Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

पंचायत राज

Rs.550.00

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर देशात लोकशाही अवतरली. देशाचा राज्यकारभार निर्वाचित लोकप्रतिनिधींमार्फत सुरू झाला. यात केंद्रस्थानी लोकसभा व राज्यसभा निर्माण करण्यात येऊन राज्यस्तरावर विधान सभा व विधान परिषद निर्माण करण्यात येऊन केंद्रस्थानी केंद्रीय मंत्रीमंडळ व राज्यस्थानी राज्य मंत्रीमंडळ कारभार करू लागले. यात सर्व सत्ता केंद्रीय स्थानी व राज्य स्थानी केंद्रीत असल्याने देशातील जनतेचा विकास होण्यात फार मोठी खीळ बसल्याचे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले. म्हणून हा अडथळा कसा दूर करता येईल. या करिता शासनाने बलवंतराय मेहता, अशोक मेहता, जी. व्ही. के. राव, डॉ. एल. एम. सिंघवी, पी. के. भुंगन, वसंतराव नाईक समिती, ल. ना. बोंगीरवार, मंत्रीमंडळ उपसमिती, पी. बी. पाटील समिती, केंद्र सरकारच्या समित्या, प्रशासकीय सुधार आयोग, सादिक अली समिती, गिरधारीलाल समिती या विविध समित्यांच्या नेमणूका केल्या. सर्वात प्रथम लोकशाही विकेंद्रीकरणाला राज्यस्थान सरकारने प्राधान्य देऊन पंचाय राजचा प्रयोग सुरू केला. 1 मे 1962 पासून पंचायत राजची अधिकृत सुरूवात करण्यात आली.
प्रस्तुत ग्रंथात स्थानिक स्वराज्य संस्था स्वरूप आणि महत्त्व, पंचायत राज एक ऐतिहासिक संदर्भ, स्वातंत्र्या प्राप्ती पासून आज पर्यंत पंचायत राज, पंचायत राज व भारतीय राज्यघटना 64, 73 वी घटना दुरूस्ती, पंचायत राज प्रमुख विचारधारा, पांच तत्वे, समित्यांचे अहवाल, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासन, वित्तिय प्रशासन, पदाधिकाऱ्यांची स्थिती व कार्ये, कर्मचारी वर्गाची स्थिती व कार्ये, ग्रामीण विकास व पंचायत राज, विकेंद्रीकरण, स्वयंसेवी संस्था व पंचायत राज. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात पंचायत राजची भूमिका, जनसंख्या नियंत्रणाचे पंचायत राज मॉडेल, महिला आरक्षण तरतूद, जनतेचा सहभाग, नेतृत्व, नियंत्रण, समस्या व पंचायत राजचे मूल्यमापन इ. विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांची सखोल माहिती दिल्याने एमपीएससी, यूपीएससी त्याचप्रमाणे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Panchayat Raj

 1. स्थानिक स्वराज्य संस्था : स्वरूप आणि महत्त्व : प्रस्तावना, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थेची वैशिष्ट्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेचे महत्त्व.
 2. भारतात पंचायत राज : ऐतिहासिक संदर्भ : प्रस्तावना, पंचायत राज मागील तात्वीक भूमिका, संकल्पना, वैशिष्ट्ये, प्राचीन भारतात पंचायती राज, राजस्थानातील प्राचीन काळातील पंचायती राज, मौर्य युग, गुप्तकाळ, मध्यकाळात पंचायती, ब्रिटिश शासन काळ, गांधीजींचे पंचायत राज संबंधी विचार, भारतीय घटना तसेच पंचायत राज.
 3. पंचायत राज : स्वातंत्र्यप्राप्ती ते आजपर्यंत : प्रस्तावना, स्वातंत्र्या नंतरचे पंचायत राज – (1) प्रथम पंचवार्षिक योजना आणि पंचायतराज (2) द्वितीय पंचवार्षिक योजना आणि पंचायत राज (3) राष्ट्रीय प्रसार सेवा (4) सामूहिक विकास, विनोबाजींची पंचसूत्री योजना, कार्यक्रमाची रूपरेषा, सामूहिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय प्रसार सेवा, शासकीय यंत्रणा, पंचायत राज संस्थांचे संचालन सन 1959 ते 1977, पंचायत राज संस्थांचे सकारात्मक योगदान, पंचायत राज संस्थांचे नकारात्मक लक्षण, पंचायत राजचे पुनर्जिवन 1978 ते 1989, अर्थ व्यवस्था, लोकशाही विकेंद्रीकरण.
 4. पंचायत राज व भारतीय राज्यघटना (64, 73 आणि 74 वी घटनादुरूस्ती) : प्रस्तावना, 64 वी घटना दुरूस्ती, 73 वी घटना दुरूस्ती, घटना दुरूस्तीत कायद्याची व्याप्ती, राज्य घटनेतील 11 वे परिशिष्ट.
 5. पंचायत राज : प्रमुख विचारधारा : प्रस्तावना, पंचायत राज प्रमुख विचार धारा – (1) सर्वोदय विचार धारा (2) स्वायत्त शासनात्मक विचारधारा (3) नोकरशाही विचारधारा (4) विकासवादी विचारधारा (5) लोकशाही विचारधारा (6) साम्यवादी विचारधारा.
 6. पंचायत राज : पाच तत्वे : प्रस्तावना, पंचायत राजची पांच तत्वे – (1) सहभाग (2) सामाजिक समता (3) आर्थिक विकास (4) पारदर्शकता (5) प्रशिक्षण.
 7. पंचायत राज संदर्भात समित्यांचे अहवाल : बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, जी. व्ही. के. राव समिती, डॉ. एल. एम. सिंघवी समिती, पी. के. थुंगन समिती, वसंतराव नाईक समिती, ल. ना. बोंगीरवार समिती, मंत्रीमंडळ उप समिती, पी. बी. पाटील समिती, केंद्र सरकारचे प्रयत्न/समित्या, प्रशासकीय सुधार आयोग, सादिक अली समिती, गिरीधारीलाल समिती.
 8. ग्रामसभा : प्रस्तावना, ग्रामसभेकडून आशा, ग्रामसभेची सूचना, ग्रामसभेचे वर्ष, उद्दिष्ट्ये, ग्रामसभेचे नियम, आयोजन, बैठकी, बैठकीचे वेळापत्रक, ग्रामसभेच्या बैठकीचा अध्यक्ष, गणपूर्ती, विषय पत्रिका, ग्राम सभांची संख्या, ग्रामसभेचे पदाधिकारी, महिलांची ग्रामसभा, बैठकीचे कामकाज, लेखा विवरणे ग्राम सभे पुढे ठेवणे, ग्राम सभेचे स्थान व भूमिका, ल. ना. बोंगीरवार समितीच्या शिफारशी, पी. बी. पाटील समितीने सुचविलेली त्रीस्तरीय यंत्रणा, ग्राम सभा अध्यक्षांचे अधिकार व कार्ये, ग्राम सभेचे अधिकार व कार्ये, अनुसूचित क्षेत्रातील ग्राम सभेचे अधिकार व कर्तव्ये, आदिवासी ग्राम सभांना विशेेषाधिकार, ग्रामीण भागातील गरिबांच्या उन्नतीसाठी भारत सरकारचे धडाडीचे उपाय, ग्रामीण राजकारणाचे व्यक्तिगत स्वरूप, ग्रामीण जनतेचा नकार, ग्राम सभेला प्रभावी बनविण्याकरिता उपाय, ग्रामसभेला प्रभावी बनविण्याचे उपाय, ग्रामसभेला दुय्यम स्थान का?, सरपंचावर बंधनकारक, ग्रामसभा निष्क्रिय होण्याची कारणे, ग्रामसभा एक मूल्यांकन, ग्रामसभेच्या कार्याचे मूल्यमापन.
 9. ग्रामपंचायत : प्रस्तावना, ग्रामपंचायत ऐतिहासिक आढावा, 73 व्या घटना दुरूस्तीने घडवून आणलेले बदल, पंचायत राज प्रबल करण्यासाठी संविधान परिवर्तन, अधिनियमान्वये स्थापित संस्था, पायाभूत संस्था, पंचायत राजचा आधार, मार्गदर्शन तत्त्वात स्थान, सन 1963 च्या मुंबई ग्रामपंचायत कायद्याने हेतू, ग्रामपंचायतीची स्थापना, ग्रामपंचायतीची रचना, राज्य निर्वाचन आयोग, सरपंच, उपसरपंच, सादिक अली समितीच्या शिफारशी, पी. बी. पाटील समितीच्या सूचना, डॉ. द. गो. कापडणीस यांची कारण मीमांसा, ग्रामपंचायती पुढील समस्या, ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे अधिकार व कार्ये, ग्रामपंचायतीचे अंदाज उत्पन्नाची साधने, ग्रामपंचायतीचे निधी, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीची वित्तिय व्यवस्था, ग्रामपंचायतीचे हिशेब व कार्यलयीन तपासणी, ग्रामपंचायतीवरील नियंत्रण, सादिक अली समितीने केलेल्या शिफारशी, ग्रामपंचायतीचे मूल्यमापन.
 10. पंचायत समिती : प्रस्तावना, अधिनियमान्वये स्थापन केलेली संस्था, जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली संस्था, पंचायत समित्यांची स्थापना, कार्यक्षेत्र ग्रामीण विभागा पुरते, पंचायत समितीची रचना, पंचायत समितीचे पदाधिकारी, पंचायत समितीतील प्रशासकिय सेवक, पंचायत समितीचे अधिकार व कार्ये, पंचायत समितीची वित्त व्यवस्था, पंचायत समितीची आर्थिक साधने, पंचायत समितीचे अंदाजपत्रक, पंचायत समितीचे स्थान, मूल्यमापन.
 11. जिल्हा परिषद : प्रस्तावना, अधिनियमान्वये स्थापन झालेली संस्था, त्रिस्तरीय रचनेतील संस्था, स्थापना, कार्यक्षेत्र ग्रामीण विभागा पुरते, राजस्थान मध्ये जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेची रचना, जिल्हा परिषदेची कार्य पद्धती, राज्य निर्वाचन आयोग, जिल्हा परिषदेची प्रशासकिय यंत्रणा, जिल्हा परिषदेचे अधिकार व कार्ये, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेची आर्थिक साधने, जिल्हा परिषदेच्या आर्थिक बाबी, जिल्हा परिषद अंदाजपत्रक, नियंत्रण, समस्या, पंचायत राज कार्याचे मूल्यमापन.
 12. पंचायत राज : कर्मचारी प्रशासन : प्रस्तावना, कर्मचारी वर्गाचे वर्गीकरण, ग्रामसेवक, ग्रामशिक्षिका, ग्रामसेविका आणि महिला प्रशिक्षण, विस्तार अधिकारी, सामाजिक शिक्षण अधिकारी, मुख्य सेविका, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, भरती, शिक्षण आणि प्रशिक्षण, पंचायत राज संस्था, ग्रामीण विकासकरिता राष्ट्रीय संस्था, प्रशिक्षणार्थिंचे शिक्षण, प्रशिक्षण कार्यक्षम सुधारण्याकरिता प्रस्ताव , प्रशासनात्मक कार्यवाही, कर्मचारी प्रशासनाचे महत्त्व.
 13. पंचायत राज : वित्तिय प्रशासन : प्रस्तावना, वित्तिय प्रशासनाची रचना, अर्थसंकल्प तयार करणे, अपूरी वित्तिय साधना, स्थानिक संस्थांना अनुदाना संबंधी नियम, उत्पन्न व कार्य यांचा परस्पर संबंध, स्थानिक प्रशासनाचे कार्य, स्थानिक उत्पन्नाचे मार्ग, महाराष्ट्र पंचायत राज संस्थातील वित्तिय व्यवस्था , पंचायत राज संस्थांची उत्पन्नाची साधने, पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधने, पंचायतीने आर्थिक परावलंबन, जिल्हा परिषदेची उत्पन्नाची साधने, जिल्हा परिषदेचे परावलंबन, पंचायत निधी, पंचायत समिती, जिल्हा परिषद निधी, पंचायत राज संस्थेची हिशेब व्यवस्था, राज्य वित्त आयोग.
 14. निवडलेल्या पदाधिकाऱ्यांची स्थिती आणि कार्ये : प्रस्तावना, सरपंचाची स्थिती आणि कार्य, सरपंच ग्रामपंचायतचे अध्यक्षाचे दृष्टीने, सरपंचाचे प्रशासन आणि विकास प्रशासनाचे कार्ये, वित्तिय प्रशासना संबंधी कार्य, जनतेचे सहकार्य इत्यादि कार्ये, पंचायत समितीच्या अध्यक्षाची स्थिती व कार्य, पंचायत समितीची अध्यक्ष म्हणून करावयाची कार्ये, प्रशासकिय कार्ये, वित्तिय अधिकार व कार्ये, कायदे विषयक कार्ये, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून करावयाची कार्ये.
 15. कर्मचारी वर्गाची स्थिती आणि कार्ये : प्रस्तावना, जिल्हाधिकाऱ्याची स्थिती, प्रांत विकास अधिकारी, कृषी अधिकारी, शुपालन अधिकारी, सहकार प्रसार अधिकारी, उद्योग प्रसार अधिकारी, शिक्षण प्रसार अधिकारी, सहाय्यक अभियंता, ग्राम सेवक.
 16. पंचायत राज आणि ग्रामीण विकास : प्रस्तावना, पंचायत विभागाचा इतिहास, विकास विभाग, विकास विभागाची कार्ये, पंचायत तसेच विकास कामाची स्थापना, ग्रामीण विकास तसेच पंचायती राज विभाग, ग्रामीण विभाग तसेच पंचायत राज विभागाची रचना, ग्रामीण विकास तसेच पंचायत राज विभागाचे कार्य.
 17. पंचायतीच्या माध्यमातून विकेंद्रीकरण : प्रस्तावना, पंचायतच्या निवडणूकांची स्थिती, कार्यात्मक,वित्तिय व प्रशासकिय शक्तिंचे हस्तांतरण, ग्राम सभेची स्थिती, जिल्हा योजना समिती, विस्तार अधिनियम, केंद्र प्रायोजित स्कीम समांतर रचना, निष्कर्ष.
 18. पंचायत राज आणि स्वयंसेवी संस्था : प्रस्तावना, हिमाचलच्या संदर्भात पंचायत राज, स्वयंसेवी संस्थाच्या भूमिकेवर शंका, जन जागरण सुद्धा प्रासंगिक, आवश्यकता एका रचनात्मक प्रारंभाची, एक शेवटची आशा.
 19. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात पंचायतीची भूमिका : प्रस्तावना, शिक्षणात पंचायतीची भूमिका.
 20. जनसंख्या नियंत्रणाचे पंचायत राज मॉडेल : प्रस्तावना, ग्रामीण क्षेत्र, लोकसंख्या नियंत्रण, काही उदाहरणे, मूल्यांकन.
 21. पंचायत राज : महिला आरक्षणाची तरतूद : प्रस्तावना, महिला आरक्षणाकरिता तरतूदी, राजस्थानात पंचायतराज निवडणूकीत महिला आरक्षणापासून तथ्य, महिला विकास कार्यक्रम, स्वरोजगार योजना, तसेच महिला पंचांची जबाबदारी, महिलांचे उन्नतीचे प्रभावी आधारभूत मुद्दे.
 22. पंचायत राज आणि जनतेचा सहभाग : प्रस्तावना, विकास कार्यक्रम अंमलबजावणी, स्थानिक जनतेची भागीदारी, सक्रिय जनतेच्या भागीदारी शिवाय योजनेचे केंद्रीकरण यशस्वी होऊ शकते काय?, जनतेच्या भागीदारीचे स्वरूप कसे असावे?, पंचायत राज कां?, शक्ति हस्तांतरणाची अनिवार्यता.
 23. पंचायत राज : नेतृत्व : प्रस्तावना, नव्या ग्रामिण नेतृत्त्वाचा विकास, नेतृत्त्वाचे वय, नेतृत्त्वाचे पैलू, प्रशासकिय नेतृत्त्व, नेतृत्त्वाचे घटक, नेतृत्त्वाची घडण, नेतृत्त्वाची शैक्षणिक गुणवत्ता, पंचायत राज नेतृत्त्वाची गुण वैशिष्ठये, नेतृत्त्वातील दोष, पंचायत राज नेतृत्त्व-निष्कर्ष.
 24. पंचायत राज संस्थांवरील नियंत्रण : प्रस्तावना, नियंत्रणाचे औचित्त्य, पंचायत राज संस्थांच्या स्वायत्तेच्या आग्रह, राज्य शासनाचे नियंत्रणही आवश्यक, राज्य शासनाचे नियंत्रण, नियंत्रणाच्या पद्धती, नियंत्रणाचे प्रकार, नियंत्रणाची विभागणी, नियंत्रणाचे इतर मार्ग, परिक्षण.
 25. पंचायत राज पद्धतीतील समस्या : प्रस्तावना, समस्या.
 26. पंचायत राज : मूल्यमापन : प्रस्तावना, पंचायत राजचे यश, पंचायत राजचे अपयश.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंचायत राज”
Shopping cart