Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

समावेशित शाळा व शिक्षक

Inclusive School and Teacher

,

Rs.160.00

आधुनिक काळात शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये नवनवीन विचारप्रवाह येत आहेत. भारत सरकारने बालकांच्या शिक्षणासाठी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षणाचे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वामध्ये समाविष्ट होते. प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची राज्याची जबाबदारी आहे. सर्वसामान्य बालकांबरोबर विशेष गरजा असणार्‍या बालकांनाही हा शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

सर्वसामान्य शाळेमध्ये सर्वसामान्य मुलांसोबत विशेष गरजा असणार्‍या बालकांना अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. सौम्य व मध्यम अपंगत्व असणारी बालके सामान्य बालकांबरोबर शिक्षण घेऊ शकतात. यामुळे त्यांच्यामधील न्यूनगंडाची भावना दूर होते, तसेच त्यांचे सामाजीकीकरण होण्यास मदत होते. देशातील प्रत्येक बालकाला मुलभूत प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी भारत सरकारने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची मोहिम सुरु केली. या मोहिमेला सर्व शिक्षा अभियानामुळे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. या अभियानामध्ये अपंग समावेशित शिक्षण ही योजना राबविण्यात आली. यातूनच समावेशित शिक्षण ही संकल्पना विकसित झाली.

या पुस्तकात समावेशित शिक्षणाची संकल्पना, विशेष गरजा असणारी बालके, समावेशित शाळा व समावेशित शाळेतील शिक्षक या मुद्यांचा विचार केला आहे. सद्याच्या युगात प्रत्येक बालकाच्या कौशल्य विकसनावर भर देण्याची आवश्यकता आहे. विशेष गरजा असणारी बालके राष्ट्र विकासात भरीव योगदान देऊ शकतात. या बालकांच्या शिक्षणाकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी हा संदर्भ ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.

Samaveshit Shala V Shikshak

  1. समावेशित शिक्षण : संकल्पना व स्वरूप : 1.1 समावेशित शिक्षण – अर्थ व व्याख्या, 1.2 समावेशित शिक्षणाची उद्दिष्ट्ये, 1.3 समावेशित शिक्षणाची वैशिष्ट्ये, 1.4 समावेशित शिक्षणाची गरज, 1.5 समावेशित शिक्षणातील सेवा, 1.6 समावेशित शिक्षणाचा आराखडा, 1.7 समावेशित शिक्षणासंदर्भातील धोरणे व कायदे, 1.8 विशेष गरजा असणार्‍या बालकांसाठी शासकीय योजना
  2. विशेष गरजा असणार्‍या बालकांचे शिक्षण : 2.1 मतिमंद बालकांचे शिक्षण, 2.2 दृष्टीदोष असणार्‍या बालकांचे शिक्षण, 2.3 कर्णबधिर बालकांचे शिक्षण
  3. समावेशित शाळा : 3.1 समावेशित शाळा – अर्थ, 3.2 सामान्य शाळा व समावेशित शाळेतील फरक, 3.3 समावेशित शाळेतील भौतिक सुविधा, 3.4 समावेशित शाळेतील मानवी घटक, 3.5 अपंगत्वाविषयीचा दृष्टीकोन, 3.6 संपूर्ण वर्ग दृष्टीकोन, 3.7 समावेशित शाळेची सद्याची भूमिका, 3.8 समावेशित शाळेतील वर्गव्यवस्थापन, 3.9 विशेष बालकांसाठी विशेष शिक्षण
  4. समावेशित शाळेतील शिक्षक : 4.1 समावेशित शाळेतील शिक्षकांचे अध्यापनविषयक तत्त्वज्ञान, 4.2 समावेशित शाळेतील शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, 4.3 समावेशित शाळेतील विविध विषयांचे अध्यापन, 4.4 समावेशित वर्गातील अध्यापन पद्धती, 4.5 समावेशित वर्ग अध्यापनाची तंत्रे, 4.6. समावेशित शिक्षकाची भूमिका, 4.7 वर्गजडणघडणीत शिक्षकाची भूमिका, 4.8 समावेशित शाळेतील बालकांचे मूल्यमापन, 4.9 समावेशित शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण, 4.10 विशेष गरजा असणार्‍या बालकांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन, 4.11 समावेशित शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य मार्गदर्शन व समुपदेशन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समावेशित शाळा व शिक्षक”
Shopping cart