Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार

Modern Banking and Indian Financial Market

Rs.325.00

आजच्या प्रगत काळात दिवसेंदिवस बँक व्यवहाराचे व वित्तीय बाजाराचे महत्त्व वाढत आहे. अर्थव्यवस्थेत बँका व वित्तीय संस्थांचा जस-जसा विकास आणि विस्तार होत जातो, तस-तसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्व अनन्य साधारण आहे. बँक जे व्यवहार करते त्यात बरीच जोखीम असते. त्या जोखीमचे व्यवस्थापन करावे लागते. भारतासह जगातील सर्वच बँक व्यवसायामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यात प्रामुख्याने बँकांचे संगणकीयीकरण, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग, एटीएम, डेबीट कार्ड, टेली बँकींग, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस, स्वीफ्ट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, रियल टाईम ग्रास सेटलमेंट, नॅशनल सेटलमेंट सिस्टीम, ई-परचेस, ई-मनी, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अ‍ॅट पाँईट ऑफ सेल इत्यादी साधनांचा वापर केला जात आहे. प्रतिभूती बाजार हे वित्तीय बाजाराचे एक अभिन्न अंग आहे. वित्तीय बाजारात अल्पकालीन आणि दिर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण केली जाते. नाणेबाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण घेवाण चालते. यासाठी अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्जे, कोषागार हुंड्या, व्यापारी हुंडया या साधनांचा वापर केला जातो. भांडवल बाजार दीर्घकालीन कर्जे, गुंतवणूक देवाण घेवाण केली जाते.
प्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँकींग व वित्तीय बाजाराची इत्यंभूत माहिती देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे.

Adhunik Banking Ani Bharatiya Vittiya Bajar

  1. बँकींगचा परिचय : 1.1 बँकांची उत्क्रांती, 1.2 आधुनिक बँकाची कार्ये, 1.3 बँकांची वैशिष्ट्ये, 1.4 सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता
  2. बँकांचे आर्थिक व्यवहार : 2.1 बँक खात्याचे प्रकार, 2.2 बँकेत खाते उघडण्याची पद्धती व बँक खाते बंद करणे, 2.3 ग्राहकांचे/खातेदारांचे प्रकार, 2.4 बँक आणि खातेदार यांचे संबंध, 2.5 के.वाय.सी. तुमच्या ग्राहकाची ओळख
  3. बँकींग सेवांमधील आधुनिक तंत्रज्ञान : 3.1 बँकींग सेवा, 3.2 फंड हस्तांतरण, 3.3 स्वयंचलित यंत्रे, 3.4 पेमेंट कार्ड, 3.5 आधुनिक बँकींग सेवा, 3.6 बँकींग कोड आणि सुरक्षितता, 3.7 बँकींग तंत्रज्ञान वापरात घ्यावयाची काळजी
  4. भारतीय वित्तीय प्रणाली : 4.1 वित्तीय प्रणाली : अर्थ, कार्ये, भूमिका आणि महत्व, 4.2 भारतीय वित्तीय प्रणालीची रचना, 4.3 भारतातील व्यापारी बँक प्रणालीची प्रगती, 4.5 वित्तीय व बँकींग क्षेत्रातील सुधारणा, 4.4 भारतातील विकास बँका व वित्तीय संस्था, 4.5 भारतातील प्रमुख बँकेत्तर वित्तीय संस्था
  5. भारतातील वित्तीय बाजार : 5.1 नाणे बाजार, 5.2 भारतीय नाणेबाजाराचे उप-बाजार/संघटक, 5.3 भारतीय नाणेबाजारात सुधारणा करण्यासाठी सूचना, 5.4 भारतीय नाणेबाजारातील अलीकडील सुधारणा, 5.5 भांडवल बाजार, 5.6 म्युच्युअल फंड
  6. भारतातील प्रतिभूती बाजार : 6.1 प्रतिभूती बाजार : व्याख्या आणि अर्थ, 6.2 प्राथमिक आणि दुय्यम भांडवल बाजार, 6.3 स्टॉक एक्सचेंज, 6.4 वस्तू व्यापार आणि स्पॉट एक्सचेंज, 6.5 पार्टीसिपटरी नोटस्, 6.6 वित्तीय नियमन आणि सेबी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार”
Shopping cart