Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

वैकासिक मानसशास्त्र

Developmental Psychology

Rs.195.00

वैकासिक मानसशास्त्राचा अभ्यासविषय हा ‌‘व्यक्ती विकास’ हा आहे. हा विकास कोणत्या टप्प्यावर कसा होत जातो? यातील शारीरिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक वाढ मुलांची कशी घडून येते? याची इत्थंभूत माहिती या शास्त्राच्या अभ्यासातून मिळणे सोईचे होते. व्यक्ती विकासाचे कार्य सुव्यवस्थितपणे व शिस्तबद्धरीत्या चालत असते. त्याचा बारकाईने व सुक्ष्मरीत्या अभ्यास करण्याचे कार्य ‌‘वैकासिक मानसशास्त्र’ करते.
एकंदरीत जन्मपूर्व अवस्थेपासून तर वृद्धावस्थेपर्यंत व्यक्तीतील सर्वांगीण विकासासाठी प्रक्रिया कशी घडून येते? संवेदनिक, कारक, बौद्धिक, स्व, तसेच मेंदूचा विकास याबाबत सर्वांनाच पडणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांची मांडणी अधिक सोप्या भाषेत या पुस्तकात केलेली आहे. या पुस्तकाची मदत समाजकार्य महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, अंगणवाडी, बालवाडी, सुधारगृहे, पाळणाघरे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, समुपदेशन व मार्गदर्शन केंद्रे इत्यादींना नक्कीच होईल.
पालकवर्गासाठी तर हे पुस्तक एक योगदानच ठरेल. या माध्यमातून लहान मुलांचा विकास कसा होतो? हे पालकांना माहिती झाल्याने मुलांच्या विकासासोबत आणखी ते जागरूकतेने कार्य करू शकतील.

Vaikasik Manasshastra

प्रकरण 1 
वैकासिक मानसशास्त्राचा इतिहास व मानवी विकास
वैकासिक मानसशास्त्राचा इतिहास, वैकासिक मानसशास्त्राची उद्दिष्ट्ये; मानवी विकास; मानवी विकासाचे घटक – शारीरिक विकास, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक विकास; मानवी विकासाच्या अवस्था – जन्मपूर्व अवस्था, जन्म ते 2 वर्ष, 3 ते 6 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 13 ते 18 वर्ष, 19 ते 40 वर्ष, 41 ते 60 वर्ष, 61 वर्ष ते मृत्यूपर्यंत; मानवी विकासावर परिणाम करणारे घटक – अनुवंश, परिस्थिती किंवा वातावरण; मानवी विकासाच्या अभ्यासपद्धती – निरीक्षण पद्धती, सहसंबंधात्मक अभ्यास पद्धती, मुलाखत पद्धती, व्यक्ती इतिहास पद्धती, समाजमिती पद्धती, प्रायोगिक पद्धती.

प्रकरण 2 
मानवी विकासाचे सिद्धांत
मानवी विकासाचे सिद्धांत – 1) मनोविश्लेषण सिद्धांत; मनोलैंगिक विकासाच्या अवस्था 2) व्यक्तिनिष्ठ सिद्धांत 3) विश्लेषण सिद्धांत 4) मनोसामाजिक सिद्धांत 5) वैकासिक परिपक्वता सिद्धांत 6) वर्तनवादी सिद्धांत 7) विकास कार्य सिद्धांत 8) प्रेरणा वर्चस्व श्रेणी सिद्धांत 9) ‌‘स्व’ सिद्धांत; कार्ल रॉजर्स यांचे ‌‘स्व’ चे प्रकार – 1) घटनात्मक ‌‘स्व’ 2) आदर्श ‌‘स्व’ 10) संबोध विकास जैव सिद्धांत; मानवी विकास आधारभूत घटक – 1) रचनात्मक पाया 2) अध्ययनाची संधी 3) आकृतिबंध 4) समतोलपणा 5) धोके समजावून घेणे 6) उद्दीपनाची आवश्यकता 7) अपेक्षित सांस्कृतिक मूल्यं; वैकासिक कार्ये – वैकासिक कार्याची उद्दिष्ट्ये, वैकासिक कार्याचे धोके.

प्रकरण 3 
जन्मपूर्व अवस्था
मूल जन्मास येण्यास आवश्यक घटक – 1) शुक्रजंतू 2) अंडपेशी 3) रंगसूत्रे व रंगमणी 4) फलन; गर्भधारणा; जन्मपूर्व विकासाच्या अवस्था – 1) अंडावस्था 2) भ्रूणावस्था 3) गर्भावस्था; प्रसूतिपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक – 1) आईवडिलांचे वय 2) आईचा आहार 3) आईचे आरोग्य 4) मादक पदार्थाचे सेवन 5) जीवनसत्त्वाची कमतरता 6) अंतस्त्रावी ग्रंथी 7) औषधे 8) गर्भाशयाची स्थिती 9) अवेळी प्रसूती 10) भावनिक स्थिती 11) क्ष-कीरण.

प्रकरण 4 
अर्भकावस्था
शारीरिक विकास; शारीरिक वाढीची तत्त्वे – 1) शीर्षपाद तत्त्व 2) केंद्रीय परिसरीय तत्त्वे 3) अधिश्रेणी एकात्मता तत्त्व 4) स्वतंत्र यंत्रणा तत्त्व; चेतासंस्था व मेंदू; सांवेदनिक विकास; बोधनिक विकास – 1) पहिली अवस्था 2) दुसरी अवस्था 3) तिसरी अवस्था 4) चवथी अवस्था 5) पाचवी अवस्था 6) सहावी अवस्था; माहिती संस्करण विकास, भाषिक विकास; मानसिक विकास; भावनिक विकास.

प्रकरण 5 
पूर्व बाल्यावस्था
शारीरिक विकास, मेंदूचा विकास, कारक विकास; शारीरिक व कारक विकासावर परिणाम करणारे घटक – 1) आनुवंशिकता 2) आहार 3) वातावरण; बोधात्मक विकास – 1) प्रतिनिधित्व 2) वस्तू नसताना अनुकरण करणे 3) प्रतिनिधिक खेळ 4) चित्र रेखाटन 5) मानसिक प्रतिरूपे; मुलांच्या मनाचा सिद्धांत; माहिती संस्करण विकास; भाषिक विकास – 1) 27 ते 30 महिने 2) 31 ते 34 महिने 3) 35 ते 40 महिने 4) 41 ते 48 महिने; भाषा विकासावर परिणाम करणारे घटक – 1) कुटुंब 2) शेजारी 3) बालवाडी व शाळा; स्व विकास.

प्रकरण 6 
मध्यम बाल्यावस्था
शारीरिक विकास – 1) आहार 2) आनंदीदायी वातावरण 3) आरोग्य; मानसिक विकास; बोधात्मक विकास – 1) धारणीकरण 2) अनुक्रमण 3) वर्गीकरण 4) उलटक्रम 5) गणिती क्षमता; विचार कौशल्य; कारक विकास – 1) तोल सांभाळणे 2) लवचिकता; विचार आणि समस्या परिहार; नैतिक विकास; नैतिक विकासाचे सिद्धांत – 1) पियाजे याचा नैतिक विकासाचा सिद्धांत 2) कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत.

प्रकरण 7 
किशोरावस्था
शारीरिक विकास – मुलींमधील शारीरिक बदल, मुलांमधील शारीरिक बदल, मुलींमधला कालखंड, मुलांमधला कालखंड, मुलींमधली प्रजननसंस्था, मुलांमधील प्रजनन संस्था; स्व-विकास – स्व-ओळख; स्व संकल्पना – 1) परिपक्वता 2) बाह्यरूप 3) लैंगिकता 4) आदर्श 5) समाज 6) इतर घटक; स्व-आदर; स्व-ओळखीचा दृष्टिकोन – 1) स्व-ओळख संपादन 2) स्व-ओळख त्याग 3) विश्रांती कालखंड 4) विस्तारीत स्व; जैव मनोसामाजिक सिद्धांत; मानसशास्त्रीय सिद्धांत; मनोसामाजिक सिद्धांत.

प्रकरण 8 
पूर्व प्रौढावस्था
शारीरिक विकास; बोधात्मक विकास; वैयक्तिक विकास; जीवन ऋतू; नावीन्यपूर्ण काळ; आपलेपणा आणि एकलकोंडेपणा; लैंगिक ओळख आणि भूमिका; कार्य आणि जीवनमार्ग; व्यक्तिमत्त्व संदर्भ सिद्धांत –
1) वास्तववादी 2) संशोधक 3) कलात्मक 4) सामाजिक 5) रूढिप्रिय
6) उद्यमशील; वैवाहिक व कौटुंबिक स्थिती.

प्रकरण 9 
मध्यम प्रौढावस्था
शारीरिक विकास; बोधात्मक विकास; संबंध विकास; कार्यातील बदल; स्त्रिया कार्यातील बदल; व्यक्तिगत जाणीव.

प्रकरण 10 
उत्तर प्रौढावस्था
शारीरिक विकास; वेदनिक विकास; मानसिक विकास; संबंध विकास; मृत्यूच्या अवस्था – मृत्यूला नकार, राग किंवा संताप, देवअर्चना, नैराश्य, स्वीकार; मृत्यूचे स्वरूप – जगण्याची इच्छा नसणे, दयामरण, मृत्यूचे ठिकाण, कायदेशीर हक्क; वृद्धत्व सिद्धांत – वापर आणि झीज सिद्धांत, विरुद्ध संबंध सिद्धांत, अनुवंश सिद्धांत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैकासिक मानसशास्त्र”
Shopping cart