Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

आधुनिक राजकीय विश्लेषणाचा परिचय

An Introduction to Modern Political Analysis (G3)

,

Rs.275.00

राज्यशास्त्र हा विषय जगातील प्राचीनतम विषयापैकी महत्त्वपूर्ण विषय असून मानवाच्या संघटित जीवनास सुरूवात झाल्यानंतर पोषक पार्श्वभूमी निर्माण झाली. अनेक शतकापासून राज्यशास्त्राच्या विकासक्रमात विषयाच्या व्याख्या, व्याप्ती आणि अभ्यासपद्धतीत बदल होत गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यशास्त्राच्या अध्ययनात नवनवे प्रवाह आणि अध्ययनपद्धती उदयाला येऊ लागले. नवप्रवाहाचे समर्थन करणाऱ्या राज्यशास्त्रज्ञांनी पारंपरिक राज्यशास्त्राला अशास्त्रीय ठरविले. 1953 साली डेव्हिड ईस्टनने यांनी ‌‘राजकीय व्यवस्था’ हा ग्रंथ प्रकाशित करून खळबळ उडविली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या राजकीय परिस्थितीत व्यापक फेरबदल झाले. साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचा अंत होऊन आशिया व आफ्रिका खंडात अनेक देश स्वतंत्र झाले. या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, नव्याने उदयाला आलेल्या राष्ट्रांतील राजकीय जीवन व समुहांचा अभ्यास करणे गरजे असल्याने राज्यशास्त्राला शास्त्रीय व सर्वसमावेशक स्वरूप देणे आवश्यक झाल्याने त्यात उत्तरोत्तर सुधारणा होत गेल्या.
सदरील पुस्तकात आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या उदयाची कारणमीमांसा, स्वरूप, महत्त्व, इतर ज्ञानशाखांशी असलेला संबंध आणि मर्यादा, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन व राजकीय नेतृत्व, राजकीय संसूचन आणि आधुनिक काळात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतलेला आहे.

Adhunik Rajkiya Vishaleshanacha Parichay

  1. आधुनिक राजकीय विश्लेषणाचा परिचय : प्रस्तावना, परंपरागत राजकिय विश्लेषण – अर्थ व स्वरूप, व्याख्या, व्याप्ती, वैशिष्टये, पारंपरिक विश्लेषणाच्या मर्यादा, ऱ्हास, दोष व मूल्यमापन, परंपरागत राजकीय विश्लेषणाचे दृष्टिकोन वा अभ्यासपद्धती; आधुनिक राजकीय विश्लेषण – उदय, अर्थ व स्वरूप, आधुनिक राजकीय व्यवस्थाच्या उदयाची कारणे, नव्या राजकीय वैचारिक व्यवस्थेची वैशिष्टये, आधुनिक राजकीय विश्लेषणाची वैशिष्टये, आधुनिक राजकीय विश्लेषणाचे दोष वा मूल्यमापन, पारंपारिक व आधुनिक राजकीय विश्लेषणातील फरक.
  2. राजकीय व्यवस्था : व्यवस्थेचा अर्थ, राजकीय व्यवस्था म्हणजे काय?, राजकीय व्यवस्था : अर्थ आणि व्याख्या, राजकीय व्यवस्थेची कार्य वा कार्यपध्दती – अ) रूपांतराचे कार्य, ब) प्रदान प्रक्रियेतील कार्य, क) संपोषणाचे कार्य; राजकीय व्यवस्थेची वैशिष्टये.
  3. राजकीय संस्कृती : प्रस्तावना, राजकीय संस्कृती म्हणजे काय?, राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडणारे घटक वा आधार, राजकीय संस्कृतीची स्वरूप व वैशिष्टये, राजकीय संस्कृतीची प्रतीके, राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण वा प्रकार, डॉ. फायनर यांनी राजकीय संस्कृतीचे केलेले वर्गीकरण, राजकीय संस्कृतीतील बदल व विकास, राजकीय संस्कृतीत बदल घडवून आणणारे घटक, राजकीय संस्कृतीचे महत्त्व वा अध्ययनाची आवश्यकता, राजकीय संस्कृतीचे ऐहिकीकरण.
  4. राजकीय सामाजीकरण : राजकीय सामाजीकरण म्हणजे काय?, अर्थ व व्याख्या, स्वरूप, प्रक्रिया, राजकीय सामाजीकरणाची वैशिष्टये, राजकीय सामाजीकरणाची साधने, अभिकरणे किंवा माध्यमे, राजकीय सामाजीकरणाचे प्रकार किंवा वर्गीकरण, राजकीय सामाजीकरणाची आवश्यकता, गरज वा महत्त्व, राजकीय सामाजीकरण आणि राजकीय संस्कृती परस्परसंबंध, राजकीय व्यवस्था आणि राजकीय सामाजीकरण.
  5. राजकीय सहभाग : राजकीय सहभाग म्हणजे काय?, अर्थ व व्याख्या, स्वरूप आणि विशेषता, राजकीय सहभागावर प्रभाव पाडणारे घटक, राजकीय सहभागाचे प्रकार वा वर्गीकरण, राजकीय सहभागाच्या पातळ्या, मिलब्रॅथ यांनी दाखविलेला राजकीय सहभागाचा आकृतिबंध, राजकीय सहभागाची प्रमाणभिन्नता, राजकीय सहभागाचे महत्त्व, राजकीय उदासीनता, दौषकदृष्टी वा राजकीय अश्रद्धपणा, राजकीय अलगत्व वा विरक्ती, अनास्था व प्रमाणक-हीनता, हिंसा किंवा हिंसाचार.
  6. राजकीय श्रेष्ठजन व राजकीय नेतृत्व : राजकीय श्रेष्ठजन म्हणजे काय?, व्याख्या वा अर्थ, राजकीय अभिजन वर्गाचे स्वरूप आणि वैशिष्टये, श्रेष्ठीजन, उदय वा सिद्धांत, श्रेष्ठीजनवादाचे स्वरूप, श्रेष्ठीजनाचे स्तर वा प्रकार, राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीचे आधार, श्रेष्ठीजनाचे अभिसरण व बदल, राजकीय अभिजन व जनता, भारतातील राजकीय अभिजन; राजकीय नेतृत्व – नेतृत्व म्हणजे काय?, व्याख्या, राजकीय नेतृत्वाचे आधारभूत घटक, राजकीय नेतृत्वाची वैशिष्टये व गुण, नेतृत्वाचे राजकीय स्वरूप, शासकिय वा राजकीय नेतृत्वाची वैशिष्टये, राजकीय नेतृत्व आणि विचारधारा, राजकीय नेतृत्व आणि अधिमान्यता, राजकीय नेतृत्व आणि राजकीय व्यवस्था.
  7. राजकीय संसूचन : राजकीय संसूचन म्हणजे काय?, अर्थ व व्याख्या, राजकीय संसूचनाचे स्वरूप आणि विशेषता, राजकीय संसूचनाचे कार्य, राजकीय संसूचनाची मार्ग, साधने व माध्यमे वा लोकमत निर्मितीची माध्यमे आणि साधने किंवा वृत्त आणि प्रसारमाध्यमाची भूमिका; लोकमत म्हणजे काय?, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्टये, लोकमताची विशेषता, लोकमत निर्मितीची प्रक्रिया, लोकमत निर्मितीच्या पायऱ्या, लोकमतातील बदल घडवून आणणारे घटक.
  8. सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता : सत्ता म्हणजे काय?, अर्थ व व्याख्या, सत्ता संकल्पनेची वैशिष्टये, सत्ता निर्मितीची साधने, सत्तेचे मूलभूत आधार, सत्ता संकल्पनेचे परीक्षण वा मर्यादा; प्रभाव, अर्थ व व्याख्या, प्रभावाचे स्वरूप, प्रभावाचे आधार, प्रभावाचे मोजमाप, प्रभाव आणि सत्ता परस्परसंबध आणि फरक; अधिसत्ता किंवा अधिकार, व्याख्या, सत्ता व अधिकार यांच्यातील परस्परसंबंध व फरक, अधिसत्तेची वैशिष्टये, अधिसत्तेचे प्रकार; अधिमान्यता, अर्थ व व्याख्या, अधिमान्यता प्राप्तीचा मार्ग.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक राजकीय विश्लेषणाचा परिचय”
Shopping cart