Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

शिक्षणातील नाट्य आणि कला

Drama and Art in Education

Rs.155.00

मानवी मनातील विविध भावनांचे प्रकटीकरण, त्याला जाणवणाऱ्या सौंदर्यानुभूतिचे माध्यम म्हणजे कला. या विविध प्रकारच्या आहेत. नाटक ही देखील एक कला आहे प्राचीन काळापासून मानवाच्या विविध कलांशी संबंध आहे. या विविध कलांचा विकास मानवाच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. प्राचीन काळापासून चौसष्ट कलांचा उल्लेख केलेला दिसतो. आज आधुनिक काळात या कलांमध्ये वाढच झालेली दिसते. विविध कलाप्रकार जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्यातच सरमिसळ करून त्यांच्यावर प्रयोग करून कलाकारांनी त्यात नवनिर्मिती केलेली आहे. सर्व कलांच्या परिचय प्रस्तुत पुस्तकात देणे शक्य नाही तरी प्रमुख कलांचा थोडक्यात परिचय दिलेला आहे.
शिक्षकाला आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या गाभा घटकांपैकी एक प्रमुख घटक म्हणून त्याचा समावेश आहे. आज विज्ञानयुगात आपण राहत असलो तरी कलेपासून मानव दूर गेलेला नाही. उलट कलांना उजाळा देण्याचे नवनवीन रूप देण्याचे कार्य सुरू आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध कला-नाट्य याद्वारे विविध विषयांचे प्रभावी अध्यापन शिक्षक करू शकतो. तसेच प्रत्येक विषयाच्या अध्यापनात नाट्याचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना देऊ शकतो.

Shikshanatil Natya Aani Kala

प्रकरण 1 नाटक आणि कला संकल्पनांचा परिचय
1.1 नाटक आणि कलेचे प्रकार-दृश्य कला आणि प्रदर्शन कला
1.2 नाटक आणि कलेचे घटक
1.3 रंगमंच कला आणि प्रेक्षक शिष्टाचार (मंचसज्जा, वेशभूषा, रंगमंचाची सामग्री, लाईट्स आणि विशेष परिणाम.)
1.4 शिक्षणात कला, संगीत आणि नाटकाची महत्त्वपूर्ण्ा भूमिका.

प्रकरण 2 नाटक आणि कलेचे शिक्षणात उपयोजन
2.1 नाटक आणि कलेची कार्ये – माहिती, अनुदेशन, प्रेरणा, शिक्षण, मनोरंजन, विकास.
2.2 शालेय अभ्यासक्रमात नाटक आणि कलेचे एकात्मीकरण.
2.3 नाटक आणि कलेद्वारा सौंदर्यात्मक संवेदनशीलतेचा विकास.
2.4 बालकांची सर्जनशीलता आणि सौंदर्यात्मक संवेदनशीलतेसाठी नाटक एक साधन.

प्रकरण 3 अध्यापनासाठी नाटक आणि कला
3.1 आत्मप्रचितीसाठी नाटक आणि कला
3.2 विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी नाटक आणि कला
3.3 सर्जनात्मक अभिव्यक्तीसाठी नाटक आणि कला
3.4 भाषा आणि सामाजिक शास्त्रांच्या अध्यापनासाठी नाटक एक उपागम.

प्रकरण 4 सामाजिक प्रस्तुतीसाठी नाटक आणि कला
4.1 सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांचे नाटक व कलेद्वारा आकलन
4.2 नाटक आणि कलेद्वारा स्थानिक संस्कृतीचे आकलन.
4.3 नाटक आणि कलेद्वारा जागतिक संस्कृतीचे आकलन.
4.4 पटकथालेखन, पथनाट्य, प्रदर्शित लोककला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षणातील नाट्य आणि कला”
Shopping cart