Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

कृषी

कृषी विकासाचे अर्थशास्त्र (आव्हाने व उपाय)

Economics of Agricultural Development (Challenges and Solutions)

Rs.150.00

भारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्‍या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्‍या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे. पुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे.

  1. कृषी व्यवसायाचा पूर्व इतिहास
  2. भूमी वाटप
  3. पीक रचना
  4. विविध पिकांचे उत्पादन व उत्पादकता
  5. प्रमुख पिकांची उत्पादकता
  6. संकरीत व सुधारित बियाण्याखालील लागवडीच्या क्षेत्राचे विश्लेषणात्मक अध्ययन
  7. जिल्ह्यातील कृषी अवजारे व साहित्याचा वापर
  8. निष्कर्ष व शिफारसी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कृषी विकासाचे अर्थशास्त्र (आव्हाने व उपाय)”
Shopping cart