Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

संशोधन पद्धती : वाणिज्य व व्यवस्थापन

Research Methodology in Commerce & Management

,

Rs.125.00

अध्ययन विषयात ज्या संकल्पना, सिद्धांत व निष्कर्ष स्वीकृत झालेले आहेत त्यांचे प्रामाण्य पुःपुन्हा तपासून पाहणे हे त्या संशोधकाचे कार्य आहे व सिद्धांचाची नव्याने मांडणी करण्यासाठी संशोधनाची गरज पडते. अशा प्रकारे संशोधन हा सतत सत्याचा शोध घेण्याचा एक व्यवस्थित व संघटित प्रयत्न आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन पद्धतीला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्रातील माहितीचे वेगळे स्वरूप पाहता अशा बहुविध संशोधन पद्धतीची गरज या पुढे संशोधकाला भासणार आहे.
संशोधकासाठी तसेच विविध विद्यापीठांनी संशोधन पद्धतीविषयी केलेल्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या विवेचनाचा या पुस्तकात समावेश केला आहे. प्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, साहित्यिक अध्ययन, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील नैतिकता, संशोधन आराखडा, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परीक्षण, निर्वचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

Sanshodhan Paddhati : Vanijya Va Vavysthpan

  1. संशोधन पद्धती : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, स्वरूप, वाणिज्य व व्यवस्थापनेत, संशोधनाची व्यवहारिक उपयोगिता, संशोधनाची व्याप्ती, संशोधन प्रक्रिया, संशोधन समस्या आणि सुत्रण, संशोधनातील नैतिकता, साहित्यीक, सर्वेक्षण, आदर्श संशोधकाचे गुण, संशोधन पद्धतीची मूलभूत तत्त्वे.
  2. साहित्यिक अध्ययन : प्रस्तावना, साहित्यिक अध्ययनाचे महत्त्व, साहित्याचे स्त्रोत, साहित्यिक अध्ययनाची आवश्यकता, साहित्यिक अध्ययनाचा हेतू, साहित्यिक अध्ययनाची प्रक्रिया, साहित्यिक अध्ययन लेखनाची शैली
  3. संशोधन आराखडा : प्रस्तावना, संशोधन आराखड्याचा अर्थ, संशोधन आराखड्याची आवश्यकता, संशोधन आराखड्यातील आवश्यक घटक, चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये, संशोधन आराखड्याचे प्रकार, संशोधनातील विश्वसनियता आणि प्रामाण्य, व्यवहारिक संशोधन आराखडा
  4. नमुना आराखडा : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, नमूना निवडीतील पायर्‍या, नमूना निवड पध्दतीचा आधार, नमूना निवडीच्या समस्या, नमूना निवडीच्या पध्दती, नमूना आकाराचे स्वरूप
  5. माहिती व्यवस्थापन : प्रस्तावना, तथ्य संकलन, तथ्याचे प्रकार, तथ्ये संकलनाची तंत्रे, प्रश्नावली तयार करताना महत्त्वाचा बाबी, अनुसुची निर्मिती करताना महत्त्वाच्या बाबी, प्रश्न निवडणे, मापनाच्या शलाका, अनुमापन तंत्र, सुयोग्य मापनाच्या कसोट्या, अनुमापनाचे आधार, अनुमापनाचे प्रकार
  6. गृहितकृत्ये परिक्षण : प्रस्तावना, गृहीतकृत्याचा अर्थ व व्याख्या, गृहीकृत्याची उगमस्थाने, गृहीतकृत्याचे महत्त्व, गृहीकृत्याचे प्रकार, श्रेष्ठ गृहीतकृत्याचे गुण, गृहीतकृत्ये परिक्षणाच्या पायर्‍या, गृहितकृत्ये परिक्षणाचा आकृतिबंध, गृहितकृत्ये परिक्षणाचे प्रकार, सार्थकता स्तर, गृहितकृत्याचे कार्य.
  7. निरवचन व अहवाल लेखन : निरवचन-अर्थ, निरवचनाची तंत्रे, निरवचन करताना घ्यावयाची दक्षता, अहवाल लेखन संघटन, आदर्श अहवाल लेखनाचा उद्देश, अहवालातील महत्त्वाचे मुद्दे, अहवालाच्या पायर्‍या, संशोधन अहवालाचा आकृतिबंध, संशोधन अहवालाचे प्रकार, अहवाल लेखनातील घ्यावयाच्या दक्षता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संशोधन पद्धती : वाणिज्य व व्यवस्थापन”
Shopping cart