेश, 6.4 प्रदायी बँक, 6.5 वसुली बँक, 6.6 धनादेशाचे रेखांकन, 6.7 पृष्ठांकन, 6.8 प्रदायी बँकर/पैसे देणारी बँक/पेढी, 6.9 धनादेश स्वीकारताना घ्यावयाची काळजी/दक्षता, 6.10 धनादेशाचा अनादर, 6.11 धनादेशाची रक्कम देणाऱ्या बँकेस कायदेशीर संरक्षण.
  7. ताळेबंद आणि बहुगुणीत पतनिर्मिती : 7.1 बँकांचे ताळेबंद, 7.2 पतनिर्मिती, 7.3 पतनिर्मिती प्रक्रिया, 7.4 पतनिर्मिती प्रक्रियेच्या मर्यादा.
  8. सुदृढ बँकींगची तत्वे : 8.1 सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता, 8.2 बँकीगची तत्वे, 8.3 रोखता आणि लाभप्रदता यांच्यात परस्पर विरोध, 8.4 रोखता आणि लाभप्रदता या तत्वामध्ये समन्वय/सलोखा, 8.5 अनुत्पादक मालमत्ता संकल्पना.
  9. मध्यवर्ती बँक : 9.1 मध्यवर्ती बँक, 9.2 मध्यवर्ती बँकेची कार्ये, 9.3 मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यातील फरक, 9.4 मध्यवर्ती बँकेची अर्थव्यवस्थेतील भूमिका, 9.5 भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना व संघटन, 9.6 भारतीय रिझर्व्ह बँकेची विकासात्मक आणि प्रवर्तनात्मक कार्ये.
  10. चलन विषयक धोरण : 10.1 चलन विषयक/मौद्रिक धोरण, 10.2 चलनविषयक धोरणाचे लक्ष्य, 10.3 भारतीय रिझर्व्ह बँक आणि पत नियंत्रण, 10.4 पतनियंत्रणाची चलन विषयक साधने, 10.5 भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्पकालीन रोखतेचे व्यवस्थापन, 10.6 रोखता समायोजन सुविधा.
  11. वित्तीय बाजार : 11.1 नाणे बाजार, 11.2 भांडवल बाजार, 11.3 भारतीय भांडवल बाजारातील सहभागक.
  12. ग्रामीण वित्त, आर्थिक समावेशन आणि सूक्ष्म वित्त : 12.1 ग्रामीण वित्तपुरवठा, 12.2 ग्रामीण भागाला व शेतीला पतपुरवठ्याची गरज, 12.3 ग्रामीण भागात व शेतीसाठी कर्जपुरवठ्याची साधने, 12.4 वित्तीय समावेशन, 12.5 सूक्ष्म वित्तपुरवठा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बँकींगची तत्त्वे आणि व्यवहार”
Shopping cart