Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सूक्ष्म

व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-2)

Business Economics (Part - II)

Rs.225.00

व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा दुसरा भाग उत्पादनाच्या वर्तणूक / निर्णयाशी संबधित आहे. एक कुशल उद्योजक तोच जो कमीत कमी उत्पादन खर्चात, मर्यादित साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन आणि नफ्याचे महत्तमीकरण करतो. उद्योजक जेव्हा उत्पादन विषयक निर्णय घेतो तेव्हा तो अर्थशास्त्राच्या खर्च विषयक आणि उत्पादन विषयक सिद्धान्ताचे पालन करतो. एक उद्योजकाचा अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रज्ञांवर दृढ विश्वास असतो. तो मनतो की, अर्थशास्त्रज्ञ जे सांगतात तेच सत्य आहे. वेगवेगळ्या बाजारात उत्पादन आणि किंमत कशी निश्चित करायची, उत्पादन घटकांचा मोबदला कसा ठरवायचा याबाबत मार्गदर्शन अर्थशास्त्र करते. उद्योजकाने अर्थशास्त्रातील मागणी-पुरवठा बाजूकडे दुर्लक्ष केले तर अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीची व्यापार चक्रे निर्माण होतात. व्याचार चक्रे निर्माण होवू न देण्यासाठी उद्योजकांनी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.

Vyavsayik Arthashastra

  1. मक्तेदारी : 1.1 मक्तेदारी : अर्थ, व्याख्या आणि स्वरूप, 1.1.1 शुद्ध/पूर्ण मक्तेदारीची वैशिष्ट्ये, 1.1.2 शुद्ध/पूर्ण मक्तेदारीच्या संकल्पनेतील अडचणी, 1.1.3 मर्यादित/अपूर्ण मक्तेदारी, 1.1.4 मक्तेदारीचे प्रकार, 1.1.5 मक्तेदारीचा उद्देश, 1.2 मक्तेदारीतील किंमत निश्चिती, 1.3 मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल/मक्तेदारीतील उत्पादन व किंमत निश्चिती, 1.4 मक्तेदाराचा दीर्घकालीन समतोल, 1.5 मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धेतील भेद/तुलना, 1.6 मक्तेदारी बाजारातील मूल्यभेद/विभेदात्मक मक्तेदारी, 1.6.1 मूल्यभेद : अर्थ व व्याख्या, 1.6.2 मुल्यभेदाचे प्रकार, 1.6.3 मूल्यभेदाच्या श्रेणी, 1.6.4 मूल्यभेदासाठी आवश्यक अटी, 1.6.5 मूल्यभेदी मक्तेदारीत किंमत निश्चिती, 1.6.6 अवपुंजन/राशी-पतन, 1.6.7 मूल्यभेदाचे परिणाम, 1.7 एक ग्राहकाधिकार, 1.7.1 एक ग्राहकाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये, 1.7.2 द्विग्राहकाधिकार, 1.7.3 अल्पग्राहकाधिकार.
  2. मक्तेदारीयुक्त स्पर्धा : 2.1 अपूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा, 2.1.1 अपूर्ण स्पर्धा, 2.1.2 मक्तेदारीयुक्त स्पर्धा, 2.1.3 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये/अटी, 2.1.4 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची गृहिते, 2.2 मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योगसंस्थेचा अल्पकालीन समतोल, 2.3 मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योगसंस्थेचा दीर्घकालीन समतोल, 2.4 अतिरिक्त क्षमता, 2.5 मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील समुहाचा समतोल, 2.6 बिगर किंमत स्पर्धा, 2.7 मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील अपव्यय.
  3. अल्पविक्रेताधिकार : 3.1 अल्पविक्रेताधिकार : अर्थ आणि व्याख्या, 3.1.1 अल्प विक्रेताधिकाराची वैशिष्ट्ये, 3.1.2 अल्पविक्रेताधिकाराचे स्त्रोत, 3.1.3 उद्योगसंस्थेचा मोठा आकारमान निर्माण होण्याची कारणे, 3.1.4 अल्पविक्रेताधिकाराचे वर्गीकरण, 3.2 अल्पविक्रेताधिकारातील किंमत निश्चिती, 3.2.1 किंमत नेतृत्वाचे प्रकार, 3.2.3 किंमत नेतृत्वात किंमत निश्चिती, 3.2.4 किंमत नेतृत्वाच्या अटी, 3.3 अल्पविक्रेताधिकारातील किंमत ताठरता, 3.4 खाच असलेला/बाकदार मागणी वक्र आणि किंमत ताठरता, 3.4.1 खाच असलेल्या मागणी वक्राची गृहिते, 3.4.2 खाच असलेल्या मागणी वक्राचे स्पष्टीकरण, 3.4.3 खाच असलेल्या मागणीवक्र सिद्धान्ताच्या उणिवा.
  4. द्विविक्रेताधिकार : 4.1 द्विविक्रेताधिकार : अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, 4.2 द्विविक्रेताधिकारातील किंमत निश्चिती आणि उत्पादन निश्चिती, 4.2.1 कूर्नो प्रतिमान, 4.2.2 स्टॅकलबर्ग प्रतिमान, 4.2.3 बर्ट्रांडचे प्रतिमान, 4.2.4 एजवर्थ प्रतिमान, 4.2.5 चेंबरलिनचे प्रतिमान.
  5. घटक किंमत निश्चिती (1) : 5.1 विभाजनाचे सिद्धान्त, 5.1.1 विभाजनाचा सनातन सिद्धान्त, 5.1.2 विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धान्त, 5.2 खंडाचे सिद्धान्त, 5.2.1 भूमी, 5.2.2 खंडाचे प्रकार, 5.2.3 खंडाचा सनातन सिद्धान्त/रिकार्डोचा खंड सिद्धान्त, 5.3 रिकार्डोच्या सिद्धान्ताचा सारांश, 5.4 मजुरीचे सिद्धान्त, 5.4.1 वेतन/मजुरी : अर्थ आणि व्याख्या, 5.4.2 नाममात्र/पैसारूप मजुरी आणि वास्तव मजुरी, 5.4.3 वास्तव मजुरीवर प्रभाव टाकणारे घटक, 5.4.4 वेगवेगळ्या व्यवसायातील मजुरीच्या भिन्नतेची कारणे, 5.4.5 मजुरीचे सिद्धान्त, 5.5 मजुरीचा सामुहिक सौद्याचा सिद्धान्त किंवा मजुरीचा द्विपक्षीय एकाधिकाराचा सिद्धान्त, 5.5.1 कामगार संघटनाचा रोजगार आणि मजुरीवरील प्रभाव, 5.5.2 मजुरी वाढीबाबत कामगार संघटनांच्या मर्यादा.
  6. घटक किंमत निश्चिती (2) : 6.1 व्याज : अर्थ आणि व्याख्या, 6.1.1 एकूण व्याज आणि निव्वळ व्याज, 6.1.2 व्याजदरात भिन्नतेची कारणे, 6.1.3 व्याजाचा ऋण योग्य निधी सिद्धान्त, 6.2 व्याजाचा रोखता प्राधान्य सिद्धान्त, 6.2.1 पैशाची मागणी, 6.2.2 रोखता प्राधान्य वक्र/पैशाचा मागणी वक्र, 6.2.3 पैशाचा पुरवठा वक्र, 6.2.4 केन्सच्या रोखता प्राधान्य सिद्धान्ताचा सारांश, 6.3 नफा : अर्थ आणि व्याख्या, 6.3.1 एकूण नफा आणि निव्वळ नफा, 6.3.2 नफ्याची वैशिष्ट्ये, 6.3.3 नफ्याचे सिध्दान्त.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-2)”
Shopping cart