Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

मूलभूत व सामाजिक मानसशास्त्र

Foundational and Social Psychology

Rs.195.00

मानसशास्त्र हे वर्तनाचा आणि मानसिक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे प्रगत असे शास्त्र मानले जाते. मानसशास्त्राचा कसा विकास होत गेला, मानसशास्त्राबद्दल समाजात असणारे अनेक गैरसमज त्यापैकी एक म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे का? आजही अनेक विचारवंत या शास्त्राला शास्त्र मानावयास तयार नाही. मानसशास्त्र देखील एक प्रगत असे शास्त्र आहे. तसेच वेगवेगळ्या कालखंडात मानसशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने झाला, मानसशास्त्राच्या विविध शाखा आणि महत्वाच्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास करणार आहोत.

सदर पुस्तकातील पहिल्या तीन प्रकरणात मानसशास्त्राचा परिचय, बोधात्मक प्रक्रिया व प्रेरणा व्यक्तीमत्व आणि बुद्धीमत्ता या तीन प्रकरणातून जास्तीत जास्त व सखोल माहिती उदाहरण, प्रयोगासह देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने नवीनच लागू केलेल्या व अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच सामाजिक मानसशास्त्राची ओळख, वैयक्तीक पातळीवरील प्रक्रिया समुह गतिकी या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक मानसशास्त्राची ओळख या प्रकरणात भारतातील सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास व वर्तनाचा बोधात्मक दृष्टीकोन यासारख्या नवीन घटकांचा सविस्तरपणे उल्लेख केला आहे. तसेच दुसर्‍या प्रकरणात आक्रमकता कारणे आणि आक्रमकता प्रतिबंध यासारख्या नवीन घटकांसह नियंत्रणांची साधने यांचाही उहापोह करण्यात आला आहे. समूह गतिकी या प्रकरणात समुहात सहभागी होण्याचे फायदे सहकार्य व संघर्ष आणि सोबत नव्यानेच मदत वर्तनात वाढ कशी करावी या सारखे मुद्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Mulbhut v Samajik Manasshastra

  1. मानसशास्त्राची ओळख : अ) मानसशास्त्र – व्याख्या व स्वरुप, वर्तन स्वरुप, ब) मानसशास्त्राच्या विचारप्रणाली, क) मानसशास्त्राची विविध क्षेत्रे, ड) मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, इ) मानसशास्त्रातील करिअर : भारतात मानसशास्त्राचा अभ्यास, सारांश, प्रश्नसंग्रह
  2. बोधात्मक प्रक्रिया : अ) अवधान : अवधानाचे स्वरूप, अवधानाचे प्रकार, अवधानाची नियामके, ब) संवेदन : स्वरूप, व्याख्या, संवेदन संघटनाची तत्त्वे, क) अभिसंधान : अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, निरिक्षणात्मक अध्ययन, ड) स्मृती : व्याख्या, प्रकार, स्मृती सुधार तंत्रे, इ) भावनाः व्याख्या, स्वरूप, भावनात्मक प्रतिक्रियांमधील शरीरांतर्गत आणि बाह्य परिवर्तने, भावनिक बुद्धीमत्ता
  3. प्रेरणा व्यक्तीमत्व आणि बुध्दीमत्ता : अ) प्रेरणा :  व्याख्या, प्रेरणा चक्र, जैविक प्रेरणा / शारीरिक प्रेरणा / प्राथमिक प्रेरणा, ब) व्यक्तिमत्त्व : स्वरूप आणि व्याख्या, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, व्यक्तीमत्वाच्या गैरसमजुती, क) व्यक्तिमत्त्वविषयक विविध प्रारूप, ड) बुद्धिमत्तेच्या व्याख्या : बुद्धिमत्ता मापन आणि मुलभूत संकल्पना, बुद्धिमत्ता मापनाच्या संकल्पना : शारिरीक वय, मानसिक वय, इ) बुद्धीमत्तेचे सिद्धांत
  4. सामाजिक मानसशास्त्राची ओळख : अ) सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या, स्वरुप : सामाजिक मानसशास्त्र शास्त्र आहे का?, ब) सामाजिक मानसशास्त्राचा इतिहास : भारतीय सामाजिक मानसशास्त्राचा इतिहास, स्वातंत्रत्तोर भारतातील सामाजिक मानसशास्त्र, क) सामाजिक वर्तनाच्या पातळ्या / स्तर, ड) सामाजिक वर्तनांचे दृष्टीकोन, इ) समाजाभिमुख वर्तन : समाजाभिमुख वर्तनामागील प्रेरणा
  5. वैयक्तीक पातळीवरील प्रक्रिया : अ) सामाजिक बोधन आणि सामाजिक संवेदन यातील फरक : सामाजिक बोधन, ब) आरोपण सिध्दांत : सुसंगत अनुमान सिद्धांत, क) अभिवृत्ती – व्याख्या, घटक, परिमिती व निर्मिती, ड) स्व-संकल्पना : ‘स्व’ ची जाणीव, सामाजिक ‘स्व’ चा विकास, इ) आक्रमकता : आक्रमक वर्तनाचे प्रकार : आक्रमकतेचे सिद्धात, आक्रमक वर्तन : प्रतिबंध आणि नियंत्रण
  6. समूह गतिकी : अ) समुहाची मुलभूत वैशिष्टये : आपण समुहात केव्हा सहभागी होतो, व्यक्ती समुह का सोडते?, समुहात असण्याचे फायदे/जोडण्याचे फायदे, ब) सहकार्य आणि संघर्ष : सहकार्य, संघर्ष, संघर्षाचे परिणाम, संघर्ष सोडविण्याची काही उपयुक्त तंत्रे, संघर्ष निराकरण किंवा शांतता निर्मिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मूलभूत व सामाजिक मानसशास्त्र”
Shopping cart