Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

महाराष्ट्राचा भूगोल

Geography of Maharashtra

, , ,

Rs.285.00

भूगोल हा विषय तसा गतिमान असून तो निरीक्षण, अवलोकन आणि कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून असतो. म्हणून असे म्हटले जाते भूगोल हा विषय पायाने डोक्यापेक्षा अधिक समजतो, उघड्या डोळ्यांनी केलेली निरीक्षणे अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी शिकवतात. भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे ज्ञान आवश्यक असते किंबहूना भूगोलाच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायचा आपण ज्या प्रदेशात राहतो त्याची इत्यंभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्राचा भूगोल या ग्रंथात महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप, महाराष्ट्राची भौगोलिक रचना, महाराष्ट्राचे हवामान, नदीप्रणाली, महाराष्ट्रातील विविध साधनसंपदा या उपघटकांचा अभ्यास पहिल्या विभागात तर महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील लोकसंख्या व वस्ती, महाराष्ट्रातील ग्रामीण विकास व महाराष्ट्रातील पर्यटन या उपघटकांचा समावेश दुसर्‍या विभागात करण्यात आला आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना सदरील ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

  1. महाराष्ट्राची प्रशासकीय रचना : 1.1 महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमी, 1.2 महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक स्थान, 1.3 महाराष्ट्र : शेजारील राज्ये, 1.4 महाराष्ट्र : प्रशासकीय विभाग
  2. महाराष्ट्राची भौगोलिक रचना : 2.1 महाराष्ट्राची भूगर्भ रचना किंवा भूरुपीय किंवा भूशास्त्रीय रचना, 2.2 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, 2.3 महाराष्ट्रातील जलप्रणाली/नदीप्रणाली, 2.4 महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार व वितरण
  3. हवामान : 3.1 महाराष्ट्रातील हवामान विभाग, 3.2 महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण, 3.3 अवर्षणग्रस्त प्रदेश समस्या आणि व्यवस्थापन, 3.4 पूरग्रस्त प्रदेश समस्या आणि व्यवस्थापन
  4. साधनसंपदा : 4.1 जलसंपदा, 4.2 वनसंपदा, 4.3 खनिज ऊर्जा साधने, अ) जलविद्युत शक्ती, ब) औष्णिक ऊर्जा, क) अणूउर्जा
  5. शेती : 5.1 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमधील शेतीचे महत्व, 5.2 प्रमुख पिके-गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, 5.3 नगदी पिके-कापूस, ऊस, डाळिंब, द्राक्षे, 5.4 महाराष्ट्रातील शेतीच्या समस्या
  6. लोकसंख्या आणि वस्ती/वसाहत : 6.1 महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण, 6.2 महाराष्ट्र लोकसंख्या रचना-लिंग गुणेत्तर, साक्षरता, व्यावसायिक संरचना, स्थलांतर 6.3 ग्रामीण, शहरी वस्त्या, 6.4 महाराष्ट्रातील शहरांची क्षमता (मुंबई, पुणे, नागपूर)
  7. महाराष्ट्रातील ग्रामीण विकास : 7.1 ग्रामीण विकास संकल्पना, 7.2 ग्रामीण विकासाची परिमाणे, 7.3 ग्रामीण विकासाच्या योजना, 7.4 हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी (अहमदनगर), पाटोदा (औरंगाबाद)
  8. पर्यटन : 8.1 महाराष्ट्राची पर्यटन क्षमता, 8.2 महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ व विकास, 8.3 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, 8.4 कृषी पर्यटन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राचा भूगोल”
Shopping cart