Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

भारतीय राजकीय व्यवस्था

Indian Political System

Rs.350.00

प्रत्येक देशाला स्वतःचे संविधान असणे आवश्यक आहे. या संविधानात त्या देशाच्या शासनकारभारविषयक बाबींची तरतूद असते. पण त्याबरोबरच त्या देशातील जनतेच्या आशाआकांक्षेचे व त्या देशाने स्वीकारलेल्या ध्येयाचे निदर्शनही असते. स्वतंत्र राष्ट्रातील नागरिकांना स्वतःचे संविधान निर्माण करण्याचा अधिकार असतो व ते, तो अधिकार संविधानसभा नेमून बजावतात. संविधानसभेत जनतेचे प्रतिनिधी चर्चा करुन संविधान तयार करतात व अशा संविधानानुसार त्या देशाचा शासनकारभार चालतो. जनतेच्या प्रतिनिधींनी संविधानसभेत एकत्र तयार केलेले संविधान म्हणजे त्या राष्ट्राच्या राज्यकारभाराविषयीचा वेदग्रंथ होय. त्याचे प्रामाण्य सर्वश्रेष्ठ असते. संविधान हा मूलभूत कायदा असतो. त्याचे मांगल्य व पावित्र्य कायम राखण्याची जबाबदारी त्या देशातील सर्व नागरिकांवर असते.
सदर ग्रंथात भारतीय संविधान निर्मितीची संक्षिप्त माहिती, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये, संविधानाचा सरनामा, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, निर्वाचन आयोग या संदर्भातील संविधानात्मक तरतुदींची अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Bharatiy Rajkiya Vyavastha

1. भारतीय संविधान आणि उद्देशपत्रिका :
i) भारतीय संविधानाची निर्मिती : संविधान सभेची कार्ये
ii) भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये
iii) उद्देशपत्रिका : संहिता आणि महत्त्व

2. मूलभूत अधिकार-कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे :
i) मूलभूत अधिकार आणि त्यांचे महत्व
ii) मूलभूत कर्तव्ये
iii) राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे

3. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती :
i) भारताचे राष्ट्रपती : निवडणूक प्रक्रिया, अधिकार, कार्ये आणि स्थान
ii) उपराष्ट्रपती : निवडणूक प्रक्रिया, अधिकार, कार्ये आणि स्थान

4. भारताचे पंतप्रधान आणि मंत्रिपरिषद :
i) पंतप्रधान : नियुक्ती, अधिकार, कार्ये आणि भूमिका
ii) मंत्रिपरिषद : निर्मिती, भूमिका आणि कार्ये

5. संसद आणि न्यायव्यवस्था प्रणाली :
i) संसद : राज्यसभा आणि लोकसभा
ii) न्यायव्यवस्था : सर्वोच्च न्यायालय

6. निवडणूक आयोग आणि आचारसंहिता :
i) निवडणूक आयोग : रचना, अधिकार आणि कार्ये
ii) निवडणूक आचारसंहिता

7. राज्यशासन आणि मंत्रिमंडळ :
i) राज्यपाल : नियुक्ती, अधिकार आणि भूमिका
ii) मुख्यमंत्री : नियुक्ती, अधिकार आणि भूमिका
iii) घटकराज्यातील मंत्रिमंडळ : निर्मिती, अधिकार आणि भूमिका

8. राज्य विधिमंडळ :
i) राज्य विधिमंडळ : विधानसभा, विधानपरिषद
ii) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष : अधिकार आणि कर्तव्ये

9. राज्यस्तरीय न्याय व्यवस्था प्रणाली :
i) उच्च न्यायालय : रचना आणि अधिकारक्षेत्र
ii) जिल्हा न्यायालय : रचना आणि अधिकारक्षेत्र

10. स्थानिक स्वराज्य संस्था :
i) ग्रामपंचायत : रचना, अधिकार, कार्ये आणि महत्त्व
ii) ग्रामसभा : रचना, अधिकार, कार्ये आणि महत्त्व

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राजकीय व्यवस्था”
Shopping cart