Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

प्रात्यक्षिक भूगोल – II

Practical Geography - II

,

Rs.295.00

आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वंतत्र अस्तीत्व असणारी प्रमुख शाखा आहे. पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणाऱ्या अनेक घटनाबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलीक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कांट या जर्मन तत्ववेत्याच्या भौगोलिक विचारांचा विशेष प्रभाव दिसून आला. त्याचप्रमाणे बफन व बूचर यांचेही भौगोलिक विचारांचे योगदान महत्वाचे ठरले. कालांतराने अठराव्या-एकोणाविसाव्या शतकात भूगोलकारांनी भूगोलाच्या विकासात वैज्ञानिक पद्धतीने सहभाग घेतला. सहाजिकच भूगोलाच्या अभ्यासात वाढ होत जाऊन भूगोलाच्या विस्तारात वाढ होत गेली. त्याचप्रमाणे पृथ्वीगोलावरील असलेली वेगवेगळी स्थळे, भूरूपे, वस्त्या, त्याच्यातील अंतरे, त्याचा आकार, विस्तार, त्या स्थळाची लांबी व रूंदी, प्राकृतिक व सांस्कृतिक सांकेतिक चिन्हे, इत्यादीची मोजमाप करत असतांना त्यातूनच प्रात्यक्षिक भूगोलाचा उगम होवून विस्तार होत गेला. प्रस्तुत पुस्तकात प्रत्येक घटकांचा ऊहापोह साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याने विषय समजण्यास मदत होईल. आवश्यक तेथे आकृत्या व माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याने प्रात्यक्षिक भूगोलाचे ज्ञान व आकलन सहजतेने होईल.

Pratyakshik Bhugol

  1. स्थानिक विश्लेषणाची तंत्रे : 1.1 भारतीय स्थल दर्शक नकाशाची प्रस्तावना आणि भूपृष्ठाचे प्रतिनिधित्व, 1.1.1 भारतीय स्थल दर्शक नकाशाची प्रस्तावना, 1.1.2 सीमान्त माहिती किंवा समासातील माहिती, 1.2 स्थल निर्देशक नकाशांचे प्रकार, 1.3 उठाव दर्शविण्याच्या पद्धती, 1.3.1 गुणात्मक पध्दत, 1.3.2 संख्यात्मक पध्दत.
  2. भारतीय स्थल निर्देशक नकाशे आणि डेटा निर्मिती : 2.1 भारतीय स्थल दर्शक नकाशाची प्रस्तावना, 2.2 समोच्च रेषांच्या सहाय्याने भूरुपे ओळखणे किंवा दर्शविणे, 2.3 भारतीय स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन : पठारी प्रदेश, 2.4 भारतीय स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन : पर्वतीय प्रदेश, 2.5 क्षेत्र अभ्यास व खेडेगाव वृतांत.
  3. भारतीय हवामान दर्शक नकाशाचे वाचन : 3.1 भारतीय हवामान दर्शक नकाशाचा परिचय, 3.2 हवामान दर्शक सांकेतिक खुणा व चिन्ह, 3.3 समभार रेषा, 3.4 भारतीय दैनंदिन हवास्थितीदर्शक नकाशे.
  4. भौगोलिक माहिती प्रणाली ओळख व सदूर संवेधन तंत्र : 4.1 भौगोलिक माहिती प्रणाली, 4.2 भौगोलिक माहिती प्रणालीतील डेटाचे प्रकार, 4.3 छायाचित्र नकाशे, 4.4 मुक्त स्रोत जीआयएस आणि फ्रीवेअर जीआयएस अनुप्रयोग.
  5. भौगोलिक माहिती आणि त्याचे विश्लेषण : 5.1 भौगोलिक माहितीचा परिचय आणि प्रकार, 5.1.1 स्थलकालपरत्वे माहिती, 5.1.2 खंडीत व सलग श्रेणी, 5.1.3 अवर्गीकृत व वर्गीकृत माहिती, 5.2 मूलभूत विश्लेषण, 5.2.1 दंड चिन्ह व वारंवारीता सारणी, 5.2.2 वारंवारीता सारणी, 5.2.3 संकलित वारंवारीता.
  6. केंद्रीय प्रवृतीचे परिमाणे आणि विस्तार : 6.1 केंद्रीय किंवा मध्यवर्ती मूल्यांचे मोजमापनाच्या पद्धती, 6.2 विचरणाचे मोजमाप किंवा विचलन.
  7. सहसंबंध विश्लेषण : 7.1 सहसंबंध विश्लेषण, 7.2 सहसंबंध काढण्याच्या पद्धती, 7.3 परिकल्पनेची चाचणी.
  8. क्षेत्र अभ्यास मुद्दे व खेडेगाव/सहल वृत्तांत : 8.1 प्रस्तावना, 8.2 क्षेत्र अभ्यास व अभ्यासाच्या विश्लेषणाचे मुद्दे, 8.3 खेडेगाव वृत्तांताचे प्रमुख घटक, 8.4 खेडेगाव सर्वेक्षण प्रश्नावली, 8.5 सहलीसाठी परवानगी पत्रांचे नमुने.
  9. नकाशा प्रक्षेपण किंवा प्रत्यालेख : 9.1 नकाशा प्रक्षेपणाची व्याख्या, 9.2 पृथ्वी गोलावरील काल्पनिक वृत्त, 9.3 नकाशा प्रक्षेपणाची निवड, 9.4 नकाशा प्रक्षेपणाची गरज, 9.5 प्रक्षेपण किंवा प्रत्यालेख, 9.6 ख-मध्य ध्रुवीय केंद्रिय गोमुखी प्रक्षेपण, 9.7 शंकू प्रक्षेपण, 9.8 दंडगोल प्रक्षेपण, 9.9 मर्केटर प्रक्षेपण, 9.10 बहूप्रमाण अर्ध शंकू प्रक्षेपण, 9.11 आंतरराष्ट्रीय नकाशा प्रक्षेपण किंवा सुधारीत अर्धशंकू प्रक्षेपण, 9.12 वैष्विक छेदनीय प्रक्षेपण.
  10. सांकेतिक प्रक्षेपण : 10.1 सिन्युसॉयडल प्रक्षेपण, 10.2 मॉलवीड प्रक्षेपण, 10.3 गोलाकार प्रक्षेपण, 10.4 नकाशा प्रक्षेपणाची निवड.
  11. समतलन यंत्र सर्वेक्षण : 11.1 डम्पी समतलन यंत्र, 11.2 विकोणमापी उपकरण किंवा सर्वेक्षण, 11.3 इंडियन आनतिमापी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रात्यक्षिक भूगोल – II”
Shopping cart