Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

भारतीय राष्ट्रीय चळवळ व स्वातंत्र्योत्तर भारत (1885-1991)

Indian National Movement and India After Independence (1885-1991)

,
  • ISBN: 9789390862917
  • Bhartiya Rashtriya Chalval V Swatantyottar Bharat (1885-1991)
  • Published : November 2021
  • Book Language : Marathi
  • Edition : First
  • Format : Paperback
  • Pages : 246
  • Categories: ,
  • Download Book Ebook Link

Rs.295.00

इ.स. 1857 साली झालेला भारतातील उठाव हा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा पहिला संघटीत प्रयत्न होता. या उठावातून भारतीय लोकांमध्ये राजकीय जागृतीची सुरुवात झाली. पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित झालेल्या सुशिक्षित मध्यमवर्गाने समाजाचे नेतृत्त्व केले व कालांतराने स्वातंत्र्याची चळवळ उभारली. लो. टिळक यांच्या निधनानंतर 1919 ते 1947 पर्यंतच्या काळात म. गांधीजींचा भारतीय राजकारण व समाजकारण यावर प्रभाव कायम राहीला. म. गांधींनी केलेल्या विविध चळवळींबरोबरच शेतकरी-कामगार, वंचित-शोषितांच्या चळवळींना देखील सुरुवात झाली. 19 व्या शतकातील मुस्लिम जमातवादाचा उदय, द्विराष्ट्रवादाचे कट्टर समर्थन, इंग्रजांचे फोडा-झोडा धोरण व काँग्रेसी नेत्यांची हतबलता वगैरे कारणांनी 1947 मध्ये भारताची फाळणी झाली. वसाहतवादाच्या जोखडाखाली भरडून निघालेल्या, नव्याने स्वतंत्र झालेल्या खंडित भारतासमोर अनेक आव्हानांचा सरदार पटेलांनी यशस्वीपणे सामना केला. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला. पं. नेहरूंनी अलिप्ततावादाचे समर्थन केले. मात्र चीनसोबतच्या संघर्षात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. स्वातंत्र्योत्तर भारताने विविध योजना, कायदे करून उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.

Bhartiya Rashtriya Chalval V Swatantyottar Bharat (1885-1991)

  1. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास : 1.1 भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे, 1.2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, 1.3 नेमस्त राष्ट्रवादी आणि जहाल राष्ट्रवादी, 1.3.1 नेमस्त कालखंड/मवाळ काँग्रेस (1885-1905), 1.3.2 जहाल कालखंड/जहाल काँग्रेस (1905-1920), 1.4 क्रांतिकारी राष्ट्रवादी चळवळी, 1.4.1 कुका चळवळ, 1.4.2 महाराष्ट्रातील क्रांतिकारक/चळवळी, 1.4.3 बंगालमधील क्रांतिकारक/चळवळी, 1.4.4 पंजाबमधील क्रांतिकारक/चळवळी, 1.4.5 मद्रास प्रांतामधील क्रांतिकारी चळवळी, 1.4.6 भारताबाहेरील क्रांतिकारी चळवळी/कार्ये.
  2. जन चळवळी : 2.1 असहकार चळवळ, 1920-1922, 2.2 सविनय कायदेभंग चळवळ, 1930-1935, 2.3 छोडो भारत चळवळ, 1942.
  3. स्वातंत्र्य आणि विभाजनाच्या दिशेने : 3.1 द्वि-राष्ट्र सिद्धांत, 3.1.1 मुस्लिम लीगची स्थापना, 3.1.2 हिंदू महासभेची स्थापना, 3.1.3 जातीयवादामध्ये वाढ, 3.1.4 पाकिस्तानच्या कल्पनेचा उदय, 3.2 आझाद हिंद सेना/भारतीय राष्ट्रीय सेना, 3.3 सत्तेचे हस्तांतरण, 3.3.1 क्रिप्स मिशन, 3.3.2 कॅबिनेट मिशन/त्रिमंत्री शिष्टमंडळ, 3.3.3 माउंटबॅटन योजना, 3.3.4 भारतीय स्वातंत्र्य कायदा व विभाजन.
  4. शोषितांच्या चळवळी : 4.1 शेतकरी चळवळ, 4.2 कामगार चळवळ, 4.3 दलित चळवळ, 4.3.1 दलित चळवळ (आंबेडकरपूर्व कालखंड), 4.3.2 दलित चळवळ (आंबेडकर कालखंड), 4.4 महिला चळवळ, 4.5 आदिवासींचे उठाव.
  5. स्वातंत्र्यानंतरची आव्हाने : 5.1 फाळणीचे परिणाम, 5.2 भारतीय संस्थानांचे विलीनीकरण, 5.2.1 काश्मीर, 5.2.2 जुनागढ, 5.2.3 हैदराबाद, 5.3 फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता, 5.4 भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, 5.5 राज्यांची भाषिक पुनर्रचना.
  6. भारताचे परराष्ट्र धोरण : 6.1 अलिप्ततावादी चळवळ, 6.2 भारत-पाक संबंध, संघर्ष आणि बांग्लादेशचा जन्म, 6.2.1 भारत-पाक संबंध आणि संघर्ष, 6.2.2 बांग्लादेश/मुक्तियुद्ध (3-15 डिसेंबर 1971), 6.3 भारत-चीन संबंध, संघर्ष आणि पंचशील, 6.3.1 भारत-चीन संबंध आणि संघर्ष, 6.3.2 पंचशील तत्त्वे, 6.4 भारत-श्रीलंका संबंध.
  7. देशांतर्गत धोरण : 7.1 हिंदू कोड बिल : स्वरूप आणि प्रभाव, 7.2 आणीबाणी : पार्श्वभूमी, स्वरूप व प्रभाव, 7.3 अवकाश संशोधन.
  8. आर्थिक धोरण : 8.1 मिश्र अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजना, 8.2 औद्योगिक विकास, 8.3 बँकाचे राष्ट्रीयीकरण : पहिली नोटबंदी, 8.4 खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण : परिचय, 8.4.1 खाजगीकरण, 8.4.2 उदारीकरण, 8.4.3 जागतिकीकरण.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राष्ट्रीय चळवळ व स्वातंत्र्योत्तर भारत (1885-1991)”
Shopping cart