Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

समायोजनाचे मानसशास्त्र

The Psychology of Adjustment

, , ,

Rs.395.00

‌‘समायोजनाचे मानसशास्त्र’ या पुस्तकात मनःस्तरावरील उलथापालथीचा आढावा घेताना नोंदविलेले दिसून येते. मानवाचे विज्ञानाच्या प्रगती बरोबर त्याच्या मानसिकतेचे उन्नय झाले नाही. विज्ञानाबरोबर गतिशील न राहता तो मानसिक दृष्ट्या स्थितीवादी राहिला. भौतिक प्रगतीच्या असोशीतून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात मानवी मन तडफडत राहिले. भारतीय परिप्रेक्षात मानवी जीवनाचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते, की मानवाने वैज्ञानिक प्रगती बरोबर कर्मकांडाचा कमंडलू सोबत घेतल्यामुळे तो इतर देशातील मानवाच्या तुलनेत अधिक भ्रमिष्ट झाल्याचे दिसून येते. भारतात 1990 नंतर खुल्या बाजारपेठेमुळे यंत्रयुगाने बऱ्यापैकी आपले पाय पसरले आहेत. यंत्राने मानवी मनाचा कब्जा घेऊन भावनिकतेला पर्यायाने नातेसंबंधाला तिलांजली दिलेली असताना, एकाकी झालेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मानवी वर्तनाच्या आणि मानसिकतेच्या प्रश्नावर मानवाच्या समायोजनावरील हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल. 21 वे शतक हे गुंतागुंतीचे आणि धावपळीचे असून यंत्राने आपल्या अजस्त्र बाहूत मानवी जीवन कवटाळून त्याचे वर्तन अंकित केल्याचे दिसून येते. या शतकातील मानवी वर्तनाचा त्याच्या मनाच्या स्थिती आणि गतीचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण समायोजनाचे मानसशास्त्र या पुस्तकात केला आहे.
21 व्या शतकातील मानवी जीवन कमालीचे अभावग्रस्त झाले आहे. या अभावग्रस्त दुनियेतील एकांतपणा माणसाला पोखरून टाकणारा आहे. मानव स्वांतसुखाय होण्यासाठी धडपडत आहे. भौतिक साधनांच्या आणि यांत्रिक वस्तूंच्या जंजाळात अडकून पडलेला मानव भौतिक सुविधा व यंत्र युगातून मिळालेल्या तंत्राशी खेळत हस्तिदंती मनोऱ्यातील आभासी जीवन जगतानाचे त्याचे कोरडेपण त्याच्या वाट्याला आले आहे. या सर्व मानवी वर्तन व्यवहाराचा, मनोसामाजिक स्तरावरील विविध पैलूंचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. एकूणच मानवी मनाला आत डोकवायला लाऊन तंत्र युगाच्या आभासी दुनियेत स्वान्तसुखाय झालेल्या माणसाला सभोवतालतेबरोबरच मानवी अस्तित्वाचा परिचय करून, त्याला कृतीप्रवण करणारे हे पुस्तक मानवी जीवन सुखावह करण्यात मोलाची भूमिका घेईल यात मुळीच शंका नाही.

Samayojnache Mansshastra

प्रकरण 1 :

‌‘स्व’ संकल्पना (‘Self’ Concept)

‌‘स्व’ संकल्पना
(Self Concept)
‌‘स्व’ संकल्पनेचे स्वरूप
(Nature of The Self-Concept)
‌‘स्व’ संकल्पना आकाराचे घटक
(Factors Shaping The Self Concept)
‌‘स्व’ आदरभाव
(Self Esteem)
‌‘स्व’ आदरभाव विकास
(The Development Of Self Esteem)
‌‘स्व’ संवेदन मुलभूत तत्त्वे
(Basic Principles of Self Perception)
‌‘स्व’ नियमन
(Self Presentation)
‌‘स्व’ सादरीकरण
(Self Presentation)
उपयोजन : ‌‘स्व’ आदरभावाची उभारणी
(Building Self-Esteem)

प्रकरण 2 :

मैत्री आणि प्रेम (Friendship and Love)

जवळील नातेसंबंध यावर दृष्टिकोन
(Perspective on Close Relationship)
प्रारंभिक आकर्षण आणि संबंध विकास
(Initial Attraction and Relationship Development)
मैत्री
(Friendship)
उपयोजन : एकाकीपणावर मात
(Overcoming Loneliness)

प्रकरण 3 :

आंतरवैयक्तिक संप्रेषण (Interpersonal Communication)
आंतरवैयक्तिक संप्रेषणाची प्रक्रिया
(The Process of Interpersonal Communication)
संप्रेषण आणि समायोजन
(Communication and Adjustment)
अधिक प्रभावी संप्रेषणाच्या दिशेने
(Towards More Effective Communication)
संप्रेषणातील समस्या
(Communication Problem)
आंतरवैयक्तिक संघर्ष
(Interpersonal Conflict)
उपयोजन : ठाम प्रतिपादनशील संप्रेषण विकसित करण्याच्या शैली
(Developing an Assertive Communication Style)

प्रकरण 4 :

कारकीर्द आणि कामे (Career and Work)

कारकिर्दीची निवड
(Choosing a Career)
हॉलंडचा गुणवैशिष्ट्य मापन व अनुरूप प्रारूप
(Holland’s Trait Measurement and matching model)
कार्य व जीवनातील अन्य बाबींचे संतुलन
(Work and Other Spheres of Life)
उपयोजन : नोकरी मिळविण्यासाठी सरसावणे
(Application : Getting Ahead in the job game)

प्रकरण 5 :

विवाह आणि जिव्हाळ्याचे संबंध (Marriage and Intimate Relationship)

विवाहाच्या रूढीवादी प्रारूपास आव्हान
(Challenge to the Traditional Model of Marriage)
कौटुंबिक जीवनचक्रापलीकडील वैवाहिक समायोजन
(Marital Adjustment Across the Family Lifecycle)
वैवाहिक समायोजनातील दुबळी/कमकुवत बाजू
(Vulnerable Areas in Marital Adjustment)
घटस्फोट
(Divorce)
उपयोजन : जिव्हाळ्याच्या नात्यामधील हिंसेला समजणे
(Application Understanding Intimate Violence)

प्रकरण 6 :

ताण आणि त्याचे परिणाम (Stress and Its Effects)

ताणाचे स्वरूप
(The Nature of Stress)
तणाव दैनंदिन जीवनाचा भाग
(Stress is an Everyday Event)
ताणाचे प्रमुख प्रकार
(Major Types of Stress)
ताण प्रतिसाद
(Responding to Stress)
भावनात्मक उत्तेजनाचा प्रभाव
(Effects of Emotional Arousal)
ताण संभाव्य प्रभाव
(The Potential Effects of Stress)
ताण सहनशीलता प्रभावित कारक
(Factors Influencing Stress Tolerence)
उपयोजन : ताणावरील देखरेख
(Monitoring Your Stress)

प्रकरण 7 :

मानसशास्त्र आणि शारीरिक आरोग्य (Psychology and Physical Health)

ताण व्यक्तित्व आणि आजार
(Stress Personality and Illness)
जीवनशैली, सवय आणि आरोग्य
(Lifestyle, Habits and Health)
आजारपणाची प्रतिक्रिया
(Illness Reaction)
औषधांच्या प्रभावांना समजणे
(Understanding the Effects of Drugs)

प्रकरण 8 :

प्रतिकार प्रक्रिया (Coping Process)

मर्यादित मूल्यांचे सामान्य प्रतिकार नमुने
(Common Coping Patterns of Limited Value)
रचनात्मक प्रतिकाराचे स्वरूप
(The Nature of Constructive Coping)
मूल्यांकन-केंद्रित रचनात्मक प्रतिकार
(Appraisal-Focused Construtive Coping)
समस्या-केंद्रित रचनात्मक प्रतिकार
(Problem Focused Constructive Coping)
भावना-केंद्रित रचनात्मक प्रतिकार
(Emotion-Focused Constructive Coping)
स्व:नियंत्रण प्राप्त करणे
(Achieving Self-Control)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समायोजनाचे मानसशास्त्र”
Shopping cart