Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

भारताचा भूगोल

Geography of India (S-3)

, , , ,

Rs.225.00

भारत हा जगातील सर्वात जास्त भौगोलिक विवीधता असणारा देश आहे. भारत हा उत्तरेकडील हिमालयाच्या हिमाच्छादित पर्वतराजीपासून दक्षिणेस हिंदी महासागराच्या किनाऱ्यापर्यंत विस्तीर्ण अशा भुभागावर पसरलेला आहे. भारताच्या विस्तृतपणामुळे व नैसर्गिक विविधतेमुळे भारताच्या हवामानाला एक वेगळेच वैशिष्टे व विविधता प्राप्त झाली आहे. जगातील विविध प्रकारच्या हवामानाचे अविष्कार भारतात आढळतात. भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग आहेत. भारतीय उपखंड हे जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. सद्य:स्थितीत भारत हा सामाजिक, आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात आघाडीवर आहे.
सदरील पुस्तकात भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताचा प्राकृतिक विभाग, हवामान, नदीप्रणाली, मृदा, वनसंपदा, विविध धर्म, धर्माचे प्रकार, भाषा भाषाकुळे, भारतातील आदिवासी जमाती, जीवन पद्धती, त्यांचे वितरण, भारतातील रस्ते लोहमार्ग हवाईमार्ग, दळणवळण, खनिजसंपत्ती व त्यांचे वितरण, भारतातील शेती व तिचे प्रकार, समस्या इत्यादी विविधांगी बाबींचा सखोल परामर्श घेतलेला असून नकाशे व आकृत्यांचा आवश्यक तेथे समावेश केलेला आहे.

Bhartacha Bhugol

  1. भारताच्या भूगोलाचा परिचय : 1.1 प्रस्तावना, 1.2 ऐतिहासिक पार्श्वभूमी, 1.2.1 प्राचीन कालखंड, 1.2.2 मध्ययुगीन कालखंड, 1.2.3 आधुनिक कालखंड, 1.3 भारताचे शेजारील देशांशी असणारे संबंध, 1.4 भारतातील घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश.
  2. प्राकृतिक रचना : 2.1 उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, 2.2 उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, 2.3 भारतीय द्वीपकल्पीय पठार, 2.4 किनारपट्टीची मैदाने, 2.5 भारतीय बेटे.
  3. नदी प्रणाली : 3.1 हिमालयीन नद्या, 3.2 व्दिपकल्पीय पठारावरील नद्या, 3.2.1 पूर्ववाहिनी नद्या, 3.2.2 पश्चिमवाहिनी नद्या.
  4. हवामान, मृदा आणि नैसर्गिक वनस्पती जीवन : 4.1 भारतीय ऋतू आणि वातावरण, 4.1.1 भारतातील ऋतू, 4.1.2 भारतातील पर्जन्य वितरण, 4.2 मृदा प्रकार आणि वर्गीकरण, 4.2.1 मृदा निर्मिती प्रक्रिया, 4.2.2 भारतातील मृदेचे प्रकार, 4.3 मृदा धूप आणि संवर्धन, 4.3.1 मृदा क्षय किंवा ऱ्हास, 4.3.2 मृदा संवर्धन/संधारण, 4.4 वनांचे प्रकार आणि वन संवर्धन, 4.4.1 भारतीय वनांचे प्रकार, 4.4.2 निर्वनीकरण, 4.4.3 वनसंवर्धन.
  5. सांस्कृतिक रचना : 5.1 भारतातील धार्मिक विविधता, 5.2 भारतातील भाषा, 5.3 भारतातील आदिवासी जमाती, प्रदेश आणि त्यांच्या समस्या, 5.3.1 भारतातील आदिवासी जमाती व प्रदेश, 5.3.2 भारतातील आदिवासी जमातींच्या समस्या.
  6. वाहतूक : 6.1 भारताच्या प्रादेशिक विकासामध्ये वाहतुकीचे योगदान, 6.2 वाहतूक प्रकार – जमिन वाहतूक, हवाई वाहतूक, जलवाहतूक, 6.3 दळणवळण व संप्रेषण तंत्रज्ञानाचा विकास.
  7. साधन संपत्ती : 7.1 लोहखनिज, मॅग्नीज, 7.2 दगडी कोळसा, खनिज तेल, 7.3 जलविद्युत शक्ती, अणुउर्जा.
  8. शेती : 8.1 भारतीय अर्थव्यवस्थेमधील शेतीचे महत्व, 8.2 भारतातील शेतीवर आधारित उद्योगधंदे, 8.2.1 सुती कापड उद्योग, 8.2.2 साखर उद्योग, 8.2.3 ताग उद्योग, 8.2.4 रबर उद्योग, 8.2.5 तंबाखू उद्योग, 8.2.6 फळ उद्योग, 8.2.7 मसाला उद्योग, 8.3 भारतातील कृषी क्रांती – हरितक्रांती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारताचा भूगोल”
Shopping cart