Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

राजकीय पत्रकारिता

Political Journalism

Rs.225.00

आधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.
प्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्‍या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्‍या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.

Rajkiya Patrakarita

  1. पत्रकारितेची ओळख : 1) पत्रकारिता- अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 2) पत्रकारिता- विशेषत: उद्देश आणि महत्त्व, 3) वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटना, 4) पत्रकारिता आणि समाज, 5) माध्यमे आणि शासन, 6) राजकीय जागृती आणि राजकीय सामाजीकरणातील माध्यमांची भूमिका
  2. जनसंचाराची ओळख : 1) जनसंचार- अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि प्रक्रिया, 2) जनसंचार माध्यमे, 3) प्रेक्षकाचे प्रकार आणि वैशिष्टये, 4) जागरूकता आणि संसूचनाचे सामाजीकरण
  3. पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन : 1) पत्रकारिता आणि जनसंचाराची भूमिका आणि जबाबदारी, 2) पत्रकारिता अणि पत्रकारिता गटाची बदलती भूमिका, 3) पत्रकारितेची आदर्श आचारसंहिता वा नैतिक मूल्ये, 4) नवीन माध्यमाचा वापर, 5) पत्रकारिता आणि जनसंचाराच्या समोरिल आव्हाने
  4. राजकीय पत्रकारिता : 1) अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि वैशिष्टये, 2) राजकीय पत्रकारितेचे स्त्रोत, 3) राजकीय पत्रकारितेची आचारसंहिता, 4) पत्रकारितेचे व्यावसायिकीकरण, 5) राजकीय पत्रकारितेची भय वा भीती
  5. राजकीय पत्रकारितेची पद्धत : 1) कायदेमंडळाचा वृत्तांत, 2) राजकीय मुलाखती, 3) पत्रकार परिषद, 4) राजकीय विश्लेषण, 5) राजकीय घटनाचे वार्तांकन
  6. राजकारण आणि माध्यमे : 1) निर्णय प्रक्रियेवरील माध्यमाचा प्रभाव, 2) नेतृत्व विकासात माध्यमाची भूमिका, 3) जागरूकतेत माध्यमांची भूमिका , 4) राजकीय पक्ष प्रभावित वा समर्थक वर्तमानपत्रे, पेड न्यूज, 5) राजकीय पत्रकारिता आणि माध्यमासमोरील आव्हाने

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजकीय पत्रकारिता”
Shopping cart