Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

प्रगत सामाजिक मानसशास्त्र

Advanced Social Psychology

, ,

Rs.195.00

सामाजिक मानसशास्त्राचा विकास सावकाश होत गेला. ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोच्या मते, व्यक्तीच्या विचारांवर व वर्तनावर त्याच्या समाजाचा प्रभाव पडतो. शिक्षणाच्या माध्यमातून मनुष्य त्याच्या जन्मजात प्रवृत्ती बदलू शकतो. थॉमस मूर यांनी सामाजिकरणाचे महत्त्व प्रतिपादित केले. कार्ल मार्क्स यांनी समूहाचे अस्तित्व मूलभूत मानले व समाजरचनेचा माणसाच्या स्वभावाशी, अभिवृत्तींशी आणि वर्तनाशी संबंध लावला. 1908 ते 1924 च्या दरम्यान सामाजिक मानसशास्त्र हे स्वतंत्र विज्ञानशाखा म्हणून उदयास आले. 1908 मध्ये विल्यम मॅकडुगल यांनी सामाजिक मानसशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले. त्यात मनुष्याच्या जन्मजात प्रवृत्तींवर, सहजप्रवृत्तींवर त्याचे सामाजिक वर्तन अवलंबून असते असे मत मांडले. 1950 ते 1970 च्या दरम्यान फेस्टिंजर, केली, ड्युश, थिबट, शॅक्टर यांनी सामाजिक मानसशास्त्रात उल्लेखनीय कार्य केले. 1960 च्या दशकात सामाजिक आंतरक्रियेच्या जवळपास सर्वच बाजूंवर म्हणजे आंतरव्यक्तिक आकर्षण, आरोपण, सामाजिक संवेदन, आज्ञापालन, अनुसरिता, आक्रमकता इत्यादी बाबींवर संशोधन करण्यात आले. 1980 च्या दशकात सामाजिक मानसशास्त्रात बोधात्मक दृष्टिकोनाचा अभाव व मानसशास्त्रीय तत्वांचे उपायोजन करण्याचा प्रभाव याबाबत उत्कर्ष झाला. व्यक्तीच्या वर्तनाचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राची निर्मिती झाली.

  1. सामाजिक मानसशास्त्राची ओळख : 1.1. सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या, 1.2. सामाजिक मानसशास्त्राचा इतिहास, 1.3 सामजिक मानसशास्त्रातील सिध्दांत, 1.4 सामजिक मानसशास्त्राच्या अभ्यास पध्दती, 1.5 सामजिक मानसशास्त्राचे शैक्षणिक क्षेत्रातील उपयोग
  2. सामाजिक जगातील ‘स्व’ : 2.1 स्व-संकल्पना, 2.2 ‘स्व’ च्या कार्याचे विविध घटक, 2.3 ‘स्व’ आदर, 2.4 स्व-सादरीकरण
  3. सामाजिक बोधन आणि सामाजिक संवेदन : 3.1 सामाजिक बोधन आणि संवेदन यांच्यातील फरक, 3.2 आकृतिबंधाचा सामाजिक बोधनावरील परिणाम, 3.3 आरोपण सिध्दांत, 3.4 आरोपण प्रमादांचे मूलभूत स्त्रोत, 3.5 उपयोजन
  4. मन वळविणे : 4.1 मन वळविण्या मागील बोधनिक प्रक्रिया, 4.2 मन वळविणे प्रक्रियेतील घटक, 4.3 प्रत्यक्ष जीवनात मन वळविणे -पंथ कशा पध्दतीने मन वळवितात, 4.4 मन वळविण्याच्या घटकांना प्रतिकार करणे
  5. अभिवृत्ती, पुर्वग्रह आणि साचेबंद कल्पना : 5.1 अभिवृत्तीची व्याख्या, 5.2 अभिवृत्तीचे मापन, 5.3 पूर्वग्रह – पूर्वग्रहाची व्याख्या आणि उगम, 5.4 साचेबंद कल्पना, 5.5 उपयोजन – पूर्वग्रह कमी करणे
  6. सामाजिक प्रभाव आणि समाजउपयोगी वर्तन : 6.1 सामाजिक प्रभाव – व्याख्या आणि स्वरुप, 6.2 अनुसारीता (अनुवर्तन), 6.3 अनुपालन, 6.4 समाजाभिमुख वर्तनामागील प्रेरणा, 6.5 उपयोजन
  7. समूह आणि व्यक्ती : 7.1 आपण समूह केव्हा जोडतो, केव्हा सोडतो, 7.2 इतरांच्या उपस्थितीचा परिणाम, 7.3 सामाजिक अंगचोरपणा : दुसर्‍याला काम करु द्या, 7.4 समूहातील समन्वयन – सहकार्य की संघर्ष, 7.5 समूहाद्वारे घेतले जाणारे निर्णय
  8. भारतीय समाजातील सध्याच्या सामाजिक समस्या : 8.1 सामाजिक समस्यांचे प्रकार, 8.2 लोकसंख्या विस्फोट, 8.3 गरीबीचा अर्थ आणि समस्या, 8.4 आक्रमकता : आक्रमकतेचे स्वरुप आणि अर्थ, 8.5 सामाजिक हिंसा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रगत सामाजिक मानसशास्त्र”
Shopping cart