Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)

Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)

 • ISBN: 9789395227216
 • Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)
 • Published : October 2022
 • Book Language : Marathi
 • Edition : First
 • Format : Paperback
 • Pages : 232
 • Categories: ,
 • Download Book Ebook Link

Rs.295.00

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपलाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन केले. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घडामोडींची माहिती या ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत भाषेत, मुद्देसूद केलेली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी, वाचकांना समजण्यास सोपे जावे म्हणून प्रत्येक ठिकाणी चौकटींची रचना करून त्यात मुद्दे दिले आहेत. चित्रांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात भारतात ब्रिटिशांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्तास्थापनेपर्यंतचा, 1857 चा उठाव, कारणे आणि परिणाम, भारतातील सामाजिक, धार्मिक, सुधारकांचे कार्य, काँग्रेसची स्थापना, मवाळ-युग, टिळक युग, गांधी युग, भारतातील क्रांतीकारक, मुस्लिम लिग व भारताची फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी पाठविलेल्या विविध समित्या, यांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्यांचीही माहिती आलेली आहे. एकूणच भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळून 1950 मध्ये घटना लागू होऊन भारत लोकशाहीप्रधान देश बनण्यापर्यंतची ऐतिहासिक माहिती म्हणजे हा ग्रंथ!

Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)

 1. भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विकास : 1.1 भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदय आणि विकास : संक्षिप्त आढावा, 1.1.1 भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदय, 1.1.2 भारतातील ब्रिटिश सत्तेचा विकास (1856 पर्यंत), 1.2 इ.स.1857 चा उठाव, 1.2.1 इ.स.1857 च्या उठावाची कारणे, 1.2.2 इ.स.1857 च्या उठावाचे परिणाम.
 2. सामाजिक आणि धार्मिक समाजसुधारक : 2.1 राजा राममोहन रॉय, 2.1.1 संक्षिप्त जीवनचरित्र, 2.1.2 सामाजिक-धार्मिक कार्य, 2.1.3 कार्याचे मूल्यांकन, 2.2 स्वामी दयानंद सरस्वती, 2.2.1 संक्षिप्त जीवनचरित्र, 2.2.2 सामाजिक-धार्मिक कार्य, 2.2.3 कार्याचे मूल्यांकन, 2.3 स्वामी विवेकानंद, 2.3.1 संक्षिप्त जीवनचरित्र, 2.3.2 सामाजिक-धार्मिक कार्य, 2.3.3 कार्याचे मूल्यांकन, 2.4 महात्मा जोतीबा फुले, 2.4.1 संक्षिप्त जीवनचरित्र, 2.4.2 सामाजिक-धार्मिक कार्य, 2.4.3 कार्याचे मूल्यांकन, 2.5 सावित्रीबाई फुले, 2.5.1 संक्षिप्त जीवनचरित्र, 2.5.2 सामाजिक-धार्मिक कार्य, 2.5.3 कार्याचे मूल्यांकन, 2.6 राजर्षी शाहू महाराज, 2.6.1 संक्षिप्त जीवनचरित्र, 2.6.2 सामाजिक-धार्मिक कार्य, 2.6.3 कार्याचे मूल्यांकन, 2.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 2.7.1 संक्षिप्त जीवनचरित्र, 2.7.2 सामाजिक-धार्मिक कार्य, 2.7.3 कार्याचे मूल्यांकन.
 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : 3.1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना : उदयाची कारणे व ध्येय-उद्दिष्ट्ये, 3.1.1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची कारणे, 3.1.2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, 3.1.3 राष्ट्रीय सभेची ध्येयधोरणे/उद्दिष्ट्ये, 3.2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी (1885-1905), 3.3 मवाळ गट, 3.3.1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 3.3.2 फिरोजशहा मेहता, 3.3.3 दादाभाई नौरोजी, 3.3.4 गोपाळ कृष्ण गोखले, 3.3.5 महादेव गोविंद रानडे, 3.4 बंगालची फाळणी.
 4. जहालवादाचा उदय आणि क्रांतीकारी चळवळी : 4.1 जहालवादाचा कालखंड, 4.1.1 लोकमान्य टिळक, 4.1.2 सुरत अधिवेशन, 1907, 4.1.3 होमरुल चळवळ, 1916, 4.2 क्रांतीकारी चळवळी, 4.2.1 अभिनव भारत, 4.2.2 अनुशिलन समिती, 4.2.3 गदर पक्ष, 4.2.4 हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन.
 5. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळ : 5.1 महात्मा गांधी, 5.2 असहकार चळवळ : कारणे आणि परिणाम, 5.3 सविनय कायदेभंग चळवळ, 5.4 चले जाव चळवळ, 5.5 सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज.
 6. भारताची फाळणी आणि स्वातंत्र्य : 6.1 क्रिप्स मिशन, वेव्हेल योजना, कॅबिनेट मिशन, माऊँटबॅटन योजना आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, 1947, 6.1.1 क्रिप्स मिशन/योजना, 6.1.2 वेव्हेल योजना, 6.1.3 कॅबिनेट मिशन / त्रिमंत्री योजना, 6.1.4 माऊंटबॅटन योजना, 6.1.5 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, 1947, 6.2 मुस्लिम लीग आणि भारताची फाळणी, 6.3 भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)”
Shopping cart