Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

मानसशास्त्रातील करिअर आणि संधी

Career and Opportunity in Psychology

Rs.160.00

सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रातच फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळेल अशी शाश्वती देता येत नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांना नोकरीविना तसेच व्यवसायाशिवाय राहावे लागते. यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव, चिंता व नैराश्य निर्माण होते. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ‌‘करिअर’ संदर्भात असणाऱ्या माहितीचा अभाव होय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ‌‘करिअर’ संदर्भात माहिती देणारे कोणतेही पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही.
म्हणूनच मानसशास्त्र या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? नोकरीसाठी कोणते क्षेत्र निवडावे? या प्रश्नाचे निराकरण व्हावे या दृष्टीने मानसशास्त्रामधील करिअर व संधी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. या पुस्तकामध्ये मानसशास्त्रामधील व्यवसाय मार्ग, क्षेत्रे, शिक्षण देणाऱ्या संस्था, पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण व करिअर संधी, नोकरी उपलब्ध असणाऱ्या संस्था इत्यादीची इत्थंभूत माहिती दिलेली आहे.
‌‘मानसशास्त्रातील करिअर आणि संधी’ हे पुस्तक पालकांना तर उपयोगी ठरेलच सोबतच मानसशास्त्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा मार्गस्त्रोत ठरेल.

Manasshastriya Career V Sandhi

प्रकरण 1 
मानसशास्त्राची ध्येये व व्यवसाय मार्ग
प्रस्तावना, मानसशास्त्र एक विज्ञान, व्याख्या, मानसशास्त्राची ध्येये, मानसशास्त्राचा इतिहास, मानसशास्त्राचे दृष्टिकोन, भारतामधील मानसशास्त्र : आद्य आणि सद्यःस्थिती, मानसशास्त्रातील व्यवसायविषयक मार्ग आणि क्षेत्रे, मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती

प्रकरण 2 
मानसशास्त्र शिक्षणाचा आरंभबिंदू
उच्च माध्यमिक स्तर, पदवी स्तर, पदव्युत्तर स्तर, संशोधन स्तर-मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फील.), डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.), नेट-सेट

प्रकरण 3 
विविध शैक्षणिक स्तरावर उपलब्ध विषय व शैक्षणिक संस्था
उच्च माध्यमिक स्तर, पदवी स्तर, पदव्युत्तर स्तर, सर्टीफीकेट/डिप्लोमा कोर्स, संशोधन स्तर-एम.फील, पीएच.डी.

प्रकरण 4 
पदवी शिक्षण आणि करिअर संधी
केस व्यवस्थापक, बाजार संशोधक, जाहिरात प्रतिनिधी, सामाजिक सेवा विशेषतज्ञ, लेखक, प्रोबेशन आणि पॅरोल अधिकारी, बाल संगोपन कार्यकर्ता, पुनर्वसन विशेषतज्ञ, प्रयोगशाळा सहायक, विक्री प्रतिनिधी, मनोदोषचिकीत्सक तंत्रज्ञ

प्रकरण 5 
पदव्युत्तर शिक्षण आणि करिअर संधी
मानवी संसाधन व्यवस्थापक, कर्मचारी प्रशिक्षक, सार्वजनिक संबंध प्रतिनिधी, प्रकल्प व्यवस्थापक, संग्रह व्यवस्थापक, व्यावसायिक पुनर्वसन प्रदाता, रोजगार समुपदेशक, विकासात्मक विशेषतज्ञ, मानसशास्त्र कार्यक्रम व्यवस्थापक, पुनर्वसन समुपदेशक, सामाजिक सेवा व्यवस्थापक, वर्तनात्मक समुपदेशक, आरोग्य प्रकल्प समन्वयक, कुटुंब सेवा कार्यकर्ता, बालसंगोपन पर्यवेक्षक, पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ, पदार्थ दुरुपयोग समुपदेशक, सायकोमेट्रीस्ट, वैवाहिक आणि कौटुंबिक उपचार तज्ज्ञ, मानवी संसाधन मानसशास्त्रज्ञ, करिअर समुपदेशक, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक किंवा संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, मनोचिकीत्सक

प्रकरण 6 
नोकरीची उपलब्धता असणाऱ्या संस्था
पुनर्वसन केंद्र, मानसशास्त्रीय संशोधन केंद्र, जाहिरात उद्योग, शासकीय व खाजगी शिक्षण संस्था, मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि चाचणी केंद्र, संशोधन स्थापना, बाल व युवक मार्गदर्शन केंद्र, प्रतिबंधात्मक कार्यक्रम विकास यंत्रणा, कल्याण संघटना, मनोरुग्णालये, स्वयंचलित समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानसशास्त्रातील करिअर आणि संधी”
Shopping cart