Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

शैक्षणिक माहिती तंत्रविज्ञान

Educational Information Technology

Rs.495.00

विज्ञानात होत चाललेली प्रगती, ज्ञान क्षेत्रात होत असलेली वाढ, शिक्षण क्षेत्रात नवनव्याने प्रवेश करणारे मानवसमूह, लोकसंख्येत होत असलेली प्रचंड वाढ यांचा परिणाम शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. शिक्षण हे सर्वांसाठी आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारीही खूपच वाढली आहे. मर्यादित मानवसमूहाला शिक्षण देण्यासाठी निर्माण झालेली शिक्षण पद्धती, विविध तंत्रे, साधने आता निष्प्रभ ठरू लागली आहेत. परंतु ही साधने, तंत्रे किंवा पद्धतींचे उच्चाटन करावयाचे तर नवीन पद्धती, साधने, तंत्रे विकसित व्हायला हवीत. शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या व होत असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विचारवंत प्रयत्नशील आहेत. शिक्षणाच्या हेतूपासून ते थेट वर्गाध्यापनापर्यंत नव्याने मांडणी करण्याचा प्रयत्न होत आहे. केवळ ज्ञानासाठी ज्ञान ही संकल्पना थोडीशी बाजूला पडून मानवसमूहाच्या विकासासाठी शिक्षण्ा ही संकल्पना दृढ होऊ पाहते आहे. शैक्षणिक तंत्रविज्ञानाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने शैक्षणिक तंत्रविज्ञानाशी निगडित होऊ पाहाते आहे.

1. शैक्षणिक तंत्रविज्ञान – अर्थ व स्वरूप :
प्रास्ताविक; शैक्षणिक तंत्रविज्ञानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतातील स्थिती, शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा अर्थ व व्याख्या, शिक्षणातील तंत्रविज्ञान, शिक्षणाचे तंत्रविज्ञान, शैक्षणिक तंत्रविज्ञान; शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे उपागम – हार्डवेअर ॲप्रोच, सॉफ्टवेअर ॲप्रोच, अनुदेश उपागम, वर्णन उपागम; शैक्षणिक तंत्रविज्ञानाची उद्दिष्टे – दूरगामी उद्दिष्टे, शैक्षणिक तंत्रविज्ञानाची विशिष्ट उद्दिष्टे; शैक्षणिक तंत्रविज्ञानाची व्याप्ती, भारतासारख्या राष्ट्रात शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे महत्त्व, शैक्षणिक तंत्रविज्ञान व शिक्षकाची भूमिका, शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या मर्यादा; स्वाध्याय.

2. शैक्षणिक तंत्रविज्ञानाची विविध रूपे :
प्रास्ताविक; अनुदेश तंत्रविज्ञान – अनुदेश तंत्रविज्ञानाची गृहीतके, अनुदेश तंत्रविज्ञानाची वैशिष्ट्ये, अनुदेश तंत्रविज्ञानाची व्याप्ती; अध्यापन तंत्रविज्ञान – अध्यापन तंत्रविज्ञानाची गृहीतके, अध्यापन तंत्रविज्ञानाचा आशय व व्याप्ती, अध्यापन तंत्रविज्ञानाची वैशिष्ट्ये; वर्तनवादी तंत्रविज्ञानाची वैशिष्ट्ये; माध्यम तंत्रविज्ञान – माध्यम म्हणजे काय?, माध्यमाची निवड, माध्यमाची वैशिष्ट्ये, माध्यमांचे वर्गीकरण, बहुमाध्यम संपुट, बहुमाध्यम संपुटे वापरण्याचे फायदे, माध्यमांचा उपयोग, माध्यमाचा उपयोग पाठात कोठे करता येईल?; स्वाध्याय.

3. अध्यापनाची संकल्पना :
प्रास्ताविक; अध्यापन : अर्थ व स्वरूप, अध्यापनाची उद्दिष्टे, अध्यापनाचे प्रकार, अध्यापनाची संरचना, अध्यापनाच्या अवस्था, अध्यापन व अध्ययन परस्परसंबंध, अध्ययनस्थिती हाच अध्यापनाचा पाया, अध्ययन तत्त्वे व अध्यापन तत्त्वे, शिक्षण आंतरक्रियात्मक क्षेत्रे; स्वाध्याय.

4. अध्यापन नियोजन :
प्रास्ताविक; उद्दिष्टे – शैक्षणिक उद्दिष्टाचे श्रेणीबद्ध वर्गीकरण, उद्दिष्टांची स्पष्टीकरणे; आशय – आशयाचे घटक; अध्ययन अनुभव, अध्यापनाच्या पद्धती व कार्यनीती, व्यक्ती व साधने, भौतिक सुविधा, मूल्यमापन; स्वाध्याय.

5. संप्रेषण :
प्रास्ताविक; संप्रेषण अर्थ व व्याख्या, संप्रेषण प्रक्रियेचे स्वरूप व विकास; संप्रेषणाची प्रतिमाने – शॅनन व व्हीव्हर यांचे संप्रेषण प्रतिमान, श्रॅमचे संप्रेषण प्रतिमान, न्यूकोंबचे संप्रेषण प्रतिमान; संप्रेषण प्रक्रियेतील विविध घटक, संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे, संप्रेषणाचे विविध प्रकार, संप्रेषणाचे विविध मार्ग, वर्गात चालणारे संप्रेषण, वर्गातील संप्रेषण प्रभावी होण्यासाठी घ्यावयाची दक्षता; स्वाध्याय.

6. आंतरक्रिया विश्लेषण :
प्रास्ताविक; अर्थ व स्वरूप – बेले यांचे आंतरक्रिया प्रक्रियेचे वर्ग, निरीक्षण परिशिष्ट व नोंद; फ्लँडर्सची आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली – फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणातील वर्तनप्रकारांची वर्गवारी, निरीक्षण्ा पद्धती, निरीक्षण आव्यूव्हाचा अन्वय, निरीक्षकाने घ्यावयाची दक्षता व पाळावयाचे नियम, फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाचे फायदे, फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाच्या मर्यादा; शाब्दिक आंतरक्रिया वर्गप्रणाली; स्वाध्याय.

7. प्रणाली उपागम व अनुदेशन प्रणाली संरचना :
प्रास्ताविक; प्रणाली उपागमाचा अर्थ, प्रणाली उपागमाची वैशिष्ट्ये, प्रणाली उपागमांचे आधारभूत विचारप्रवाह, प्रणाली उपागमाची गृहीतके, प्रणाली उपागमातील पायऱ्या, वर्गाध्यापनासाठी प्रणाली उपागम, शालेय शिक्षणामध्ये प्रणाली उपागम, अनुदेशन प्रणाली संरचना, प्रणाली उपागमाचे फायदे; स्वाध्याय.

8. अध्यापनाची प्रतिमाने :
प्रास्ताविक; अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे काय?, अध्यापन प्रतिमाने व अध्यापन पद्धती, अध्यापन प्रतिमानांची वैशिष्ट्ये, अध्यापन प्रतिमानातील गृहीतके, अध्यापन प्रतिमानांचे मूलभूत घटक; अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण – ऐतिहासिक अध्यापन प्रतिमाने, मानसशास्त्रीय अध्यापन प्रतिमाने, शिक्षक प्रशिक्षणासाठी अध्यापन प्रतिमाने; आधुनिक अध्यापन प्रतिमाने – ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने; अग्रत संघटक प्रतिमान, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, प्रभुत्व अध्ययन प्रतिमान; स्वाध्याय.

9. अभिक्रमित अध्ययन :
प्रास्ताविक; पार्श्वभूमी; अभिक्रमित अध्ययनाचे मानसशास्त्रीय आधार – साधक अभिसंधान पार्श्वभूमी, अभिक्रमित अध्ययन अर्थ व स्वरूप, अभिक्रमित अध्ययनाची आधारभूत तत्त्वे, अभिक्रमित अध्ययन नमुना कार्यक्रम, अभिक्रमित अध्ययन कार्यक्रम रचनेतील प्रमुख पायऱ्या, चांगल्या कार्यक्रमाचे परीक्षण; पाठ अभिक्रमित करण्याचे विविध प्रकार – रेषीय अभिक्रम, शास्त्रीय अभिक्रम, अवरोही अभिक्रम, एगरूल अभिक्रम, रूल-एग-अभिक्रम; अभिक्रमित अध्ययनाचे फायदे, अभिक्रमित अध्ययनाची व्याप्ती, अभिक्रमित अध्ययनाच्या मर्यादा; स्वाध्याय.

10. सूक्ष्म अध्यापन :
प्रास्ताविक; सूक्ष्म अध्यापनाचा इतिहास, सूक्ष्म अध्यापन अर्थ, सूक्ष्म अध्यापनातील गृहीत तत्त्वे, सूक्ष्म अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये; सूक्ष्म अध्यापनाचे प्रमुख घटक – कौशल्याचे आदर्शीकरण, प्रत्याभरण, मांडणी, विविध कौशल्यांचे संधीकरण, सूक्ष्म अध्यापनाच्या प्रक्रियेतील विविध पायऱ्या, कौशल्यांची यादी, निरीक्षण, प्रत्याभरण, अध्यापनकाल, सूक्ष्म अध्यापनाचे फायदे; स्वाध्याय.

11. दृक्‌‍ – श्राव्य साधने :
प्रास्ताविक; ऐतिहासिक पार्श्वभूमी – दृक्‌‍-श्राव्य साधनांचे स्वरूप व वर्गीकरण – अ) दृक्‌‍ साधने : प्रक्षेपित साधने – पारदर्शी प्रक्षेपक, चित्रपट्टिका प्रक्षेपक, उर्ध्व शीर्ष प्रक्षेपक; ब) अप्रक्षेपित साधने : दृक्‌‍ साक्षरता – अप्रक्षेपित साधनांचे वर्गीकरण – आलेख, नकाशे, तक्ते, पोस्टर्स, आकृत्या, व्यंगचित्रे, छापील साहित्य; स्थिरचित्रे – सपाट चित्रे, फोटोग्राफ्स, फ्लॅश कार्डस्‌‍, फ्लिप पुस्तके, चित्रपट्टी; फलक – साधा स्थिर फलक, गुंडाळ फलक, फ्लॅनेल फलक, माहिती फलक व प्रदर्शन फलक, चुंबकीय फलक; प्रतिकृती व त्रिमिती चित्रे – प्रतिकृती, पृथ्वीचा गोल, प्रत्यक्ष वस्तू व वस्तुनमुने, मॉक-अपस्‌‍; बाहुली नाट्य; ब) श्राव्य साधने – रेडिओ – रेडिओ कार्यक्रमाचे प्रकार, रेडिओ कार्यक्रम तयार करताना घ्यावयाची दक्षता, रेडिओ कार्यक्रम ऐकविताना घ्यावयाची दक्षता; ध्वनिमुद्रक – ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रणाचा वापर; क) दृक्‌‍ + श्राव्य साधने – प्रत्यक्ष अनुभव – शैक्षणिक सहली, शैक्षणिक प्रदर्शने, वस्तू संग्रहालये, प्रयोगदिग्दर्शन, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके; अप्रत्यक्ष अनुभव – चलत्‌‍ चित्रपट – शैक्षणिक चित्रपटांचे महत्त्व व वैशिष्ट्ये, शैक्षणिक चित्रपटांचे प्रकार, शैक्षणिक चित्रपट दाखविताना घ्यावयाची दक्षता; दृक्‌‍-श्राव्य साधनांचे मूल्यमापन करण्याविषयीची तत्त्वे; स्वाध्याय.

12. पुनरावर्तक साधने :
प्रास्ताविक; कार्बन लेखन, टंकलेखन, स्टेन्सिल्स्‌‍, चक्रमुद्रण, हँड आऊटस्‌‍, स्पिरिट डुप्लिकेटर, इन्क डुप्लिकेटर, झेरॉक्स, रिफ्लेक्स प्रिंटींग, ब्ल्यू प्रिंट, छाया चित्रण, ध्वनिफिती, चित्रफिती व फ्लॉपी; स्वाध्याय.

13. शैक्षणिक तंत्रविज्ञान साधनांचे व्यवस्थापन :
प्रास्ताविक; व्यवस्थापनाची संकल्पना, व्यवस्थापनाचे घटक, साधनसामग्रीचे स्त्रोत, योजना लेखन, शैक्षणिक तंत्रविज्ञान कक्ष, कमी खर्चाची साधनसामग्री; स्वाध्याय.

14. शैक्षणिक दूरदर्शन :
ऐतिहासिक पार्श्वभूमी; दूरदर्शनचे शिक्षणातील महत्त्व – औपचारिक शिक्षणातील महत्त्व, अनौपचारिक शिक्षणामध्ये दूरदर्शनचा उपयोग; दूरदर्शन कार्यक्रम तयार करताना घ्यावयाची दक्षता, दूरदर्शन कार्यक्रम दाखविताना घ्यावयाची दक्षता; शैक्षणिक दूरदर्शनचे गुण, दूरदर्शन कार्यक्रमाच्या मर्यादा, बंद परिपथ दूरदर्शन, सामुदायिक अँटेना दूरदर्शन, व्हिडिओ टेपरेकॉर्डर; स्वाध्याय.

15. भाषा प्रयोगशाळा :
प्रास्ताविक; भाषा प्रयोगशाळेची गरज, भाषा प्रयोगशाळेचे स्वरूप, भाषा प्रयोगशाळेत वापरली जाणारी साधने, भाषा प्रयोगशाळेत चालणाऱ्या कार्याचे स्वरूप, भाषा प्रयोगशाळेतील कार्यपद्धती, भाषा प्रयोगशाळेतील ठळक वैशिष्ट्ये, भाषा प्रयोगशाळेचे फायदे; स्वाध्याय.

16. उदयोन्मुख अध्यापन पद्धती :
प्रास्ताविक; बुद्धिमंथन – बुद्धिमंथन पद्धतीच्या पायऱ्या, बुद्धिमंथन पद्धतीचे स्वरूप, दक्षता; अभिरूप अध्यापन पद्धती – प्रसंगप्रक्रिया, केस मेथड – केस कशी तयार करतात – केस मेथडची वैशिष्ट्ये – केस मेथड उपयोगांसाठी मार्गदर्शन तत्त्वे, भूमिकाभिनय पद्धती – भूमिकाभिनय पद्धतीचे फायदे-मर्यादा; स्वाध्याय समूह – प्राधान्यक्रमित स्वाध्याय, कृती कोडी – कृती कोड्याचे फायदे-मर्यादा; अभिरूप खेळ – अभिरूप खेळाच्या मर्यादा, अभिरूप पद्धतीच्या वापरामध्ये शिक्षकाची भूमिका; स्वाध्याय.

17. संगणकाची ओळख व संगणकाचा उपयोग :
ऐतिहासिक पार्श्वभूमी; इनपुट उपकरणे, आऊट पुट उपकरणे, मध्यवर्ती प्रक्रियाकरण केंद्र, नियंत्रण कक्ष, संगणकाची स्मृती व तिचे प्रकार, द्विमान पद्धती, कळ फलकावरील काही प्रमुख कळींचे कार्य, संगणकाच्या भाषा; शिक्षण क्षेत्रात संगणकाचा उपयोग – शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये संगणक, अध्यापनामध्ये संगणक – अनुदेशासाठी संगणकाची मदत – संगणकाच्या साहाय्याने अनुदेश, शैक्षणिक संशोधनासाठी संगणक, संगणक प्रशिक्षणासाठी संगणक, संगणक साक्षरता व संगणकविषयीची जाणीव; स्वाध्याय.

18. माहिती तंत्रविज्ञान :
प्रास्ताविक; संगणक उपयोजनासाठीची सॉफ्टवेअर्स – उपयोजनात्मक सॉॅफ्टवेअरची वैशिष्ट्ये; मायक्रोसॉफ्ट वर्ड – वर्ड कसे सुरू करावे, वर्डमध्ये आशयाचे मुद्रण करणे, वर्ड प्रोसेसरचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग, वर्ड प्रोसेसर्समुळे होणारे फायदे, शिक्षकाला वर्ड प्रोसेसर्सचा उपयोग; मायक्रोसॉफ्ट एक्सेल – एक्सेल चालू कसे करावे, वर्कशीट, वर्कशीटमधील महत्त्वाच्या बाबी, चौकटीत गणिती प्रक्रिया, शिक्षकाच्या दृष्टीने वर्कशीटची उपयुक्तता, आलेखाचा वापर; डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली – डेटाबेसची वैशिष्ट्ये, डेटाबेसचा शिक्षकाला होणारा उपयोग; पॉवर पॉईंट – पॉवर पॉईंट सुरू कसे करावे?, स्लाईडवरील मजकुराचे व्यवस्थापन व संपादन, पॉवर पॉईंटची वैशिष्ट्ये, पॉवर पॉईंटच्या मर्यादा; कोरल ड्रॉ; पेंट ब्रश – शिक्षकासाठी पेंट ब्रशची उपयुक्तता; मेलमर्ज – मेलमर्ज कसे सुरू करावे; स्वाध्याय.

19. इंटरनेट :
इंटरनेटची ओळख, इंटरनेटचा भारतातील प्रवेश, इंटरनेटसाठी आवश्यक बाबी, इंटरनेट कसे सुरू करावे?, ई-मेल सुरू कसे करावे, ई-मेलचे फायदे; वर्ल्ड वाईड वेब; सर्च टूल्स; सर्च इंजिन; वेब डिरेक्टरी; गोफर; ई कॉमर्स; चॅट रूम; इंटरनेटचे फायदे; स्वाध्याय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शैक्षणिक माहिती तंत्रविज्ञान”
Shopping cart