Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

स्थानिक स्वराज्य संस्था

Local Self Government

,

Rs.295.00

स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना लोकशाही विकेंद्रीकरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीच्या पाठशाळा असेही म्हटले जाते. पंचायत राज हे महात्मा गांधीचे स्वप्न होते. भारतात प्राचीन काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व होते. मौर्य आणि गुप्त काळात शहरी प्रशासनाबद्दलचे काही उल्लेख इतिहासात सापडतात. ब्रिटिश काळात नगरपालिका व महानगरपालिका सारख्या नागरी संस्था अस्तित्वात असल्या तरी त्यांना मर्यादित स्वरूपाचे अधिकार होते.सद्यस्थितीत स्थानिक प्रश्नाबाबतचे अधिकार आणि जबाबदारी त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ह्या संस्थांना दिलेल्या दिसून येतात. 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्था निर्माण करण्यात आली. 21 व्या शतकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात अनेक दोष निर्माण झाले आहेत. लोकशाही विकेंद्रीकरण आणि स्थानिक विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी हे दोष नष्ट करणे ही काळाची गरज आहे.

Sthanik Swarajya Sanstha

1. स्थानिक स्वराज्य संस्था :
स्थानिक स्वराज्य संस्था इतिहास
सामूहिक विकास प्रकल्प
राष्ट्रीय विस्तार सेवा
केंद्रीय समित्या- बलवंतरॉय समिती आणि इतर समित्या
महाराष्ट्रातील पंचायतराज समित्या- वसंतराव नाईक समिती आणि इतर समित्या
पंचायतराज संदर्भातील घटना दुरुस्त्या- 73 वी आणि 74 वी दुरुस्ती

2. स्थानिक शासन स्वरूप आणि महत्त्व :
स्थानिक शासन अर्थ आणि व्याख्या
स्थानिक शासन स्वरूप आणि वैशिष्ट्ये
स्थानिक शासन महत्त्व
स्थानिक शासन मूल्यमापन
स्थानिक शासन दोष निराकरण उपाय
स्थानिक शासनाची कार्य

3. महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था :
जिल्हा परिषद – रचना, अधिकार व कार्य आणि वित्तीय व्यवस्था
पंचायत समिती – रचना, अधिकार व कार्य आणि वित्तीय व्यवस्था- सरपंच समिती
ग्रामपंचायत – रचना, अधिकार व कार्य आणि वित्तीय व्यवस्था
ग्रामसभा – रचना, अधिकार व कार्य आणि मूल्यमापन
ग्रामीण स्थानिक संस्थेत स्त्रियांचा सहभाग आणि भूमिका
पंचायत विस्तार अधिनियम 1996 (झएडअ)

4. महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था :
नगरपालिका – रचना, अधिकार व कार्य आणि वित्तीय व्यवस्था
महानगरपालिका – रचना, अधिकार व कार्य आणि वित्तीय व्यवस्था
छावणी वा कटक मंडळ – रचना, अधिकार व कार्य
औद्योगिक वसाहती – रचना व कार्य
बंदरन्यास – रचना व कार्य
नागरी स्थानिक संस्थामधील स्त्रियांची भूमिका

5. जिल्हा पोलीस व ग्रामप्रशासन :
पोलीस प्रशासन – ऐतिहासिक पार्श्वभूमी, वैशिष्ट्ये
महाराष्ट्र पोलीस प्रशासन संरचना
पोलीसदल कार्य
जिल्हा पोलीस प्रशासन रचना
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पोलीस उपअधीक्षक
मुलकी व ग्रामप्रशासन – पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी

6. स्थानिक स्वराज्य संस्थाचे मूल्यमापन :
स्थानिक स्वराज्य संस्थांचे यश वा गुण
स्थानिक स्वराज्य संस्थांचे दोष
स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमीकरणासाठी उपाययोजना

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्थानिक स्वराज्य संस्था”
Shopping cart