Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खानदेशची वाटचाल

, ,
 • ISBN: 9789395227841
 • Swatantyacha Amrut Mahotsav : Khandeshchi Vatchal
 • Published : December 2022
 • Book Language : Marathi
 • Edition : First
 • Format : Paperback
 • Pages : 204
 • Category:
 • Download Book Ebook Link

Rs.325.00

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना स्वातंत्र्य चळवळी संदर्भात तसेच या चळवळीतील खानदेशचे योगदान याखेरीज या खानदेश भूमीचे सर्वांगीण वैभव या गोष्टी वाचकांसमोर मांडाव्या या दृष्टीने विविध उपविषय आम्ही लेखकांना दिले होते. यापैकी बहुतांश उपविषय या ग्रंथातील लेखांच्या माध्यमातून साध्य झाल्याचे दिसते. खानदेशातील स्वातंत्र्याची चळवळ, खानदेशातील आदिवासी क्रांतिकारक, नवीन शैक्षणिक धोरण, खानदेशातील सण उत्सव परंपरा, खानदेशातील ग्रामीण साहित्य, खानदेशातील थोर पुरुष उदाहरणार्थ साने गुरुजी, कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचे कार्यकर्तृत्व, खानदेशातील विशेषतः धुळे जिल्ह्याचा इतिहास, फारुकी राजवटीत खानदेशची राजधानी असलेल्या थाळनेर नगरीचा इतिहास, खानदेशातील मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान असे खानदेश केंद्री बहुसंख्य लेख या ग्रंथाचे सांस्कृतिक मूल्य वाढविणारे आहेत. स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेल्यानंतर खानदेश आज कुठे आहे? खानदेशाची सर्वांगीण प्रगती कशी झाली? या प्रगतीचे टप्पे कोणते? या वाटचालीचे निकष काय? या सर्वांचा उहापोह करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ग्रंथातील सर्व लेखकांनी केल्यामुळे हा ग्रंथ गैर शासकीय गॅझेट या मूल्याचा ठरला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात खानदेशी उद्योजकीय जगत कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे? उद्योगांच्या संदर्भात कोणकोणत्या उपक्षेत्रात वाव आहे याचीही चर्चा करणारे लेख या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. चोखंदळ, अभ्यासू व संशोधक दृष्टी बाळगणाऱ्या वाचकांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेशातल्या साहित्याचा, इतिहासाचा, वर्तमानातील घडामोडींचा परामर्श घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल, त्यांच्या अभ्यासासाठी, प्रस्तावित संशोधनासाठी या ग्रंथाची निश्चितच मदत होईल.

Swatantyacha Amrut Mahotsav : Khandeshchi Vatchal

 1. भीमा नाईक : एक उपेक्षित भिल्ल क्रांतीकारी – डॉ. गिरिश जोम्सू गावित
 2. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान – डॉ. दीपक लोटन सूर्यवंशी
 3. धुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात शिरपूर पॅटर्नचे योगदान – प्रा. चेतन भगवान वानखेडे
 4. खान्देशच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा मागोवा – प्रा. वंदना महाजन
 5. खानदेशातील ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळांचा अभ्यास – कृष्णा अर्जुन गावित
 6. खानदेशातील ग्रामीण साहित्य – डॉ. फुला बागूल
 7. साने गुरूजींचा खानदेशातील स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग एक अभ्यास – प्रा. महेंद्र पाटील
 8. खानदेशातील शैक्षणिक चळवळीत कु. शांताबाई दाणी यांचे योगदान – वासुदेव गोविंदा मेश्राम
 9. History of Chimthane loot and looted the treasure – Dr. Hemant Anil Joshi
 10. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मधील बदलाचा आढावा – डॉ. दिपक प्रभाकर बाविस्कर
 11. नवीन शैक्षणिक धोरण – डॉ. प्रतिभा दीपक सूर्यवंशी
 12. New Education Policy 2020- Concept, Approach and Challenges – Dr Sarita Nandkishor Dahake (Jawale)
 13. राष्ट्रीय शिक्षण नीति 2020 ची वैशिष्ट्ये आणि फायदे – डॉ. हर्षना रा. सोनकुसरे
 14. New Education Policy – 2020 – Syed Bushra Nahid Rahim
 15. भारतीय शिक्षण प्रणाली : एक विवेचन – डॉ. अतुल म. महाजन
 16. नवीन शैक्षणिक धोरणाचा (राष्ट्रीय शिक्षण धोरण 2023 – उच्च शिक्षण चिकित्सक अभ्यास – प्रविण रमेश बागुल
 17. खान्देशातील ग्रंथालयांची वाटचाल – श्री. गोपाल राजाराम पाटील
 18. खानदेशातील आदिवासी लोक संस्कृती – प्रा. डॉ. पी. आर. देवरे
 19. खानदेशातील ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारी चिमठाणा लुट – प्रा. डॉ. दिनेश रामदास महाजन
 20. खान्देशातील आदिवासी चळवळी – समाजशास्त्रीय आकलन – प्रा.डॉ.सुनील अजाबराव पाटील
 21. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान – प्रा. श्रीमती मनिषा व्ही. चौधरी
 22. खानदेशातील सण आणि उत्सव – किशोर माळी
 23. खानदेशातील सण, उत्सव, परंपरा – प्रा. संपतराव माणिकराव गर्जे
 24. खानदेशातील बदलती कृषी व्यवस्था – प्रा. एस. एस. वसावे, प्रा.डॉ.ए.जी.सोनवणे
 25. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात धुळे शहराचे योगदान – प्रा. डॉ. संजीव गिरासे
 26. भारतीय स्वातंत्र्य युध्दातील थाळनेरचा रणसंग्राम – डॉ. नरसिंह परदेशी
 27. खानदेशातील स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान – प्रा. नाजीर पठाण
 28. सत्यशोधक चळवळ आणि खानदेश – डॉ. रमेश धनराज जाधव
 29. कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीरस्वातंत्र्य आंदोलनातील जीवन व कार्य – प्रा. नाजीर पठाण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खानदेशची वाटचाल”
Shopping cart