Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

राजकीय सिद्धांत

Political Theory

Rs.595.00

प्रा. डॉ. विलास आघाव हे आदर्श महाविद्यालय, हिंगोली, जिल्हा हिंगोली येथे उपप्राचार्य, प्राध्यापक व पदवी, पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विद्या परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र विषयातील पीएच.डी. चे संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून एक व्यासंगी व संशोधक वृत्तीचे अध्यापक त्याचप्रमाणे विविध पुरोगामी चळवळीतही कार्यरत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशने, परिषदा व चर्चासत्रे इत्यादीचे यशस्वीरित्या आयोजन व सक्रीय सहभाग नोंदवून शोधनिबंधाचे वाचन केले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध संस्था व संघटनांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे अनेक संशोधन पेपर, शोधनिबंध, लेख विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय शोधपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले असून ते विविध संशोधन पत्रिकेचे संपादक व सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेवर देखील ते सक्रीय सहभागी आहेत. त्यांनी स्पर्धा परीक्षा, व्यक्तीमत्व विकास, रोजगार मार्गदर्शन इत्यादी विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच विविध स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे व संदर्भग्रंथाचे लेखनही केले आहे.

Rajkiya Siddhant

 1. राजकीय सिद्धांत : 1.1 राज्यशास्त्राचे स्वरूप, अर्थ, व्याख्या, 1.2 राजकीय सिद्धांताचा अर्थ, व्याख्या, 1.3 राज्यशास्त्र शास्त्र नाही, राज्यशास्त्र हे शास्त्र आहे, 1.4 विकासाचे टप्पे, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, 1.5 राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्त्वज्ञान यातील फरक, 1.6 राजकीय सिद्धांताचे इतर संकल्पनाशी असलेले संबंध, 1.7 राजकीय सिद्धांताच्या र्‍हासाची कारणे आणि सिद्धांताची पुर्नस्थापना
 2. राज्य : 2.1 राज्य संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, 2.2 राज्याचे मूलभूत घटक, 2.3 राज्याच्या उदयाचे प्रमुख सिद्धांत, 2.3.1 राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिध्दांत, 2.3.2 राज्याच्या उत्पत्तीचा शक्ती सिद्धांत, 2.3.3 राज्याच्या उत्पत्तीचा सामाजिक करार सिध्दांत, 2.3.4 राज्याच्या उत्पत्तीचा ऐतिहासिक/विकासवादी किंवा उत्क्रांतवादी सिद्धांत, 2.4 राज्याच्या विकासाची टप्पे, 2.5 विचारधारेवर आधारीत राज्याच्या विकासाचे तीन सिद्धांत, 2.5.1 राज्याचा उदारमतवादी सिद्धांत, 2.5.2 राज्याचा मार्क्सवादी सिद्धांत, 2.5.3 राज्याचा गांधीवादी सिद्धांत
 3. सरकार/शासनसंस्था : 3.1 सरकारचा अर्थ, व्याख्या, 3.2 शासन संस्थेचे घटक, 3.2.1 कार्यकारी मंडळ, 3.2.2 कायदेमंडळ, 3.2.3 न्यायमंडळ, 3.3 शासन संस्थेचे प्रकार, 3.3.1 एकात्म शासनसंस्था, 3.3.2 संघराज्यात्मक शासन संस्था, 3.3.3 संसदीय शासनसंस्था, 3.3.4 अध्यक्षीय शासनसंस्था
 4. सार्वभौमत्व : 4.1 सार्वभौमत्त्वाचा अर्थ, व्याख्या, 4.2 सार्वभौमत्वाचा विकास, वैशिष्ट्ये, प्रकार आणि स्थान, 4.3 ऑस्टिनचा सार्वभौमसत्ता सिद्धांत, 4.4 सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत
 5. सत्ता आणि अधिसत्ता : 5.1 सत्ता, 5.1.1 सत्तेचा अर्थ, व्याख्या, 5.1.2 सत्ता आणि शक्ती/बल यातील फरक, 5.1.3 सत्ता आणि प्रभाव यातील फरक, 5.1.4 सत्ता निर्मितीचे साधने, प्रकार, वैशिष्ट्ये आणि मर्यादा, 5.2 अधिसत्ता, 5.2.1 अधिसत्तेचा अर्थ, व्याख्या, 5.2.2 अधिसत्तेचे स्वरूप, वैशिष्ट्ये, प्रकार आणि मर्यादा
 6. अधिमान्यता : 6.1 अधिमान्यतेचा अर्थ, व्याख्या, 6.2 अधिमान्यतेची उगमस्थाने, वैशिष्ट्ये, 6.3 अधिमान्यता टिकविण्याचे मार्ग, प्रकार आणि समस्या
 7. नागरिकत्व आणि अधिकार : 7.1 नागरिकत्व, 7.1.1 नागरिकत्वाचा अर्थ, व्याख्या, 7.1.2 नागरिक आणि परकीय नागरिकातील भेद, 7.1.3 नागरिकत्व प्राप्तीच्या कायदेशीर तरतुदी, 7.1.4 भारतीय नागरिकत्वाच्या अटी, नागरिकत्व रद्द होण्याची कारणे, 7.1.5 नागरिकत्व दुरुस्ती कायदा-2019, 7.2 अधिकार, 7.2.1 अधिकाराचा अर्थ, व्याख्या, 7.2.2 अधिकाराची वैशिष्ट्ये, वर्गीकरण
 8. स्वातंत्र्य, समता आणि न्याय : 8.1 स्वातंत्र्य, 8.1.1 स्वातंत्र्याचा अर्थ, व्याख्या, 8.1.2 स्वातंत्र्य संकल्पनेचा विकास, प्रकार, मार्ग आणि दोष, 8.1.3 नकारात्मक स्वातंत्र्याचे स्वरूप, 8.1.4 सकारात्मक स्वातंत्र्याचे स्वरूप, 8.1.5 स्वातंत्र्य आणि समता यांच्यातील परस्पर संबंध, 8.1.6 स्वातंत्र्य संकल्पनेवर विविध विद्वानांचे विचार, 8.2 समता, 8.2.1 समतेचा अर्थ, व्याख्या, 8.2.2 समता संकल्पनेचा विकास, प्रकार, 8.2.3 समता निर्माण करणार्‍या अटी किंवा प्रमुख मुद्दे, 8.3 न्याय, 8.3.1 न्यायाचा अर्थ, व्याख्या, 8.3.2 न्याय संकल्पनेचा विकास आणि न्यायाचे सिद्धांत, 8.3.3 न्यायाची उगमस्थाने आणि प्रकार
 9. लोकशाही : 9.1 लोकशाहीचा अर्थ, व्याख्या, 9.2 लोकशाहीच्या विकासाची टप्पे, वैशिष्ट्ये, 9.3 लोकशाहीचे प्रकार, 9.3.1 प्रत्यक्ष लोकशाहीची साधने आणि गुण, दोष, 9.3.2 अप्रत्यक्ष लोकशाही, प्रतिनिधीक लोकशाही/संसदीय लोकशाहीचे स्वरूप आणि गुण, दोष, 9.3.3 अध्यक्षीय लोकशाहीची वैशिष्ट्ये आणि गुण, दोष, 9.4 लोकशाही यशस्वीतेच्या आवश्यक अटी किंवा घटक, 9.5 लोकशाहीचे गुण, दोष
 10. राष्ट्रवाद : 10.1 राष्ट्रवादाचा अर्थ, व्याख्या, 10.2 राष्ट्रवादाचा विकास, मूलभूत घटक, स्वयंनिर्णयाचा सिद्धांत, 10.3 राष्ट्रवादाचे प्रकार, गुण आणि दोष
 11. कल्याणकारी राज्य : 11.1 कल्याणकारी राज्याचा अर्थ, व्याख्या, 11.2 कल्याणकारी राज्याचा विकास, उद्दिष्टे, 11.3 कल्याणकारी राज्याची वैशिष्ट्ये, कार्य, गुण आणि दोष, 11.4 कल्याणकारी राज्याचे मूल्यमापन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजकीय सिद्धांत”
Shopping cart