Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

आधुनिक सामान्य मानसशास्त्र

Modern General Psychology

Rs.195.00

19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. मानसशास्त्राचे आजचे स्वरुप हे अत्यंत शास्त्रीय दिसून येते. मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी जर्मनीतील लाईपझिंग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा (1879) स्थापन करून मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास आणि वर्तनासंदर्भात अनेक पैलूंची माहिती मानसशास्त्रातील संशोधनामुळे आपल्याला मिळत आहे; ती माहिती शास्त्रशुद्ध स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदरील पुस्तकाचे प्रयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसशास्त्रात जे वेगाने बदल होत आहे त्यांचीही दखल घेतली गेली आहे. पुस्तकातील भाषा साधी, सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, मानसशास्त्राचे वाचक तसेच सर्वांना निश्चितच उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.

Adhunik Samanya Manasshastra

  1. मानसशास्त्राची ओळख : आधुनिक मानसशास्त्राची व्याखा, वर्तन म्हणजे काय?, मानसशास्त्रामध्ये प्राणी वर्तनांचा अभ्यास, मानसशास्त्र हे शास्त्र आहे का?, शास्त्राचे निकष, मानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्ट्ये – वर्तन आणि विचार प्रक्रिया यांच्याबद्दल माहिती मिळविणे
  2. व्यक्तिमत्त्व : स्वरूप आणि व्याख्या – व्यक्तिमत्त्व : महत्त्वाच्या व्याख्या; व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू – परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन, मनोशारीरिक प्रणाली, गतिशिल संघटन, वर्तनाची गुणवैशिष्ट्ये, व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत
  3. वर्तनाचे जैविक अधिष्ठान : रंगसुत्रे, डीएनए : लिंगनिश्चिती, जुळे – अनुवंश, अनुवंश यंत्रणा, लिंगनिश्चिती, रंगमणी, प्रभावी आणि दुर्बल रंगमणी; जुळी- एकपेशीय किंवा एकांड जुळी, , अनेकांड जुळी, चेतापेशी/नसपेशी रचना व कार्ये – चेतापेशींचे प्रमुख भाग – वृक्षिका, पेशी शरीर, पेशी केंद्रक, अक्षतंतू
  4. मानसिक क्षमता : बुद्धिमत्तेच्या व्याख्या – टर्मन, स्टर्न, स्पेन्सर, फे्रंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बिने, वेश्लर; बुद्धिमत्ता मापन आणि मुलभूत संकल्पना, बुद्धिमत्ता मापनाच्या संकल्पना, बुद्धिगुणांक, बुद्धिगुणांक व बौद्धिक स्तर/पातळी
  5. प्रेरणा आणि भावना : व्याख्या- गिलफोर्ड, नॉर्मन मन, बक, मॉर्गन; प्रेरणा चक्र – प्रेरणा चक्राचे स्पष्टीकरण- गरज, साधक वर्तन, उद्दीष्ट प्राप्ती; मॅस्लोची प्रेरणा वर्चस्व श्रेणी – वर्गीकरण – मूलभूत गरजा, मानसिक गरजा, उच्च मानसिक गरजा/स्व च्या परिपूर्णता; सिद्धांताचे स्पष्टीकरण – शारीरिक गरजा, सुरक्षितता गरजा, आपुलकी, प्रेम, जवळीकता, प्रतिष्ठा गरजा, आत्मवास्तविकिरण, प्रेरणांचे प्रकार
  6. अवधान आणि संवेदन : अवधानाचे स्वरूप – अवधान ही निवडक प्रक्रिया आहे, अवधानाची संवेदनेंद्रियांच्या समायोजनाची आवश्यकता, अवधानातील आसनिक समायोजन
  7. अध्ययन : अध्ययन : व्याख्या व स्वरूप – आर. एस. वुडवर्थ, रुक, नॉर्मन मन्, मॉर्गन, किंग व रॉबीन्सन, अध्ययन पद्धती, अभिजात अभिसंधान – प्रयोग; अभिजात अभिसंधानाची वैशिष्ट्ये
  8. स्मरण आणि विस्मरण : स्मृती – स्वरूप, व्याख्या; स्मृती प्रक्रियेमधील बाबी – सांकेतिकरण, साठवण, प्रत्यानयन (आठवण व उपयोग), स्मृतीचे प्रकार, दिर्घ स्मृतीचे प्रकार, धारणा मापनाच्या पद्धती, 8.4 विस्मरणाची कारणे/सिद्धांत, स्मृती सुधार तंत्रे – प्रेरणा, अवधान, उजळणी, घोकंपट्टी नको, व्याख्यानांची टिपणे घेणे, गोष्ट तयार करणे, सांक्षिप्तीकरण; सारांश

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक सामान्य मानसशास्त्र”
Shopping cart