Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

शाश्वत ग्रामीण विकास

(ग्रामपंचायत महिला सदस्यांचे योगदान)

Rs.295.00

पंचायत राज व्यवस्थेचा मुळाचा शोध झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसून आले. ‘अनेक लहानमोठया खेडयांनी मिळून बनलेला देश’ अशी भारताची जुन्या काळापासून ओळख होती. या खेडयाचा कारभार स्थानिक लोकांमार्फत ‘ग्रामपंचायती’या संस्थेव्दारे चालविला जात होता. महात्मा गांधीनी स्वातंत्र संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात स्थानिय प्रशासनाच्या दिशेने नवीन प्रयत्न सुरू झाले. पंचायतीला खर्‍या अर्थाने यशस्वी बनवायचे असेल तर त्यामध्ये स्त्रियांच्या भूमिकेला नाकारता येत नाही. जर लोकांना जागृत करायचे असेल तर सर्वप्रथम स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. एकदा जर स्त्रियां समोर आल्या तर संपूर्ण ते कुटुंब विकसीत होते. परिणामी देशाचासुद्धा विकास होतो. 1959 मध्ये बलवंतराय समितीने सुध्दा महिलांच्या प्रतिनिधीत्वाची व्यवस्था केली. 73 व्या घटना दुरूस्तीनंतर पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 1/3 आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. अनुसुचित जाती जमातीमध्ये स्त्रियांना सुध्दा आरक्षण देण्यात आले.

Shasvat Gramin Vikas

  1. पंचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास : प्राचीन ग्रामपंचायत, मुस्लिम राजवटीत ग्रामपंचायती, शिवाजी महाराजांच्या काळातील ग्रामपंचायत, इंग्रजांच्या राजवटीतील ग्रामपंचायत, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंचायतराज, बलवंतराय मेहता अभ्यास गट, पंचायत राज व्यवस्थेचा आढावा, महाराष्ट्रात पंचायत राज अभ्यास, एल.एम. सिंघवी समिती, घटनात्मक दर्जा देण्यासाठी शिफारस; 73 वी घटना दुरूस्ती : बदल – ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्य संख्या, ग्रामपंचायत सदस्या करिता राखीव जागा, ग्रामपंचायतीची मुदत, निवडणूक आयोगाची (मंडळाची) स्थापना, निवडणूकीच्या काळात पाळाव्या लागणार्‍या आचार संहितेचे नियम, निवडणूकीला उभे राहण्यासाठी वयाची अट, ग्रामपंचायतीची शक्ती, अधिकार आणि जबाबदारी – ग्रामपंचायतीकडे 11 व्या अनुसुचीनुसार 29 कामे वर्ग, ग्रामपंचायतीला कर व फी आकारण्याचे अधिकार व ग्रामपंचायतीचा निधी; राज्य वित्त आयोग – हिशोब तपासणी, ग्रामसभा, ग्रामसभेचे सदस्य, ग्रामसभेचा कारभार, ग्रामसभेचे पदाधिकारी, ग्रामसभेचे अधिकार, मुंबई ग्रामपंचायत (सुधारणा) अधिनियम 2006 नुसार विशेष सुधारणा, ग्रामसभा गावाचे व्यासपीठ, ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी घ्यावयाची काळजी, गावगुंड आणि ग्रामपंचायत, स्वतंत्र ग्रामपंचायत कशी मिळवावी?, अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार, ग्रामसभेच्या बैठका, ग्रामसभा तहकूब, सभेचे इतिवृत्त, ग्रामसभेच्या बैठका, ग्रामसभेची बैठक बोलविण्याचे अधिकार, ग्रामसभेची बैठकीची नोटीस, बैठकीचे स्थळ, ग्रामसभेच्या बैठकीची नोटीस किती दिवस अगोदर काढावी?, ग्रामसभेच्या बैठकीच्या नोटीशीची प्रसिध्दी, ग्रामसभेची कार्यक्रम पत्रिका; ग्रामपंचायतीची संसाधने – ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय क्षमता शक्ती व अधिकार, ग्रामपंचायत विकास आराखडयाची अंमलबजावणी, तांत्रिक सेवा, संनियत्रण कार्यपध्दती, नियमित व सातत्यपूर्व आढावा बैठक, अहवालाची कार्यपध्दती, निधीचा उपलब्धता व संवितरण पध्दती, आराखडा अंमलबजावणीतील लोकसहभाग, आमचं गाव आमचा विकास; पंचायत राज्याचे नेतृत्व – अ) निर्वाचित आ) नियुक्त अधिकारी इ) अधिकारी नेते परस्पर संबंध; आर्थिक साधने, नियंत्रण, पंचायत राज्यांच्या कार्याचे मुल्यमापन; स्थानिक स्वराज्य संस्था, स्वातंत्रपूर्व काळात विकासाचे प्रकल्प व त्यांचे प्रवर्तक, अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्य व जबाबदारी, विविध घटकांच्या भूमिका; पंचायतराज संस्थांची संविधानिक जबाबदारी – ग्रामपंचायतीची संविधानिक जबाबदारी, ग्रामपंचायतीचे कामे, सरपंचाची कर्तव्ये, ग्रामसेवकाची कामे, ग्राम विकास विभागाची सरंचना व उद्दिष्टे, ग्राम विकास विभाग, ग्रामस्थांच्या सनदेची अंमलबजावणी, शासन निर्णय, ग्रामपंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया, ग्रामपंचायत विकास आराखडयातील खर्चाचे नियोजन, विकास आराखडा तयार करण्याची कार्यप्रणाली, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मध्ये आणखी सुधारणा करणारे सन 2003 चे अधिनियम क्र.27 व 28,23 च्या अंमलबजावणीबाबत, वित्त आयोग
  2. अध्ययन व विश्लेषण : ग्रामपंचायतीशी निगडित अनेक लोकांनी अभ्यास, विषयाची निवड, अध्ययनाचे महत्व, मुलभूत संशोधन प्रश्न, अध्ययनाचे मुख्य उद्देश, गृहीतकृत्ये (उपकल्पना), महत्वपूर्ण संकल्पनाच्या व्याख्या, संशोधन आराखडा, अध्ययनाचा प्रकार, अध्ययनाचे क्षेत्र व विश्व, आधार सामुग्री संकलन पध्दती आणि तंत्रे – प्राथमिक स्त्रोत, दुय्यम स्त्रोत; आधार सामुग्री प्रक्रियण, सांख्यिकिय आधार सामुग्री विश्लेषण आणि निर्वाचण, प्रमुख शोध आणि निष्कर्ष, अध्ययनाची व्याप्ती व मर्यादा
  3. महिला सदस्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी : वयोगट आणि शिक्षण, जात आणि शिक्षण, जात आणि कुटुंबातील सदस्याचे परस्पर संबंध, कुटुंबातील सदस्याचे परस्पर संबंध, व्यवसाय, वैवाहीक स्थिती आणि समाजामध्ये दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न, कुटुंबाचा प्रकार आणि कुटुंबामध्ये स्थान, कुटुंबाचा प्रकार आणि समाजामध्ये स्थान व दर्जा, कुटुंबाचा प्रकार आणि कुटुंबात महिलांना राजकारणात बंधंने, कुटुंब सदस्य संख्या, महिला ग्राम पंचायत सदस्यांचे कुटुंबातील स्थान, ग्रामपंचायतीच्या कार्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष, कुटुंबातील इतर व्यक्ती व्दारे लढवलेली निवडणूक
  4. महिला सदस्यांची सामाजिक पार्श्वभूमी : ग्रामपंचायतचे सामाजिक जीवनातील स्थान, ग्रामपंचायतचे आर्थिक जीवनातील स्थान, समाजामध्ये स्थान व दर्जा, समाजामध्ये दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न, समाजात वावरतांना आलेल्या अडचणी, समाजातील घटक असल्यामूळे समाजातील घटकांचा प्रभाव, सर्व सामाजीक कार्यक्रमात सहभाग, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात स्वत:चा सहभाग, स्त्रियांनी कमावलेल्या पैशाचा विनीयोगाचे स्वातंत्र्य – सहमती, कुटुंबात महिलांना राजकारणात बंधंने घालण्याची कारणे, समाजातील इतर महिलांचा राजकारणात सहभाग
  5. महिला सदस्यांची ग्रामसभेतील भूमिका : पंचायतराज संस्थांची संविधानिक जबाबदारी, ग्रामपंचायतीचे कामे, ग्रामपंचायतीशी संबंधित कामांची माहिती व कार्यपूर्तीच्या कालावधी, सरपंचाची कर्तव्ये, ग्रामसेवकाची कामे, पंचायतीराज मध्ये स्त्रियांची भूमिका, ग्रामसभेला जादा अधिकाराचा कायदा, ग्रामसभेची पूर्व तयारी, शिक्षण आणि ग्राम सभेच्या सदस्याचे अधिकार, शिक्षण आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या द़ृष्टिनेे ग्रामसभेची भूमिका, वय आणि राजकीय सहभागामुळे स्त्रियांमध्ये झालेले बदल, कुटुंबामध्ये स्थान आणि ग्रामसभेत पुरूषांचे सहकार्य, शिक्षण आणि 73व्या घटना द़ृरूस्ती विषयी जनजागृती, पंचायत राजमार्फत ग्रामीण विकासाच्या योजना आणि विकास, शाश्वत ग्रामीण विकासाच्या द़ृष्टिनेे ग्रामसभेची भूमिका आणि विकास, ग्रामपंचायत सदस्य झालेली वर्षे, ग्राम सभेच्या अधिकार कर्तव्याबाबत महिला सदस्या जागरूक, ग्राम सभेच्या सदस्या म्हणून बजावित असलेले अधिकार, ग्राम सेवकाशी ग्राम पंचायत कामकाजासंबंधी संबंध, सरपंचाशी ग्राम पंचायत कामकाजासंबंधी संबंध, ग्रामस्थांशी ग्राम पंचायत कामकाजासंबंधी संबंध, ग्राम पंचायतीमध्ये ग्राम सभेच्या बैठकांचे आयोजन, मागील एक वर्षात ग्राम पंचायतीव्दारे घेतलेल्या ग्रामसभा, ग्राम सभांमध्ये साधारणपणे ग्रा.पं. सदस्यांची उपस्थिती, शाश्वत ग्रामीण विकासाच्या द़ृष्टिनेे ग्रामसभेची भूमिका, 73 व्या घटना दुरूस्ती विषयी जनजागृती/जागरूकता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमविषयी माहिती, ग्राम सभांमध्ये साधारणत: महिलांची उपस्थिती, ग्राम सभांमध्ये जनतेच्या इच्छा नाकारल्यास जबाबदार पदाधिकारी, ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक तत्व, ग्रामसभेत पुरूषांचे सहकार्य, ग्रामसभेत पूरूषांचा सहकार्य मिळाल्यास कोणाकडून?, राजकीय सहभागामुळे स्त्रियांमध्ये झालेले बदल, ग्रामपंचायत सदस्याच्या रूपाने कार्य करीत असतांना अडथळे, महिलांना राजकीय सहभाग मिळाल्याने फायदे, राजकीय सहभागामुळे स्त्रियांचा विकास होतो, या मताशी सहमती, राजकीय पक्षाच्या सदस्य असल्यास कोणत्या?, राजकीय पक्षाने आयोजीत केलेल्या आंदोलनात/अधिवेशनात भाग, महिलांच्या विकासासाठी राजकीय सत्ता, पंचायत राजमार्फत राबविलेल्या ग्रामीण विकासाच्या योजना, योजनांमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या सोयी, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या भूमिकेमुळे ग्रामीण जनतेचा विकास, ग्रामीण जनतेचा आर्थिक विकासाचे प्रमाण, ग्रामीण जनतेचा सामाजिक विकासाचे प्रमाण, ग्रामीण जनतेचा शैक्षणिक विकासाचे प्रमाण, ग्रामीण भागातील जनतेचा आरोग्य विषयक दर्जात सुधाराचे प्रमाण, ग्रामीण जनतेच्या रोजगाराच्या संधीत वाढ, विविध योजनांमुळे ग्रामीण भागाचा विकास, ग्रामसभेत सूचविलेली कामे, प्रत्येक वेळी तेच ठराव, ग्रामसभेत सूचविलेल्या कामाचा आधार, सूचविलेले काम मंजूर होण्यासाठी केलेला पाठपुरावा, ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग, काम करण्याची संधी व प्रशिक्षण मिळाल्याने जनतेचे नेतृत्व करण्यास सक्षम, पंचायत राज पध्दतीच्या अवलंबामुळें सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्राम सभेतील चर्चेत सहभाग, ग्रामसभेतील एखादा ठराव किंवा चर्चा जनहिताची नसल्यास त्यास विरोध, ग्रामपंचायतच्या आमसभेत विषयावर चर्चा, पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांच्या सनदीच्या अंमलबजावणीला वेग, ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्राम समित्या, गावातील विविध ग्राम विकास समित्यांची जबाबदारी पार पाडणे, ग्रामसभेव्दारे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक बृहत विकास आराखडा तयार, पंचवार्षिक विकास आराखडा तयार करतांना निधी विचारात घेणे, ग्रामपंचायत विकास आराखडा

परिशिष्ट – (अ) शोध आणि निष्कर्ष
परिशिष्ट – (ब) उपकल्पनांचे परीक्षण
परिशिष्ट – (क) सूचना व शिफारशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शाश्वत ग्रामीण विकास”
Shopping cart