Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

पर्यटन भूगोल

Geography of Tourism

, , ,

Rs.225.00

आजच्या जागतिकीकरणाच्या काळात बहुतेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा वाढला असून आज पर्यटन ही जागतिक स्तरावरील एक महत्वाची आर्थिक क्रिया बनली आहे. सुरुवातीस उदरनिर्वाह, व्यापार, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा वेगवेगळ्या कारणांनी पर्यटन होत असे. सध्या मौजमजा, विरंगुळा, आनंद तसेच समाधान मिळविण्यासाठी पर्यटन केले जाते. मानवाला निसर्ग सौंदर्य, प्राकृतिक भूरूपे, ऐतिहासिक वास्तू, शिल्पे, धार्मिक स्थळे, उत्सव, शैक्षणिक ठिकाणे, स्मारके, आरोग्यदायी हवामान असे वेगवेगळे घटक आकर्षित करत असतात. मानव अशा आकर्षित करणाऱ्या घटकांना प्रतिसाद देऊन त्या स्थळांना भेट देण्यासाठी प्रवास करतो. या सर्व क्रियेतून त्याला आनंद तसेच समाधान मिळते. एकविसाव्या शतकात जगातील अतिशय वेगाने विकसित होणारा आणि भरपूर उत्पन्न मिळवून देणारा एक उद्योग म्हणून पर्यटन उद्योग विकसित होत आहे. कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाची निर्यात न करता देशाला परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन हा जगातला एकमेव उद्योग आहे.

Paryatan Bhugol

  1. प्रस्तावना : 1.1 व्याख्या आणि स्वरूप, 1.1.1 पर्यटक आणि पर्यटनाच्या व्याख्या, 1.1.2 पर्यटनाचे स्वरूप, 1.1.3 पर्यटनाचे महत्व, 1.2 व्याप्ती आणि विस्तार, 1.2.1 पर्यटन व प्रवास मानवाच्या मूलभूत गरजा, 1.2.2 पर्यटन आणि विकास, 1.2.3 पर्यटन उत्पादन, 1.3 पर्यटनातील भूगोलाची भूमिका.
  2. पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक : 2.1 प्राकृतिक घटक, 2.1.1 उठाव/भूरूपे, 2.1.2 हवामान, 2.1.3 जंगले, 2.2 सामाजिक-सांस्कृतिक घटक, 2.2.1 धार्मिक घटक, 2.2.2 ऐतिहासिक घटक, 2.2.3 क्रीडा पर्यटन, 2.3 राजकीय घटक, 2.3.1 धोरणे, 2.3.2 पर्यटकांची सुरक्षितता, 2.3.3 सुलभता.
  3. पर्यटनाच्या संकल्पना व वर्गीकरण : 3.1 पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.1 राष्ट्रीयत्वाच्या आधारे पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.2 प्रवास कालावधीवर आधारित पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.3 उद्देशानुसार पर्यटनाचे वर्गीकरण, 3.2 पर्यटन विषयक संकल्पना-1, 3.2.1 कृषी पर्यटन, 3.2.2 पर्यावरण पूरक पर्यटन, 3.2.3 वन्यजीव पर्यटन, 3.3 पर्यटन विषयक संकल्पना-2, 3.3.1 कल्याणकारी/निरोगीपणा पर्यटन, 3.3.2 आरोग्य/वैद्यकीय पर्यटन, 3.3.3 क्रीडा पर्यटन.
  4. पर्यटन विकासात वाहतूक व दळणवळणाची भूमिका : 4.1 वाहतुकीचे प्रकार, 4.1.1 जमिनीवरील वाहतूक – रस्ते व रेल्वे, 4.1.2 जल वाहतूक, 4.1.3 हवाई वाहतूक, 4.2 दळणवळण, 4.2.1 पर्यटन विकासात मार्गदर्शकाची भूमिका, 4.2.2 पर्यटन विकासात इंटरनेट, टेलिफोन, मोबाईल, दूरचित्रवाणीची भूमिका, 4.2.3 पर्यटन विकासात इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित प्रसार माध्यमांची भूमिका, 4.3 प्रवासी आणि पर्यटन एजन्सी.
  5. पर्यटनात निवासस्थानांची भूमिका : 5.1 निवासस्थानाचे प्रकार, 5.1.1 हॉटेल्स, मोटेल्स, पथिकाश्रम, धर्मशाळा, 5.1.2 शासकीय निवासस्थान, पर्यटक भवन, 5.1.3 खाजगी व इतर निवासस्थाने, 5.2 निवासस्थानाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक, 5.3 पर्यटन विकासात निवासस्थानाची भूमिका.
  6. पर्यटनाचे परिणाम : 6.1 पर्यटनाचे आर्थिक परिणाम, 6.1.1 परकीय चलन, 6.1.2 रोजगार निर्मिती, 6.1.3 पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास, 6.2 पर्यटनाचे भौतिक व पर्यावरणीय परिणाम, 6.2.1 जमिनीचा ऱ्हास, 6.2.2 वनस्पती व प्राणी जीवनाचा ऱ्हास, 6.2.3 हवा व जलप्रदूषण, 6.3 पर्यटनाचे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम, 6.3.1 गुन्हेगारी व जुगार, 6.3.2 भाषा, 6.3.3 पारंपारिक कला.
  7. पर्यटन विकासातील नियोजन आणि धोरणे : 7.1 जागतिक पर्यटन संघटना (WTO), 7.2 भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC), 7.3 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC).
  8. भारतातील प्रमुख पर्यटन केंद्रे : 8.1 थंड हवेची ठिकाणे – मनाली, महाबळेश्वर, 8.2 ऐतिहासिक पर्यटन केंद्रे – ताजमहल, रायगड, 8.3 राष्ट्रीय उद्याने – काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मेळघाट.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यटन भूगोल”
Shopping cart